जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची वानवा असल्यामुळे अनेकवेळा कामांचा खोळंबा होतो. त्याचा नागरी सेवांवर परिणाम होतो. जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत बेरोजगारांना कामाची संधी मिळणार आहे. त्यामधून ५०८ जागा भरण्यात येणार आहेत. त्या जागांवर नियुक्ती दिलेल्यांना राज्य शासनाकडून मानधन दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शासन कौशल्य रोजगार उद्योजकता नावीन्य विभागामार्फत राज्य सरकारने बेरोजगार तरुणांचा मानधन योजनेचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी दहावी, बारावी, पदव्युत्तर, आयटीआय पदवी झालेल्या बेरोजगार तरुणांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या संकेतस्थळावर नावनोंदणी आवश्यक आहे नंतर जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करता येतील. जिल्हा परिषदेमध्ये निवड प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांची निवड होईल. दहावी उत्तीर्ण उमेदवाराला सहा हजार रुपये, आयटीआयसाठी आठ हजार रुपये आणि पदवी, पदव्युत्तर बेरोजगारांना दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या योजनेतून जिल्हा परिषदेमध्ये ५०८ पदांची भरती करण्यात येणार आहे. ज्यांनी शासन निर्णयानुसार नावनोंदणी केलेली आहे ते उमेदवार अर्ज करू शकतात. गुणपत्रकांच्या गुणानुक्रमानुसार ही भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त बेरोजगारांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजक केंद्रातर्फे करण्यात आले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषदेत भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये विविध पदांसाठी भरती राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाहनचालक, विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, कनिष्ठ अभियंता, स्त्री परिचर, सफाई कामगार, चौकीदार आदींचा समावेश आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















