सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थाना काम देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयास 2 कंत्राटी शिपाई व आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांचे 1 कंत्राटी शिपाई पदे 6 महिन्याकरीता सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था मार्फत भरण्यात येत आहे.

यासंबधी येथे जिल्हास्तरीय कामवाटप समिती नियुक्त करण्यात आली असून त्या समितीच्या वतीने या कार्यालयास नोंदणी असलेल्या सुशिक्षीत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थाना कामाचे वाटप करण्यांत येत आहे.
सुशिक्षीत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी 13 सप्टेंबर 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधून या कार्यालयास अर्ज सादर करावे. विहित तारखेनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जासोबत संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र, बँकेचे पासबूकची छायांकीत प्रत, सन 2023-24 चे लेखापरिक्षण अहवाल, चालू असलेले सेवायोजन कार्ड, सभासद क्रियाशील असल्याचे प्रमाणपत्र व सदर सेवा सोसायटी कार्यरत असावी, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांनी केले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















