केंद्र सरकारच्या ब व क वर्ग पदांसाठी CETतून भरती होणार
Central Govt CET For Recruitments
Central Govt CET For Recruitments – आनंदाची बातमी म्हणजे, केंद्र सरकारच्या नोकरीसाठी उमेदवारांसाठी यावर्षीपासून देशभरात केंद्रामार्फत एक सामान्य पात्रता परीक्षा (सीईटी) घेतली जाईल. यंदाच्या सप्टेंबरच्या सुमारास पहिली चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी दिली. सरकारने राष्ट्रीय भरती एजन्सी (एनआरए) ची स्थापना केली आहे, जी सरकारी नोकरीसाठी सीईटी भरती चाचणी घेईल.
ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या या सीईटी परीक्षेचं आयोजन करण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजुरीने एनआरएची स्थापना करण्यात आली आहे.
विशेषतः सरकारी नोकरीसाठी इच्छूक असलेल्या तरुण उमेदवारांसाठी सीईटी ही यंदाच्या वर्षी देशभरात आय़ोजित केली जाणार आहे. या परिक्षेमधून सरकारी नोकर भरतीसाठी उमेदवारांची निवड करता येणार म्हणजेच भरतीसाठी पात्र ठरणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या परीक्षा सप्टेंबर 2021 च्या दरम्यान होण्याची शक्यता आहे.
CET exam form kadi bharaycha aahe
CET exam kevha ahe