सीए 2020 परीक्षांचे अॅडमिट कार्ड कधी होणार जारी? जाणून घ्या

CA Exam Admit Card

CA Exam Admit Card : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स (ICAI) तर्फे १ नोव्हेंबर पासून CA परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी करण्यात येणार आहे. सीए फायनल, इंटरमिडिएट आणि फाउंडेशन कोर्स परीक्षा २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २०२० या कालावधीत होणार आहेत. आयसीएआयने १३ ऑक्टोबर रोजी सीए परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या.

CA Exam Admit Card : ICAI CA 2020 परीक्षा २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २०२० या कालावधीत होणार आहेत. ICAI CA 2020 चे सर्व पेपर दुपारी १ वाजल्यापासून सुरू होतील. कोविड-१९ मुळे आधी एक वेळा आणि नंतर बिहार निवडणुकांमुळे परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या.

ICAI CA Exams Admit Card कसं डाऊनलोड कराल?

१) सर्वात आधी अधिकृत वेबसाईट icai.org वर जा.
२) ‘admit card link’ वर जा.
३) विचारलेली सर्व माहित भरा आणि समबीट करा.
४) अॅडमिट कार्ड लिंकवर दिसेल.
५) अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढून ठेवा.

नोव्हेंबर २०२० परीक्षेपासून ऑप्ट ऑउटचा पर्याय

कोविड-१९ संक्रमित उमेदवार आणि आजाराची लक्षणे असलेल्या उमेदवारांना सेल्फ डिक्लेरेशन द्यावं लागेल आणि हा पर्याय ICAI CA नोव्हेंबर २०२० परीक्षांच्या आयोजनाच्या दरम्यानच लागू असले. जे उमेदवार कंटेन्मेंट झोनमधील असतील, त्यांनाही ही योजना लागू आहे.

सोर्स : म. टा.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड