पदव्युत्तर प्रवेशासाठी CUET परीक्षा 15 ते 24 मे, NTA ने जाहीर केले डेटशीट | CUET Exam 2024 In Marathi
CUET Exam 2024 In Marathi
CUET Exam 2024 In Marathi
CUET Exam 2024 In Marathi: नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएद्वारे घेण्यात येणाऱ्या पदवी प्रवेशातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेचे (सीयूईटी यूजी परीक्षा) सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एनटीएने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १५ ते २४ मे या कालावधीत देशभरातील ३५४ आणि भारताबाहेरील २६ शहरांमध्ये परीक्षा आयोजित केली आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
विद्यार्थ्यांना देशभरातील केंद्रीय विद्यापीठे, राज्य विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठांमध्ये बारावीनंतरच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे सोयीचे होण्यासाठी सीयूईटी-यूजी ही संयुक्त प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी एनटीएकडे सोपविण्यात आली आहे. एनटीए जवळपास ६३ पेपर घेणार आहे. यामध्ये काही पेपरचा कालावधी ४५ मिनिटांचा, तर काही पेपरचा कालावधी ६० मिनिटांचा राहणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये चार भागांमध्ये होणार आहे. पहिले सत्र सकाळी १० ते ११ आणि १२.१५ ते १ या वेळेत होणार आहे. दुसरे सत्र दुपारी ३ ते ३.४५ व ५ ते ६ पर्यंत असेल. एनटीए घेत असलेल्या सीयूईटी यूजी परीक्षेसाठी देशभरातील तब्बल १३ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Schedule/Datesheet for the Common University Entrance Test [CUET (UG)] – 2024 – reg.
CUET Exam 2024 Schedule
सीयूईटी परीक्षा 2024 in Marathi (CUET Exam 2024 in Marathi) महत्वाच्या तारखा
CUET कार्यक्रम |
CUET 2024 तारीख (cuet 2024 exam date in Marathi) |
---|---|
CUET अर्ज फॉर्म प्रकाशन |
२७ फेब्रुवारी २०२४ |
CUET 2024 अर्ज समाप्त |
26 मार्च 2024 ३१ मार्च २०२४ 5 एप्रिल 2024 |
CUET 2024 फी भरण्याची शेवटची तारीख |
5 एप्रिल 2024 |
CUET अर्ज दुरुस्ती विंडो |
28 ते 29 मार्च 2024
2 एप्रिल ते 3 एप्रिल 2024 (रात्री 11.50 पर्यंत) 6 एप्रिल ते 8 एप्रिल 2024 |
CUET 2024 शहर सूचना स्लिप (CUET 2024 city intimation slip) | 30 एप्रिल 2024 नंतर |
CUET 2024 प्रवेशपत्र (CUET 2024 Admit Card) |
मे २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात (परीक्षेच्या तारखेच्या २-३ दिवस आधी) |
CUET परीक्षेची तारीख |
15-24 मे 2024 पर्यंत |
प्रोविजनल सीयूईटी आन्सर की | मे 2024 च्या चौथ्या आठवड्यात तात्पुरती |
फाइनल सीयूईटी आन्सर की | मई 2024 अंत तक |
सीयूईटी 2024 रिजल्ट |
30 जून, 2024 |
सीयूईटी काउंसलिंग 2024 |
माहिती दिली जाईल |
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने रविवारी जाहीर केल्याप्रमाणे, कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएट २०२४ (CUET-UG 2024) साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ एप्रिल २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप या परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही ते NTA CUET exams च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
वास्तविक, यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ मार्च होती, ती ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती. साधना पाराशर, वरिष्ठ संचालक (परीक्षा), नॅशनल टेस्टिंग एजन्सी, म्हणाल्या, “विद्यार्थीच्या विनंतीच्या आधारावर, CUET-UG 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ एप्रिल २०२४ पर्यंत वाढवण्यात आली असून उमेदवार रात्री ९.५० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
CUET-UG 2024 ची परीक्षा १५ ते ३१ मे या कालावधीत हायब्रीड पद्धतीने दररोज दोन किंवा तीन शिफ्टमध्ये घेतली जाईल आणि ३० जून रोजी य परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. २०२२ मध्ये लाँच झालेली कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा (अंडर ग्रॅज्युएट), किंवा CUET (UG) ही कोणत्याही केंद्रीय विद्यापीठात किंवा इतर सहभागी संस्थांमध्ये प्रवेश मिळवू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक एकीकृत संधी आहे. ज्यात राज्य विद्यापीठांसह, देशभरातील डीम्ड विद्यापीठे आणि खाजगी विद्यापीठांचा समावेश आहे.
CUET UG 2024 साठी अशी करा नोंदणी :
कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रेजुएट २०२४ (CUET-UG 2024) साठी नोंदणी करण्यासाठी, या पायऱ्यांचे अनुसरण करा:
पायरी १ – नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) exams.nta.ac.in/CUET-UG/ च्या अधिकृत वेबसाइटवर जा
पायरी २ : नंतर CUET टॅबवर क्लिक करा.
पायरी ३ : आता येथे नोंदणी लिंक निवडा.
पायरी ४ : यानंतर, आवश्यक माहिती देऊन खाते तयार करा आणि लॉगिन करा आणि अर्ज भरा.
पायरी ५ : आता तुमचा स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
पायरी ६ : शेवटी, अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
पायरी ७ : अर्ज सबमिट केल्यानंतर, त्याची एक प्रिंट काढा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
परदेशातील २६ शहरांसह ३८० शहरांमध्ये इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. आहेत.
मागील आवृत्त्यांप्रमाणे, जेथे उमेदवार जास्तीत जास्त १० विषय निवडू शकत होते, विद्यार्थ्यांना आता जास्तीत-जास्त सहा विषय निवडण्याची परवानगी आहे.
Table of Contents
Comments are closed.