मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी होणार जमा, नवीन अपडेट..- CM Mazi Ladki Bahin Scheme Payment Delayed

CM Mazi Ladki Bahin Scheme Payment Delayed

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्यासाठी लाभार्थी महिलांची उत्सुकता कायम आहे. 27 फेब्रुवारीपासून हप्ता खात्यात जमा होण्याची माहिती मिळाली होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेसाठी 3490 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, लवकरच रक्कम वितरित होईल, अशी अपेक्षा आहे.

 CM Mazi Ladki Bahin Scheme Payment Delayed

डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 मध्ये 24 तारखेला हप्ता मिळाल्याने फेब्रुवारी महिन्यासाठीही महिलांनी अशीच अपेक्षा ठेवली होती. मात्र, यावेळी उशीर झाल्यामुळे सरकारवर टीका होत आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लाभार्थ्यांची पडताळणी सुरू – संख्येत घट
महिला व बालविकास विभाग लाभार्थ्यांची पडताळणी करत असल्याने अनेक महिलांचा हप्ता थांबण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 9 लाख लाभार्थी अपात्र ठरले असून, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाड्यातील 55,000 अर्जदारांचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे.

पडताळणीमध्ये कोणते मुद्दे तपासले जात आहेत?

  • वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे.
  • एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना लाभ.
  • वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांना अपात्र ठरवले जाईल.
  • चारचाकी वाहन असलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाणार.

सरकारची पुढील रणनीती
पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्त्याचे वितरण होईल. मार्च महिन्यात दोन्ही हप्ते मिळण्याची शक्यता असून, योजनेचे लाभ कठोर निकषांनुसार देण्यात येणार आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड