महसूल विभागात विविध पदे रिक्त!! | Department of Revenue Bharti 2022

Department of Revenue Bharti 2022

Mahsul Vibhag Bharti 2022

Department of Revenue Bharti 2022: महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी व जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी याकरिता उपविभागीय कार्यालयातील व तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी 4 एप्रिलपासून तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

Maharashtra Revenue Department Bharti 2022

Department of Revenue Bharti 2022


Department of Revenue Recruitment 2022 Details

Department of Revenue Bharti 2022: Ministry of Finance and Revenue Department has invited applications for the interested and eligible candidates. Interested applicants apply before the last date. Further details are as follows:-

Maharashtra Revenue Department Bharti 2022

अर्थ मंत्रालय आणि महसूल विभाग अंतर्गत इन्स्पेक्टर आणि स्टेनोग्राफर ग्रेड II पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव – इन्स्पेक्टर आणि स्टेनोग्राफर ग्रेड II
 • पद संख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई, अहमदाबाद
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Department of Revenue Bharti 2022

? PDF जाहिरात
shorturl.at/uvzU6
✅ अधिकृत वेबसाईट
dor.gov.in

 


Department of Revenue Bharti 2021: Various vacancies in the revenue department, including Kotwal posts including Deputy Tehsildar. 151 posts of various types have been sanctioned in the tehsil office. Out of which 115 posts are working and 36 posts are vacant.

महसूल विभागात विविध पदे रिक्त, नायब तहसीलदारसह कोतवाल पदांचा समावेश. तहसील कार्यालयामध्ये विविध प्रकारची १५१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ११५ पदे कार्यरत असून ३६ पदे रिक्त आहेत.

राजापूर तालुक्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार पदासह कोतवाल श्रेणी पर्यंतची ३६ पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. ही पदे न भरल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतो. त्यामुळे महसूल विभागातील रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी केली जात आहे.

Department of Revenue Bharti 2021


महसूल विभागात विविध पदे रिक्त 

Department of Revenue Bharti 2021 – There are 168 vacancies in Kolhapur Revenue Department for Deputy Collector, Tehsildar, Deputy Tehsildar, Clerk, Clerk, Talathi, Driver, Peon. कोल्हापुरातील महसूल विभागात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, कारकून, लिपिक, तलाठी, वाहनचालक, शिपाई अशा वेगवेगळ्या प्रकारची १६८ पदे रिक्त आहेत. मंत्रिमंडळाच्या पदभरतीच्या निर्णयामुळे सध्या या कामांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेल्या कर्मचाऱ्यांचा भार हलका होणार आहे. दरम्यान, अध्यादेश आल्यानंतरच याबाबतची कार्यवाही होईल.

शासनाने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसुली विभागांत अधिकाऱ्यांची रिक्त पदे समप्रमाणात भरण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


Department of Revenue Bharti 2021 : राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सरळसेवेने नियुक्ती तसेच पदोन्नतीच्या नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम २०१५ रद्द करण्यास व नवीन महसूल विभाग वाटप नियम २०२१ ची अधिसूचना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे नियम अ आणि ब गटातील सर्व राजपत्रित व अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी असतील.

या अधिसूचनेची ठळक वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे – सर्व महसूली विभागातील रिक्त पदे समप्रमाणात भरण्यात येतील. एका महसूली विभागातील कालावधी किमान 3 वर्ष राहील. एकल पालकत्व सिद्ध झालेल्या अधिकाऱ्यांना या नियमातून सूट देण्यात येईल. 30 पेक्षा कमी पदसंख्या असणाऱ्या संवर्गांना हे नियम लागू होणार नाहीत.

महसूली विभाग वाटप धोरणाच्या अंमलबजावणीत अडचणी येतात. त्याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय विभाग तसेच, शासकीय अधिकारी संघटनांकडून निवेदनेही देण्यात आली आहेत. त्यांचा विचार करून सध्याचा महसूल विभाग वाटप नियम 2015 रद्द करून, नवीन महसूल विभाग वाटप नियम 2021 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


Department of Revenue Bharti 2021 Details

Department of Revenue Bharti 2021 : अर्थमंत्रालय, महसूल विभाग, मुंबई येथे निरीक्षक, सहाय्यक, स्टेनोग्राफर श्रेणी -II पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Department of Revenue Recruitment 2021 Details

विभागाचे नाव अर्थमंत्रालय, महसूल विभाग, मुंबई
पदाचे नाव निरीक्षक, सहाय्यक, स्टेनोग्राफर श्रेणी -II
पद संख्या 3 पदे
नोकरी ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता
कक्ष क्रमांक 134, पहिला मजला, अयकार भवन एम.के. रोड, चर्चगेट मुंबई -400020
अधिकृत वेबसाईट dor.gov.in

Eligibility Criteria For Department of Revenue Recruitment

शैक्षणिक पात्रता Holding Analogous Posts

Vacancy Details

निरीक्षक 01
सहाय्यक 01
स्टेनोग्राफर श्रेणी -II 01

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2021 

Important Links

PDF जाहिरात
http://bit.ly/3crdnoe
अधिकृत वेबसाईट
dor.gov.in

तालुक्यातील महसूल विभागातील रिक्त पदाची भरती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष हनुमंतराव मांढरे-पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

करमाळा महसूल कार्यालयात नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी व लिपिक ही पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. करमाळा तालुक्याचे कार्यक्षेत्र विस्ताराने मोठे असून रिक्त पदाचा अतिरिक्त पदभार इतर अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. एका कामासाठी कार्यालयात नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे निवेदनात कार्याध्यक्ष मांडरे-पाटील यांनी म्हटले आहे. करमाळा महसूल कार्यालयात रिक्त पदांची भरती त्वरित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Department of Revenue Bharti 2021 : भौगोलिक विस्ताराने मोठा असलेल्या चंदगड तालुक्यातील तहसील कार्यालयात ३ नायब तहसीलदारांसह ३ मंडल अधिकारी, ४ तलाठी, ५ लिपीक, ३ शिपाई, १० कोतवाल व एक स्वच्छक अशी २९ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. तसेच कामे वेळेत न झाल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना वेळेबरोबर आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. तालुक्यात वाड्या- वस्त्यांसह १७० गावांचा समावेश आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले चंंदगड हे पश्चिमेला असल्याने शिवाय दळणवळणाची सोय नसल्याने कामासाठी येणारे विद्यार्थी, शेतकरी, नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे.चंदगड तहसील कार्यालयात तीन नायब तहसिलदारांचे काम अव्वल दर्जाचे कारकून संजय राजगोळे करत आहेत. त्यांच%Eयावरही अतिरिक्त कामांचा भार पडत आहे. रिक्त पदांमुळे तहसील कार्यालयातील कामे वेळेत न झाल्याने नागरिकांना महिनोंमहिने वाट पाहावी लागत आ%Eे. त्यामुळे वेळेबरोबरच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. जुने दस्त, कागदपत्रे काढण्यासाठी तर सहा-सहा महिने वाट पाहावी लागो. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या म्हणीची प्रचिती सध्या चंदगड तालुक्यातील नागरिकांना तहसील कार्यालयात अनुभवण्यास मिळत आहे. त्यामुळे चंदगड तहसील कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

चंदगड तहसील कार्यालयात महसूल खात्याने पंधरा दिवसांपूर्वी एन. एस. गायकवाड यांची पदोन्नतीने नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, पंधरा दिवस झाले तरी अद्यापही गायकवाड यांनी नायब तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेऊन दुसऱ्या नायब तहसीलदारांची नेमणूक करावी अथवा कार्यालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडे तरी नायब तहसीलदार पदाचा कार्यभार द्यावा, अशी मागणी होत आहे.

चंदगड तहसील कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी सचिवांकडे मागणी केली आहे. आठ दिवसात ही रिक्त पदे भरली नाहीत तर मुख्यमंत्र्याची प्रत्यक्ष भेट घेणार आहे. – राजेश पाटील, आमदार, चंदगड विधानसभा.

सोर्स : लोकमत


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
 1. Rathod sachin anil says

  New update for job

 2. Sugriv sudhanshu bain says

  Sugri Bain no comments

 3. Sugriv sudhanshu bain says

  Sugri Bain

 4. Prakash gawali says

  Shasnala vinanti ahe ki saralseva bharti lavkar chalu karnyat yavi hi namr vinati

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड