DBSKKV अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया – 2020-2021
DBSKKV Admission 2020
कृषी तंत्र पदविका, मत्स्य अभियांत्रिकी पदविका व बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया – 2020-2021
DBSKKV Admission 2020 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाकरिता कृषी तंत्र पदविका, मत्स्य अभियांत्रिकी पदविका व बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठ स्तरावर ‘ऑफलाईन’ पद्धतीने राबविण्यात येत आहे. विद्यालये, प्रवेश क्षमता, आरक्षण इत्यादी सविस्तर तपशिलाचा अंतर्भाव असलेली प्रवेश अर्ज विद्यापीठ संकेतस्थळ www.dbskkv.org वर दिनांक 8 सप्टेंबर 2020 पासून उपलब्ध करून देण्यात येईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी अवलंबवायची कार्यपद्धती
- उमेदवाराने www.dbskkv.org या संकेतस्थळावरील Admission या टबवर क्लिक करून दिनांक 8 सप्टेंबर 2020 पासून प्रवेश अर्ज डाउनलोड करून, A4 पेपरवर प्रिंट काढून माहिती पुस्तकेतील सूचनांचे पालन करून स्वहस्ताक्षराने पूर्ण भरून प्रवेश घ्यावयाच्या विद्यालय/ केंद्रामध्येच विहित मुदतीत सादर करावा.
- प्रवेश अर्ज उमेदवाराने पासपोर्ट आकाराचे सध्याचे छायाचित्र, उमेदवाराची स्वाक्षरी व आवश्यक ती संबंधित मूळ कागदपत्रे साक्षांकित/ स्वसाक्षांकित करून, प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कृषी तंत्र विद्यालय/ मत्स्य अभियांत्रिकी पदविका विद्यालय/ बागकाम तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम केंद्रात प्रवेश अर्जासह विहित शुल्क भरून सादर करावे.
- प्रवेश अर्ज भरतेवेळी प्रवेश अर्जाचे शुल्क रोखीने/ डीडीने संबंधित विद्यालय/ केंद्रात भरावे व पावती घ्यावी. अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात न घेता रद्दबातल ठरविण्यात येतील, याची नोंद घ्यावी.
- अधिक तपशीलासाठी निम्नस्तर कृषी शिक्षण विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ – दापोली या कार्यालयाशी संपर्क साधावा. दूरध्वनी क्र. – 2358-282411, 282412, विस्तार 112/121.
- माहिती पुस्तिका विद्यापीठ संकेतस्थळ www.dbskkv.org दिनांक 8 सप्टेंबर 2020 पासून उपलब्ध आहे.