राज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचं मोठं ओझं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षावर (CET Cell) आहे. पण दुर्दैव म्हणजे या कक्षात मंजूर ३० पदांपैकी फक्त १३ पदं गेल्या १० वर्षांत भरली गेली आहेत. त्यामुळे दरवर्षी १३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी अर्ज करत असताना, या कक्षाचे आयुक्त आणि इतर काही मोजकेच कर्मचारी जीवाचं रान करत काम करत आहेत.

२०१५ साली हा कक्ष पारदर्शक प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी सुरू करण्यात आला होता. सुरुवातीला अपेक्षा होत्या की सर्व पदं भरली जातील, पण आजही निम्म्याहून अधिक पदं रिक्त आहेत. सध्या केवळ आयुक्त आणि लेखापाल ही दोन पदं राज्य सरकारने भरली आहेत. चार जण प्रतिनियुक्तीवर आहेत आणि सात जण कंत्राटी पद्धतीने नेमलेले आहेत.
ही माणसं प्रवेश परीक्षा घेणं, परीक्षा केंद्र तयार करणं, ऑनलाईन परीक्षा राबवणं, गुणवत्ता यादी जाहीर करणं, कॉलेजांशी संपर्क ठेवून त्यांना मार्गदर्शन करणं अशी अनेक कामं करत आहेत.
प्रतिनियुक्तीवरही कर्मचारी यायला तयार नाहीत
राज्य सरकारकडून थेट भरती न झाल्यामुळे CET कक्षाने वेगवेगळ्या विभागांकडे – जसं की तंत्रशिक्षण, वैद्यकीय, कृषी, आणि कला शिक्षण – प्रतिनियुक्तीने कर्मचारी मागितले, पण अनेक विभागातून कोणीही यायला तयार नाहीये. त्यामुळे ही अडचण अजून वाढली आहे.
परीक्षा समन्वयकांचीही कमतरता
परीक्षा समन्वयक आणि सहाय्यक समन्वयक – ही दोन महत्वाची पदं असून एकूण १२ जागांपैकी ८ अजून रिक्त आहेत. सध्या फक्त दोन परीक्षा समन्वयक आणि दोन सहाय्यक प्रतिनियुक्तीवर काम करत आहेत.
प्रवेश नियामक प्राधिकरणातही तीच अवस्था
विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणाऱ्या प्रवेश नियामक प्राधिकरणात मंजूर २२ पदांपैकी केवळ ६ पदं भरली गेली आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















