केंद्रीय विद्यालयाच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द

CBSE Exam Cancelled


करोना व्हायरसमुळे पुढचे २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये राहणार आहे. शाळेपासून महाविद्यालयापर्यंत सर्वच महत्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना पुढच्यावर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला.  अन्य राज्यांनी सुद्धा परीक्षा ने घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्यालयाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ सालच्या शिक्षणअधिकार कायद्यातंर्गत हा निर्णय घेण्यात आला आहेLeave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>