सीए फायनल’ आता वर्षातून दोनवेळा; तीनवेळा परीक्षा घेण्याचा निर्णय अखेर रद्द!! | CA Exams – More Opportunities!

CA Exams Update

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटऑफ इंडिया’ मार्फत (आयसीएआय) घेण्यात येणारी सीए फायनल परीक्षा वर्षातून दोन वेळाच घेतली जाणार असल्याचे ‘आयसीएआय’ने जाहीर केले आहे. त्यानुसार मे व नोव्हेंबरमध्येच ही परीक्षा होणार आहे. मे महिन्यात होणाऱ्या सीए फायनलच्या तारखाही जाहीर झाल्या असून, ग्रुप १ साठी दि. २, ४ व ६ मे रोजी, तर ग्रुप २ साठी दि. ८, १० व १२ मे रोजी परीक्षा होईल. त्याचप्रमाणे, सीए फाउंडेशन ही परीक्षा दि. १४, १६, १८ व २० मे रोजी होणार आहे. इंटरमीजिएट ही परीक्षा ग्रुप १ साठी दि. ३, ५ व ७ मे रोजी घेतली जाणार आहे. ग्रुप २ साठी दि. ९, ११ व १३ मे रोजी परीक्षा होणार आहे

गेल्या वर्षी जानेवारी, मे व सप्टेंबर अशी वर्षातून ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतु, यंदापासून ही परीक्षा पुन्हा दोनवेळा घेतली जाणार आहे. ‘आयसीएआय’ मार्फत फाउंडेशन व इंटरमीजिएट या परीक्षा वर्षातून तीनवेळा घेतल्या जातात. परंतु, सीए फायनल परीक्षा मात्र वर्षातून दोनवेळाच घेतली जात होती. गेल्या वर्षी मात्र ‘आयसीएआय’ मार्फत जानेवारी, मे व सप्टेंबर असे तीनवेळा सीए फायनल परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, आता ‘आयसीएआय’ने पुन्हा यात बदल करून आधीप्रमाणे मे व नोव्हेंबर अशी दोन वेळाच ही परीक्षा घेतली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. सप्टेंबर, तसेच जानेवारी या दोन्ही महिन्यांत महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रे मिळण्यात अडचणी येत असल्याचे गेल्या वर्षी निदर्शनास आले होते. यासह विद्यार्थी, ‘आयसीएआय’चे विविध चॅप्टर्स व या संबंधित घटकांनी वर्षातून दोनवेळाच ही परीक्षा घेण्याची मागणी केली होती.

May 2026 Examination Schedule:
    • CA Final (Group 1): May 2, 4, 6, 2026
    • CA Final (Group 2): May 8, 10, 12, 2026
    • CA Intermediate (Group 1): May 3, 5, 7, 2026
    • CA Intermediate (Group 2): May 9, 11, 13, 2026
  • CA Foundation: May 14, 16, 18, 20, 2026

Previous Posts:

इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI CA Final exam update) ने सीए इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सीए इंटरमीडिएट ग्रुप १ परीक्षा ३, ५ आणि ७ मे रोजी, तर ग्रुप २ परीक्षा ९, ११ आणि १४ मे रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे, सीए फायनल ग्रुप १ ची परीक्षा २, ४ आणि ६ मे रोजी, तर ग्रुप २ ची परीक्षा ८, १० आणि १३ मे रोजी आयोजित केली जाईल.

CA Exams – More Opportunities!

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

आता वर्षातून तीनदा होणार सीए फायनल परीक्षा
आयसीएआयने मोठा निर्णय घेत सीए फायनल परीक्षा वर्षातून दोनऐवजी तीनदा घेण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत आता परीक्षा जानेवारी, मे आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत घेतली जाणार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असून, अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी घेतला गेला आहे.

फाउंडेशन आणि इंटरमीडिएट परीक्षा याआधीच तीनदा
गेल्या वर्षी ICAI ने फाउंडेशन आणि इंटरमीडिएट परीक्षा वर्षातून दोनऐवजी तीनवेळा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थी आता एका वर्षात अधिक संधींचा लाभ घेऊ शकतात. आता फायनल परीक्षेचाही समावेश झाल्यामुळे संपूर्ण सीए अभ्यासक्रम अधिक सुलभ आणि लवचिक झाला आहे.

विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या अधिक संधी
वर्षातून तीनदा परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी अतिरिक्त संधी मिळणार आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्याने एका परीक्षेत अपयश मिळवले, तर त्याला पुढील परीक्षेची वाट पाहावी लागत नाही. लवकरच पुढील परीक्षा देता येईल, त्यामुळे अभ्यासाची सातत्यपूर्ण तयारी करता येईल.

मूल्यांकन चाचणीसुद्धा वर्षातून तीन वेळा
सीए अभ्यासक्रमातील माहिती प्रणाली लेखापरीक्षण (Information Systems Audit – ISA) पदव्युत्तर पात्रता अभ्यासक्रमासाठी मूल्यांकन चाचणी देखील वर्षातून तीन वेळा घेतली जाणार आहे. ही चाचणी फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर महिन्यात आयोजित केली जाईल. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना वेळेत तयारी करता येईल आणि त्यांचे करिअर अधिक वेगाने पुढे जाऊ शकते.

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी – यशस्वी होण्याचा मार्ग सुकर
गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार ३१,९४६ विद्यार्थ्यांनी सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यापैकी मे महिन्यात २०,४४६ विद्यार्थी, तर नोव्हेंबरमध्ये ११,५०० विद्यार्थी यशस्वी झाले. नव्या संधीमुळे विद्यार्थ्यांचा यशस्वी होण्याचा दर वाढण्याची शक्यता आहे.

आयसीएआयच्या निर्णयामुळे सीए विद्यार्थ्यांना मोठा फायदा
या निर्णयामुळे विद्यार्थी वेळेचा अधिक चांगला उपयोग करू शकतील, अधिक आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जाऊ शकतील आणि आपल्या कारकिर्दीला गती देऊ शकतील. वर्षातून तीनदा परीक्षा घेण्याचा निर्णय ही विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असून, यामुळे अधिकाधिक चार्टर्ड अकाउंटंट तयार होतील आणि उद्योगविश्वाला प्रशिक्षित सीए मिळतील.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड