मित्रांनो, जर आपण इंटर्न्ससाठी कुठे संधी शोधत असाल तर आपल्यासाठी हि एक अप्रतिम संधी आहे. भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कच्या नियंत्रक महाजन (CGPDTM) कार्यालयात 2025 साली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) इंटर्नशिप साठी अर्ज मागवले जात आहेत. हे प्रोग्राम राष्ट्रीय IPR धोरणाच्या अनुषंगाने आहे, ज्याचा उद्देश IP बद्दल जागरूकता वाढवणे, संशोधनाला चालना देणे आणि IP क्षेत्रातील मानव संसाधन सशक्त करणे आहे. चाल तर या बद्दल पूर्ण माहीत बघूया.

पात्रता:
IPR इंटर्नशिपसाठी अर्ज करणारे विद्यार्थी किंवा व्यावसायिक, ज्यांना IPR मध्ये रुचि आहे, ते अर्ज करू शकतात. पात्रता अशी आहे की कायदा, विज्ञान, अभियांत्रिकी किंवा संबंधित क्षेत्रातील अंडरग्रॅज्युएट/पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थी असावेत. तसेच IPR मध्ये रस असलेल्या संशोधन शास्त्रज्ञ आणि IPR फ्रेमवर्कसाठी एक्स्पोजर शोधत असलेले युवा व्यावसायिकही अर्ज करू शकतात.
कालावधी:
इंटर्नशिपचा कालावधी विविध असू शकतो, जो 45 दिवस ते 12 महिने असू शकतो, CGPDTM यांच्या उपलब्धतेनुसार. साधारणपणे, लघुकाळी इंटर्नशिप 45 दिवसांची असते, मध्यकाल इंटर्नशिप 6 महिन्यांची आणि दीर्घकाल इंटर्नशिप 12 महिन्यांची असू शकते.
स्थान:
हे इंटर्नशिप प्रोग्राम भारतातील विविध IP ऑफिसेस मध्ये उपलब्ध आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद आणि नागपूर येथील IP ऑफिसेसमध्ये इंटर्नशिप साठी संधी आहे.
उद्दीष्टे:
इंटर्नशिपचा मुख्य उद्दीष्ट IP प्रशासनातील व्यावहारिक अनुभव मिळवणे, IP कायदे, नियम आणि प्रक्रिया समजून घेणे आणि राष्ट्रीय धोरण उद्दीष्टानुसार IPR मध्ये संशोधनाला चालना देणे आहे. हे प्रोग्राम राष्ट्रीय IPR धोरणाच्या अंतर्गत असून त्याचे अनुसरण करते.
अर्ज कसा करावा:
इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्यांना अद्ययावत रिझ्युमे/CV, 500 शब्दांमध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पस, सिफारस पत्र किंवा NOC (अभ्यास संस्था/कॉलेज/युनिव्हर्सिटीच्या प्रमुखांकडून), आणि प्रवेश प्रमाणपत्र (विद्यार्थ्यांसाठी) आवश्यक आहे. अर्ज [email protected] या ईमेल पत्त्यावर पाठवावे.
इंटर्नशिप प्रकार: मित्रांनो, या इंटर्नशिप प्रोग्रॅम आपल्यासाठी एक महत्व पूर्ण अनुभव देतो, हा इंटर्नशिप नॉन-रिम्युनरेटिव (वेतन न देणारे) आहे, म्हणजेच यामध्ये कोणतेही वेतन दिले जात नाही. परंतु इंटर्नशिप पूर्ण केल्यावर, आपल्याला प्रमाणपत्र दिले जाते.
अधिक माहिती आणि अटी व शर्तींसाठी अधिक वाचा. कोणत्याही शंका असल्यास [email protected] वर संपर्क साधा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















