मोठी बातमी – 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार!
Bullet Train Corridor to Create 90000 Jobs
Bullet Train Corridor to Create 90000 Jobs : मोठी बातमी; बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार
Bullet Train Corridor to Create 90000 Jobs : बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बांधकामादरम्यान 90000 हून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. 1 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने ही घोषणा (NHSRCL) केली आहे. या बांधकामाच्या वेळीच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे 90000हून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
51000 पेक्षा जास्त तंत्रज्ञ, कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता असल्याची माहिती महामंडळाच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी निवेदनात दिली आहे. बांधकामासाठी 51000हून अधिक तंत्रज्ञ आणि कुशल व अकुशल कामगारांची आवश्यकता असेल. अशा लोकांना विविध संबंधित कामांसाठी प्रशिक्षण देणार आहे. ट्रॅक लावण्यासाठी, कंत्राटदारांच्या कर्मचार्यांना विशेष प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही कॉर्पोरेशन करेल.
तसेच 34000 पेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी
बांधकाम सुरू असताना 34000पेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, अशी माहिती त्यांनी दिली. 460किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या या ट्रॅकमध्ये एकूण 26 किलोमीटर बोगदे, 27 लोखंडी पूल, 12 स्टेशन्स आणि 7 किलोमीटर अंडरग्राऊंड बोगदे, इतर सुपर स्ट्रक्चर्स आहेत. बांधकाम चालू असताना 75 लाख टन सिमेंट आणि 21 लाख टन स्टील वापरण्याचा अंदाज आहे. यामुळे संबंधित उद्योगांमध्ये आणि त्यांच्याशी संबंधित पुरवठा शृंखलामध्ये रोजगाराच्या अतिरिक्त संधीही निर्माण होतील.
2016 मध्ये स्थापन झालेल्या या महामंडळाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, बांधकामाशी संबंधित काही महत्त्वाच्या कामांच्या निविदा येत्या दोन महिन्यांत खुल्या केल्या जातील आणि त्या अंतिम असतील. जपान सहाय्य प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाचे औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2017मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे केले.
सोर्स : लोकमत