JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

१०वी आणि १२वी च्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरणार ! जाणून घ्या

दहावी व बारावीची परीक्षा अलीकडेच पार पडली असून, त्यांचे निकाल २५ ते ३० मेदरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. या टक्केवारीच्या आधारे विद्यार्थी आपले पुढील शिक्षण व करिअरची दिशा ठरवतात. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा व आयटीआय तर बारावी नंतर अभियांत्रिकी, डीएड, फार्मसी यांसारख्या व्यावसायिक कोर्सद्वारे उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. मात्र, योग्य शाखा व अभ्यासक्रम निवडताना दूरदृष्टी आवश्यक आहे.

Career Starts After Results!

फक्त पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊन बेरोजगार राहणाऱ्यांचे प्रमाण खासगी उद्योगधंदे, बँकांच्या कर्ज योजना व जिल्हा उद्योग केंद्रांच्या मदतीमुळे कमी होत चालले आहे. अनेकांनी सरकारी नोकरीची वाट न पाहता स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. आयटीआय व डिप्लोमाद्वारे अल्पावधीत रोजगार मिळू शकतो, व पुढे अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रातही प्रवेश मिळतो.

डीएड, मॉन्टेसरी कोर्स करून अनेक जण इंग्रजी माध्यम शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कोणी कोचिंग क्लासेस देखील सुरू केले आहेत. दहावी-बारावीनंतर काही विद्यार्थी NEET, JEE परीक्षांची तयारी करून उच्च शिक्षणासाठी मार्ग तयार करत आहेत.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

महामार्गांच्या जाळ्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातून जाणारे अनेक महामार्ग, तसेच त्यालगत वाढलेली हॉटेल्सची संख्या या संधींचे मूळ ठरत आहेत.

फार्मसी व एमबीए अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना फार्मा कंपन्यांमध्ये तसेच कार्यालयीन पदांवर नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. स्वतःचे मेडिकल सुरू करण्याचाही पर्याय खुला आहे. सोलापूरमध्ये सध्या सुमारे पाच हजार मेडिकल्स आहेत. त्यामुळे फार्मसी हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड