CLAT 2023 चा निकाल जाहीर!! येथे करा डाउनलोड
CLAT 2023 Result
CLAT 2023 Result
CLAT 2023 Result : Common Law Admission Test 2023 results are out now. Candidates who have appeared for the examination can check the result through the below link. If you have not printed your score card, you can either download it by logging into your account OR you can download here by providing your registration number and date of birth (dd-mm-yyyy) which you had entered in your application form. Further details are as follows:-
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (NLUs) च्या संघाने आज, 23 डिसेंबर 2022 रोजी कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट (CLAT) 2023 चा निकाल जाहीर केला आहे. CLAT 2023 ची परीक्षा 18 डिसेंबर रोजी घेण्यात आली होती. CLAT 2023 ची परीक्षा देणारे उमेदवार निकाल पाहू शकतात. उमेदवारांना नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकून त्यांची गुणपत्रिका पाहता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Score Card for CLAT 2023
CLAT 2023 UG मध्ये मिळवलेले सर्वोच्च गुण 116.75 आहे. CLAT 2023 साठी, एकूण उपस्थिती सुमारे 94.87% होती. CLAT 2023 साठी अर्ज केलेल्या अर्जदारांपैकी 56% महिला आहेत, 44% पुरुष आहेत आणि 2 ट्रान्सजेंडर अर्जदार आहेत.
अधिकृत घोषणेनुसार, दोन उमेदवारांनी UG CLAT 2023 मध्ये परिपूर्ण गुण मिळवले. पाच विद्यार्थ्यांनी 99.97 पर्सेंटाइल, तीन विद्यार्थ्यांनी 99.98 पर्सेंटाइल, तीन उमेदवारांनी 99.99 पर्सेंटाइल आणि चार उमेदवारांनी 99.96 पर्सेंटाइल मिळवले. CLAT 2023 च्या UG आवृत्तीमध्ये सर्वोच्च स्कोअर 116.75 आहे. CLAT PG 2023 मध्ये फक्त एका विद्यार्थ्याने 99.99 टक्केवारी मिळवली, तर कमाल 95.25 गुण मिळवले.
How to Download CLAT 2023 Result
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जा.
- एक नवीन लॉगिन पेज उघडेल.
- तुमचा CLAT अर्ज क्रमांक/अॅडमिट कार्ड क्रमांक आणि जन्मतारीख भरा आणि सबमिट करा.
- CLAT 2023 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल तपासा आणि डाउनलोड करा.
- भविष्यातील उपयोगासाठी निकालाची प्रिंट काढा
परीक्षा आणि निकालाशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in ला भेट देऊ शकतात.
निकाल डाउनलोड करा – consortiumofnlus.ac.in
CLAT 2022 New Date
CLAT 2022: Consortium of National Law University has announced new dates for Common Law Admission Test 2022. Accordingly, the examination will be held on June 19, 2022 in two shifts. Candidates can register till May 9 by visiting the official website. Further details are as follows:-
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कन्सोर्टियमने कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२२ च्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार १९ जून २०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. उमेदवाराना अधिकृत वेबसाइटवर जाऊन यासाठी ९ मेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कन्सोर्टियमने (National Law University Consortium) परीक्षेच्या तारखेत सुधारणा केली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा १९ जूनपासून सुरु होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा ८ मे रोजी होणार होती. आता यूजी आणि पीजी या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CLAT २०२२ परीक्षा १९ जून २०२२ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत घेतली जाणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याबरोबरच, CNLU ने CLAT परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णयही घेतला आहे. यापूर्वी या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च रोजी संपणार होती. ज्या उमेदवारांनी अद्याप परीक्षेसाठी अर्ज केला नसेल त्यांना आणखी एक संधी मिळणार असून ते ९ मे २०२२ पूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जाऊन लॉग इन करू शकतात.
CLAT 2022 Important Dates
- CLAT २०२२ साठी नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख – ९ मे २०२२
- CLAT २०२२ परीक्षेची तारीख- १९ जून २०२२
How to Apply For Common Law Admission Test CLAT
- CLAT परीक्षेला बसण्यासाठी, उमेदवारांना कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजच्या अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जा.
- होमपेजवर ‘CLAT 2022’ लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- अर्ज भरण्यासाठी तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.
- सर्व तपशील देऊन आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून CLAT 2022 अर्ज भरणे सुरू करा.
- अर्जाची फी भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
- तुमची CLAT नोंदणी पूर्ण होईल.
- भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रत डाउनलोड करा आणि प्रिंट काढा.
The reason for postponing the CLAT has not been officially announced. Candidates, meanwhile, are advised to prepare for the exam in view of these new dates.
अधिकृत वेबसाईट – consortiumofnlus.ac.in
CLAT Registration 2022
CLAT 2022 exam will be held on 8th May 2022. The registration process has begun. The examination is conducted for admission to five year LLB and one year LLM courses in 22 National Law Universities. Further details are as follows:-
CLAT 2022 ची परीक्षा ८ मे २०२२ रोजी होणार आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. २२ राष्ट्रीय विधी विद्यापीठांमधील पाच वर्षीय एलएलबी आणि एक वर्षीय एलएलएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा आयोजित करण्यात येते. क्लॅट २०२२ परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया १ जानेवारी, २०२२ पासून सुरू होणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज ऑनलाइन डाऊनलोड करू शकतात. अर्ज प्रक्रिया जमा करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च २०२२ आहे
The exam will be held from 3 pm to 5 pm. This is a national level law course entrance exam. The examination is conducted for admission to five year LLB and one year LLM courses in 22 National Law Universities. This exam will be offline. Examination centers will be set up for the examination.
Eligibility Criteria For CLAT Exam
- उमेदवारांनी किमान ४५ टक्के गुणांसह (एससी / एसटी उमेदवारांसाठी ४० टक्के गुण) बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- मार्च / एप्रिल २०२२ मधील परीक्षा देणारे उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत.
- उमेदवारांकडे किमान ५० टक्के गुणांसह (एससी / एसटी उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण) एलएलबीची पदवी आवश्यक आहे.
- पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे उमेदवारही ही परीक्षा देऊ शकतात.
CLAT Exam Application Fess
- CLAT 2022 साठी अर्ज भरताना उमेदवारांनी ऑनलाइन पेमेंट गेटवेचा उपयोग करायचा आहे.
- याद्वारे अर्ज शुल्क जमा करता येईल.
- सर्वसाधारण गटातील उमेदवारांसीठी CLAT अर्जाचे शुल्क चार हजार रुपये आहे.
- एससी, एसटी आणि बीपीएल उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३,५०० रुपये आहे.
CLAT 2022 Exam Will Be Held Twice
CLAT 2022 : This is an important update for the candidates appearing for the CLAT exam 2022. Some important decisions have been taken in the meeting of CNLU Executive Committee and General Body held on 14th November, 2021. Candidates will benefit from this decision. Students appearing for the exam will be able to view detailed updates on the official website. Further details are as follows:-
क्लॅट परीक्षा २०२२ देणाऱ्या परीक्षार्थींसाठी महत्वाची अपडेट आहे. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या सीएनएलयूच्या कार्यकारी समिती आणि जनरल बॉडीच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाचा उमेदवारांना फायदा होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर अपडेट पाहता येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
हैदराबाद येथील नालासार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ येथील प्राध्यापक फैजान मुस्तफा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर देण्यात आलेल्या अपडेटनुसार, २०२२ मध्ये पहिल्यांदाच क्लॅट परीक्षा दोनदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्लॅट २०२२ चा पहिला टप्पा ८ मे रोजी आणि दुसरा टप्पा १८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
क्लॅट समुपदेशन शुल्क:
बैठकीत क्लॅट २०२२ साठी समुपदेशन शुल्क कमी करण्यात आले आहे. यावेळी घेण्यात येणाऱ्या सीएलएटी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांपैकी सर्वसाधारण श्रेणीसाठी समुपदेशन शुल्क ५० हजारांऐवजी ३० हजार असणार आहे. तसेच एससी, एसटी, ओबीसी, बीसी, इड्ब्ल्यूएस, दिव्यांग आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी समुपदेशन शुल्क केवळ २० हजार रुपये असणार आहे.
विद्यार्थ्यांची गोपनीयता:
उमेदवारांचे तपशील कोणत्याही विद्यापीठ किंवा कोणत्याही तिसऱ्या संस्थेला शेअर न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही डिटेल्स शेअर करण्यासाठी उमेदवाराची संमती असेल तरच, त्याचे/तिचे तपशील परीक्षा मंडळाद्वारे संस्थेला दिले जातील असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
क्लॅट कन्वेअर:
या बैठकीमध्ये हिदायतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रायपूरचे कुलगुरु वी.सी.विवेकानंद यांची क्लॅट २०२२ परीक्षेसाठी संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.
Table of Contents