१० वी पास उमेदवारांना सुरक्षा दलात नोकरीची मोठी संधी

CRPF Police Bharti 2020

CISF / CRPF Police Bharti 2020 : जर तुम्हाला भारतीय सैन्यात (Armed Forces) भरती व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे (CISF/CRPF Recruitment 2021). केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात (CRPF) हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. जीडी कॉन्स्टेबल पदासाठी होणारी ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून (SSC) केली जाईल. या भरतीची अधिसूचना (नोटिफिकेशन) 15 मार्चला निघेल (SSC Indian Armed Forces CISF/CRPF Recruitment 2021).

SSC ने जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी 2019 मध्ये 55 हजार पदांसाठी भरती केली होती. याशिवाय CRPF आणि CISF च्या माध्यमातून जवळपास 4000 पदांवर नियुक्ती केली होती. यावर्षी देखील कॉन्स्टेबल पदासाठी सीआरपीएफ आणि सीआयएसएफसाठी इतक्याच पदांची भरती होईल असा अंदाज वर्तवला जातोय.


SSC जीडी कॉन्स्टेबल भरतीच्या माध्यमातून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो तिबेटन सीमा पोलीस, सशस्त्र सीमा दल, स्पेशल सुरक्षा दल, नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजेन्सी, आसाम रायफलसह अन्य दलांमध्ये भरती होईल. या भरतीबाबतची अधिकची माहिती अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/ वर उपलब्ध करुन देण्यात आलीय.

शैक्षणिक पात्रता काय?या पदांच्या भरतीसाठी अर्जदार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्जदाराचं वय 18 वर्षे ते 23 वर्षे असणं बंधनकारक आहे. यापेक्षा अधिक वय असलेली व्यक्ती या पदासाठी अर्ज करु शकणार नाही.

भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

1. अर्ज करण्यासाठी संबधित व्यक्तीला पहिल्यांदा भरतीसाठीची अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/ येथे जावं लागेल.

2. या वेबसाईटवर सर्वात वरती हिरव्या रंगाच्या टॅबमध्ये Apply हा टॅब आहे तेथे क्लिक करा.

3. या ठिकाणी SSC जीडी कॉन्स्टेबल भरतीचा फॉर्म निवडून भरा.

4. फॉर्म भरल्यानंतर त्याचं शुल्क देखील भरायचं आहे.

महत्वाचे : या भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये येथे क्लिक करून महाभरतीची अधिकृत अँप लगेच डाउनलोड करा, म्हणजे आपल्याला सरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळतील. 


 

मागील बातमी : सीमा सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) एक लाखापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त राहण्याचे मुख्य कारण म्हणजे सेवानिवृत्ती, राजीनामे आणि मृत्यू. ही माहिती सोमवारी राज्यसभेत देण्यात आली.

CRPF Police Bharti 2020

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, बीएसएफमध्ये सर्वात जास्त २८,९२६, सीआरपीएफमध्ये २६,५०६, सीआयएसएफमध्ये २३,९०६, सशस्त्र सीमा बलात १८,६४३, आयटीबीपीमध्ये ५,७८४ आणि आसाम रायफल्समध्ये ७,३२८ जागा रिक्त आहेत. सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील रिक्त जागा या सेवानिवृत्ती, राजीनामे, मृत्यू, नव्या जागांची निर्मिती, केडर रिव्ह्यूज आदी कारणांमुळे आहेत. यातील बहुतांश जागा या कॉन्स्टेबल ग्रेडच्या आहेत, असे त्यांनी उत्तरात म्हटले.


CRPF Police Bharti 2020 – केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) पॅरामेडिकल स्टाफसह विविध शेकडो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १.४२ लाखापर्यंत पगार मिळेल.

कोणती पदे भरली जाणार आहेत? अर्ज करण्याची मुदत काय? ही सर्व माहिती या बातमीत आपल्याला पुढे देण्यात आली आहे. तसेच रिक्त जागांसाठी अधिसूचना आणि अधिकृत संकेतस्थळांच्या लिंक्सही देत आहोत.

पदांची माहिती

निरीक्षक (डाएटिशियन) – १ पद
उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) – १७५ पदे
उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) – ८ पदे
सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) – ८४ पदे
सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) – ५ पदे
सहाय्यक सब इन्स्पेक्टर (डेंटल टेक्नीशियन) – ४ पदे
सहाय्यक उपनिरीक्षक (लॅब टेक्निशियन) – ६४ पदे
सहाय्यक उपनिरीक्षक / इलेक्ट्रो कार्डिओग्राफी तंत्रज्ञ – १ पद
हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी / नर्सिंग सहाय्यक / वैद्यक) – ८८ पदे
हेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ – ३ पदे
हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्नीशियन) – ८ पदे
हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स-रे सहायक) – ८४ पदे
हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) – ५ पदे
हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) – १ पद
हेड कॉन्स्टेबल (स्टीवर्ड) – ३ पदे
कॉन्स्टेबल – ४ पदे
कॉन्स्टेबल (कुक) – ११६ पदे
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) – १२१ पदे
कॉन्स्टेबल (धोबी) – ५ पदे
कॉन्स्टेबल (डब्ल्यू / सी) – ३ पदे
कॉन्स्टेबल (टेबल बॉय) ) – १ पद
हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) – ३ पदे
एकूण पदांची संख्या – ७८९

अर्जाची माहिती

 • या पदांच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. २० जुलै २०२० पासून ऑनलाइन
 • अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२० आहे.
 • या पदांवर लेखी परीक्षेद्वारे भरती होणार आहे. लेखी परीक्षा २० डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येईल.

पुढील शहरांमध्ये होईल परीक्षा –

नवी दिल्ली, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू, प्रयागराज, अजमेर, नागपूर, मुजफ्फरपूर, पल्लीपुरम

लिंक : कॉन्स्टेबल, हवालदार, उपनिरीक्षक पदाची CRPF भरती २०२०


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

18 Comments
 1. Rupali kunde says

  I’m interested Sir jd cnstebal

 2. Vyanktesh dayanand dhanerao says

  10 th sandard nokri dikhao sir muze job karna bahut aachha lagaya

 3. vaishnavi sanjay chavan says

  job form kasa bharaycha

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड