Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ICSI CSEET 2022 नोव्हेंबर सत्रासाठी नोंदणी सुरु!!

CSEET 2022

ICSI CSEET 2022

CSEET 2022: The CSEET November Session will start on the 12th of November 2022. Applicants register through icsi.edu. At the time of registration, candidates are required to scan and upload their recent photograph, signature, and category certificate (if applicable). Further details are as follows:-

CSEET नोव्हेंबर सत्र १२ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. नोंदणीच्या वेळी उमेदवारांना त्यांचे अलीकडील छायाचित्र, सही आणि श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास) स्कॅन करून अपलोड करावे लागेल. CSEET साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढे देण्यात आली आहे. 

  • इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (Institute of Company Secretaries of India,ICSI) ने नोव्हेंबर 2022 सत्रासाठी कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट (Company Secretary Executive Entrance Test, CSEET) म्हणजेच कार्यकारी प्रवेश परीक्षा २०२२ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.
  • उमेदवार आयसीएसआय CSEET नोव्हेंबर सत्र २०२२ साठी अधिकृत वेबसाइट- icsi.edu वर अर्ज करू शकतात.
  • CSEET 2022 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२२ आहे. सीएस एक्झिक्युटिव्ह प्रवेश परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी, अर्जदाराने इयत्ता बारावी परीक्षा दिली किंवा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट ही भारतीय कंपनी सेक्रेटरीज संस्थेद्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे.
  • सीएसईईटीने सीएस फाऊंडेशन अभ्यासक्रमाची जागा घेतली आहे.
    परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार सीएस एक्झिक्युटिव्ह कोर्समध्ये थेट प्रवेशासाठी पात्र आहेत.
  • अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या ICSI CSEET २०२२ च्या नोटिफिकेशननुसार, CSEET नोव्हेंबर सत्र १२ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे.
  • नोंदणीच्या वेळी उमेदवारांना त्यांचे अलीकडील छायाचित्र, सही आणि श्रेणी प्रमाणपत्र (लागू असल्यास) स्कॅन करून अपलोड करावे लागेल.
  • CSEET साठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढे देण्यात आली आहे.

How to Apply CSEET November 2022 

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जा.
  • खाली स्क्रोल करा आणि CSEET टॅबवर क्लिक करा.
  • यानंतर एक नवीन वेब पेज उघडेल.
  • CSEET ऍप्लिकेशन लिंक 2022 वर क्लिक करा.
  • होमपेजवर सूचना वाचा आणि CSEET नोंदणी फॉर्म भरण्यासाठी पुढे जा.
  • मागितलेली कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंट आउट घ्या.

ICSI CSEET परीक्षेचा नमुना

ICSI CSEET मध्ये एकूण चार पेपर आहेत. यापैकी पेपर-१ हा बिझनेस कम्युनिकेशनचा, पेपर-२ लीगल अ‍ॅप्टिट्यूड अँड लॉजिकल रिझनिंगचा, पेपर-३ हा आर्थिक आणि व्यवसाय पर्यावरणाचा आणि पेपर-४ चालू घडामोडी, सादरीकरण आणि संवाद कौशल्याचा आहे.

CSEET मध्ये ५०% गुण मिळणे आवश्यक

ICSI CSEET CBT माध्यमातून म्हणजेच कॉम्प्युटर आधारित मोडमध्ये आयोजित केली जाते. कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह कोर्ससाठी नोंदणी करण्यासाठी सर्व उमेदवारांनी CSEET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. पात्र होण्यासाठी, उमेदवारांना परीक्षेच्या प्रत्येक पेपरमध्ये ४० टक्के गुण आणि एकूण ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. सीएस पात्रता विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पदव्युत्तर पदवी कार्यक्रमाच्या समतुल्य म्हणून ओळखली आहे.


ICSI CSEET 2022 

CSEET 2022: The schedule of the Company Secretary Executive Entrance Test has been announced by the Institute of Company Secretaries of India. The Company Secretary Entrance Examination 2022 will be held on 9th July 2022. Applications can be submitted till June 15, 2022. Further details are as follows:-

कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्टचे वेळापत्रक इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जाहीर केले आहे. ९ जुलै २०२२ रोजी कंपनी सचिव प्रवेश परीक्षा २०२२ होणार आहे. १५ जून २०२२ पर्यंत अर्ज करता येईल. 

