District Hospital Ratnagiri Bharti 2026
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणारे जिल्हा रुग्णालयच सध्या मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेमुळे गंभीर अडचणीत सापडले आहे. रुग्णालयातील तब्बल ८० टक्के वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपलब्ध डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत असून आरोग्यसेवेवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी जिल्हा रुग्णालयाला सदिच्छा भेट देत तेथील आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
जिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. जयप्रसाद रामानंद यांनी रुग्णालयातील सद्यस्थितीची माहिती देताना मनुष्यबळाच्या अभावामुळे आरोग्य सेवा टिकवून ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे सांगितले. रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या पडत आहेत.
डॉ. रामानंद यांनी सांगितले की, आधीच कर्मचारी संख्या अपुरी असताना आता परिचारिकांची (नर्सेस) संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला जात असल्याने आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. नर्सेस भरती प्रक्रियेत सीईटी परीक्षा अनिवार्य न करता जीएनएम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
याशिवाय रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी कंत्राटी पद्धतीने विशेष कर्मचारी नियुक्त करावेत, एमबीबीएस डॉक्टरांची संख्या वाढवावी तसेच भूलतज्ज्ञ (अॅनेस्थेटिस्ट) आणि स्त्रीरोगतज्ज्ञ (गायनाकॉलॉजिस्ट) यांसारख्या अत्यावश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची त्वरित नियुक्ती करावी, अशा विविध मागण्या डॉक्टरांनी आमदार जठार यांच्याकडे मांडल्या.
रुग्णालयातील गंभीर परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर आमदार प्रमोद जठार यांनी चिंता व्यक्त केली. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आणि मनुष्यबळाशी संबंधित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आपण स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून आवश्यक मंजुरी मिळविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही आमदार जठार यांनी दिले. त्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या आढावा बैठकीस आमदार प्रमोद जठार, डॉ. जयप्रसाद रामानंद, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि रुग्णालय प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
Previous Posts:
District Hospital Ratnagiri Bharti 2025
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात दीर्घकाळ रिक्त असलेली पदे भरण्यासाठी शासनाने अखेर मान्यता दिली आहे. एकूण २७१ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात लिपिक व तांत्रिक पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यामध्ये महाविद्यालयातील २५ व जिल्हा रुग्णालयातील २४६ अशी एकूण २७१ पदे समाविष्ट आहेत.या भरतीमुळे कोकणातील स्थानिक युवकांना रत्नागिरीतच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत १४० पदे रिक्त असल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत होता. दै. पुढारीने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने भरती प्रक्रियेचा निर्णय घेतला.
सध्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असून, छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडत आहेत. तरीही रिक्त पदांमुळे डॉक्टरांवर कामाचा प्रचंड भार होता. अखेर पालकमंत्री सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे व अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या प्रयत्नांमुळे पदभरतीस मान्यता मिळाली.
भरतीची ही प्रक्रिया खासगी कंत्राटदारामार्फत राबवली जाणार असून, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आदी पदे आगामी दोन महिन्यांत नियमित स्वरूपात एमपीएसी परीक्षेतून निवड होऊन भरण्यात येणार आहेत. तसेच नर्सिंगच्या २४१ रिक्त पदांवरही लवकरच निर्णय घेण्यात येईल.
ही पदे आहेत रिक्त
प्राध्यापक-३७, सहयोगी प्राध्यापक-२२, सहायक प्राध्यापक-३५, लिपिक वर्ग-३७, तांत्रिक पदे-२९. एकूण-१४०
ही रिक्त पदे भरण्यात येणार
मेडिकल महाविद्यालयात सहायक ग्रंथपाल १, समाजसेवक अधिक्षक ३, प्रयोगशाळा तज्ज ५, इसीजी तंत्रज्ञ-३, क्ष-किरण तंत्रज्ञ ४, कनिष्ठ लिपीक ९.
जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय समाजसेवक४, भ अधिपरीचारीका २००, स्पीच थेरपीस्ट-१, आहारतज्ज्ञ १, लघुलेखक-१, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-५, क्ष-किरण तंत्रज्ञ-२, इसीजी तंत्रज्ञ-२, निर्जतुकीकरण तंत्रज्ञ १, पटलेप तंत्रज्ञ १, औषधनिर्माता-१०, दंततंत्रज्ञ-१, कनिष्ठ लिपिक-१०, विजतंत्री-१, वस्त्रपाल-२, वाहनचालक ३ असे एकुण २४६ पदे तर दोन्ही मिळून २७१ पदे भरण्यात येणार आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















