IIM CAT 2020 परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ!
CAT 2020 Application
CAT 2020 Application : IIM CAT 2020 परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे.
IIM CAT 2020 application process detail: भारतीय व्यवस्थापन संस्थेसह (IIM) अनेक टॉप मॅनेजमेंट / बिझनेस संस्थांमधील अभ्यासक्रमांसाठी कॉमन अॅ़डमिशन टेस्ट अर्थात कॅट (CAT) परीक्षा दिली जाते. जर तुम्ही आयआयएम किंवा कोणत्याही व्यवस्थापन संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिता आणि तुम्ही पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे तर तुम्ही कॅट २०२० साठी अर्ज करू शकता. आता यासाठी आणखी एक संधी चालून आली आहे. कारण कॅट २०२० साठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. ही मुदत १६ सप्टेंबर रोजी संपत होती, ती आता वाढवण्यात आली आहे.
देशातील २० IIM मधील MBA / PGDM अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. कॅट २०२० देऊ इच्छिणारे उमेदवार आता २३ सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन रजिस्ट्रेशन / अॅप्लिकेशनची लिंक पुढे दिली जात आहे. त्या लिंकवर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कधी होणार परीक्षा?
आयआयएम कॅट २०२० परीक्षा रविवार, २९ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. परीक्षेचे अॅडमिट कार्ड बुधवारी २८ ऑक्टोबर २०२० रोजी जारी केले जाणार आहेत. अर्ज यशस्वीपणे भरणारे उमेदवार आयआयएम कॅट २०२० च्या अधिकृत संकेतस्थळावरून २८ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपासून आपलं अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील.
ही परीक्षा संगणक आधारित आहे. कॅटच्या स्कोरवर बिझनेस आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.
CAT 2020 संकेतस्थळ – https://bit.ly/35GlCLf
CAT 2020 अर्ज – https://bit.ly/2Rzca42
CAT 2020 Application : कॅट परीक्षेसाठी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे…
CAT 2020 application: भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) मध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट (कॅट २०२०) साठी नोंदणी सुरू झाली आहे. नोंदणी / अर्ज आज ५ ऑगस्ट २०२० पासून कॅटच्या अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर अॅक्टिव्ह करण्यात आला आहे. आता उमेदवार वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकतात. किंवा या बातमीत दिलेल्या लिंकवरून अर्ज प्रक्रिया देखील पूर्ण करता येऊ शकेल.
आयआयएम कॅट 2020 साठी महत्त्वाच्या तारखा
- कॅट २०२० साठी ऑनलाईन नोंदणी ५ ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २०२० (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
- अॅडमिट कार्ड आयआयएम कॅटच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन जारी केले जातील. अर्जदार त्यांचे प्रवेश पत्र २८ ऑक्टोबर २०२० रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून iimcat.ac.in वरून डाउनलोड करू शकतील.
- रविवार, २९ नोव्हेंबर२०२० रोजी देशभरातील १५६ शहरांमधील शेकडो केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. दोन सत्रांत परीक्षा घेण्यात येईल.
CAT 2020: पुढील आयआयएममध्ये मिळणार प्रवेश
- आयआयएम अहमदाबाद (IIM Ahmedabad)
- आयआयएम अमृतसर (IIM Amritsar)
- आयआयएम बंगळुरू (IIM Bengaluru)
- आयआयएम बोधगया (IIM Bodhgaya)
- आयआयएम कोलकाता (IIM Calcutta)
- आयआयएम इंदूर (IIM Indore)
- आयआयएम जम्मू (IIM Jammu)
- आयआयएम काशीपुर (IIM Kashipur)
- आयआयएम कोझीकोड (IIM Kozhikode)
- आयआयएम लखनऊ (IIM Lucknow)
- आयआयएम नागपुर (IIM Nagpur)
- आयआयएम रायपुर (IIM Raipur)
- आयआयएम रांची (IIM Ranchi)
- आयआयएम रोहतक (IIM Rohtak)
- आयआयएम संबलपुर (IIM Sambalpur)
- आयआयएम सिरमौर (IIM Sirmaur)
- आयआयएम तिरुचिरापल्ली (IIM Tiruchirapalli)
- आयआयएम उदयपुर (IIM Udaipur)
- आयआयएम विशाखापट्टनम (IIM Vishakhapattanam)
सोर्स : म. टा.
Table of Contents