कंपनी सचिव प्रवेश परीक्षा (CSEET 2022) जुलै २०२२ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्या उमेदवारांना त्यासाठी अर्ज करायचा आहे ते ICSE- icsi.edu च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. १५ जून २०२२ पर्यंत अर्ज करता येईल. ICSI CSEET July 2022 परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांनी त्यांचे नाव आणि पात्रता, अर्ज शुल्क भरणे आणि आवश्यकतेनुसार कागदपत्रे अपलोड करण्यासह इतर तपशील भरणे आवश्यक आहे.

  • ICSI CSEET 2022 साठी अर्ज करताना, विद्यार्थ्यांना जन्मतारखेचा पुरावा म्हणून इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीची प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतील.
  • फी सवलत मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.
  • इतकेच नाही तर ऑनलाइन अर्जादरम्यान फोटो आणि स्वाक्षरीच्या स्कॅन प्रतीसह काही कागदपत्रेही अपलोड करावी लागणार आहेत.

How to Register For ICSI CSEET 2022 

  • सर्वप्रथम ICSI च्या अधिकृत वेबसाईट icsi.edu ला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर, ऑनलाइन सेवांवर जा आणि CSEET नोंदणीवर क्लिक करा
  • पुढील विंडोवर, “पुढे जा” वर क्लिक करा.
  • यानंतर विनंती केलेली माहिती भरा.
  • फॉर्म तपासा आणि सबमिट करा.
  • आता अर्ज शुल्क भरा.
  • शेवटी भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाऊनलोड करा.

अर्जासाठी पात्रता 

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून यूजी, पीजी केलेल्या तरुणांना सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्राममध्ये थेट प्रवेश मिळू शकतो.
  • देशातील किंवा परदेशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात किंवा देशातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पीजी पदवी असलेले उमेदवार सीएससाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

CSEET 2022 Registration Details 

CSEET 2022: The registration process for the Company Secretary Executive Entrance Test (CSEET) has started. Students will be able to register for the entrance exam by following the steps given in the news on the official website. Further details are as follows:-

कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET)ची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर, बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करता येणार आहे. संस्थेद्वारे ८ जानेवारी २०२१ ला प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. CSEET जानेवारी २०२२ सत्र प्रवेश परीक्षेला बसू इच्छिणारे विद्यार्थी संस्थेच्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन नोंदणी करु शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाइटवरील CSEET सेक्शनमध्ये जाऊन नोंदणी अर्ज भरायचा आहे. CSEET जानेवारी २०२२ सत्रासाठी १५ डिसेंबर २०२१ पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Eligibility Criteria For CSEET January 2022

जानेवारी 2022 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे घेण्यात येणाऱ्या कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट देण्यासाठी पात्रता निकष पूर्ण असणे गरजेचे आहे. मान्यताप्राप्त बोर्डातून सिनिअर सेकेंडरी (१०+२) परीक्षा उत्तीर्ण केली असेल किंवा २०२१-२२ मध्ये परीक्षा देणारे किंवा त्या समकक्ष शिक्षण असलेले विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात. आयसीएसआय फाउंडेशन/ आयसीएआय फायनल/आयसीएमएआय फायनलय/ कोणत्याही विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या परीक्षांमध्ये त्यांना किमान ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. त्यांना सीएसईईटी प्रवेश परीक्षेला बसण्याची आवश्यकता नाही. असे विद्यार्थी कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामसाठी थेट नावनोंदणी करू शकतात.

How to Register For CSEET January 2022

  • सीएसईईटी जानेवारी २०२२ च्या सत्रात उपस्थित राहण्यास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • सीएसईईटी सेक्शनमध्ये किंवा होमपेजवरील व्हाट्स न्यू सेक्शनमध्ये जा.
  • या विभागात CSEET जानेवारी २०२२ सत्रासाठी नोटीस आणि नोंदणीची लिंक दिली आहेत.
  • अर्जादरम्यान विद्यार्थ्यांना त्यांचे फोटो, सही आणि कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल.
  • अर्ज भरल्यावर भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा

परीक्षेचे नोटीस – https://bit.ly/3lV5Xzn

ऑनलाईन नोंदणी – https://bit.ly/3DWyBpY

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड