तांत्रिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी डेलॉइट इंडिया ही एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. 2025 साठी डेलॉइटने आपला इंटर्नशिप प्रोग्राम जाहीर केला असून, यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा तब्बल 30,000 इतकं मानधन दिलं जाणार आहे. ही इंटर्नशिप संगणक विज्ञान किंवा तांत्रिक अभ्यासक्रमात पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विशेष म्हणजे, ही इंटर्नशिप मे महिन्यापासून सुरु होणार असून, 2 ते 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असेल.

या इंटर्नशिपमध्ये इंटर्न्सना केवळ थिअरी नव्हे, तर प्रत्यक्ष क्लायंट प्रोजेक्ट्सवर काम करण्याचा अनुभव मिळेल. डेलॉइट युनिव्हर्सिटीचे ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्म, तज्ञांकडून मार्गदर्शन, तसेच क्लायंट मीटिंग्समध्ये सहभागी होण्याची संधीदेखील दिली जाईल. उत्तम कामगिरी करणाऱ्या इंटर्न्सना प्रमाणपत्रासह पोस्ट-ग्रॅज्युएशननंतर नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे ही इंटर्नशिप तुमच्या करिअरसाठी एक उत्तम टप्पा ठरू शकते.
इंटरनशिपसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी डेलॉइटच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. वेबसाइटवरील “Careers” विभागात जाऊन संबंधित इंटर्नशिपसाठी अर्ज करता येईल. अर्ज करताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि अन्य आवश्यक तपशील भरावा लागेल. उमेदवारांची निवड त्यांच्या पात्रतेनुसार आणि प्रकल्पाच्या गरजेनुसार केली जाईल.
पूर्वीचा इंटर्नशिप अनुभव आवश्यक नसला तरी तांत्रिक कौशल्य आणि शिकण्याची तयारी असलेली सकारात्मक मानसिकता महत्त्वाची मानली जाते. हॅकाथॉन, कोडिंग स्पर्धा किंवा टेक क्लबमध्ये सहभाग घेतलेला उमेदवार अधिक प्रभावी ठरतो. त्यामुळे जर तुम्ही तांत्रिक क्षेत्रात करिअर घडवण्याचा विचार करत असाल, तर डेलॉइटची ही इंटर्नशिप तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी ठरू शकते.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















