बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “लिपिक” पदाच्या 1846 रिक्त जागा, ऑनलाईन अर्ज करा !! | BMC Lipik Bharti 2024
BMC Lipik Online Bharti 2024
BMC Lipik Bharti 2024
BMC Lipik Bharti 2024 : BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited from eligible candidates for the vacant posts of “Executive Assistant (Clerk)”. There are total of 1846 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned link before the last date. The last date for submitting application For BMC Clerk Bharti is 11th of October 2024. For more details about BMC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कार्यकारी सहाय्यक (लिपिक)” पदांच्या एकूण 1845 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
- पदसंख्या – 1845 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 – 43 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज शुल्क –
- खुल्या वर्गासाठी – रु. 1000 /-
- आरक्षित वर्गासाठी – रु. 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
BMC Clerk Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
कार्यकारी सहाय्यक (लिपिक) | 1845 |
Educational Qualification For BMC Lipik Notification 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कार्यकारी सहाय्यक (लिपिक) | Graduate |
Salary Details For BMC Lipik Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कार्यकारी सहाय्यक (लिपिक) | Rs.25,500/- to 81,100/- |
How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Application 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important date For BMC Clerk Online Application 2024
Pattern of Examination and related instructions
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mcgm.gov.in Lipik Job 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/siDf5 |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/MK2TH |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mcgm.gov.in/ |
आपल्यला माहीतच असेल, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) (Cleark) पदासाठी 1846 जागांची (Job) भरती जाहिरात निघाली आहे. या जाहिरातीसाठी राज्यभरातून या नोकरीसाठी युवकांनी अर्ज केले आहेत. तर, हजारो युवकांना केवळ बीएमसीने पहिल्या प्रयत्नात दहावी पास होण्याची अट घातल्याने अर्ज भरता आला नाही. बीएमसीच्या या जाचक अटीविरुद्ध राज्यभरातून तीव्र संताप करण्यात आला. तसेच, अनेक दिग्गजांनी व राजकीय नेत्यांनीही आवाज उठवला होता. स्वत: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही याबाबत ट्विटरवरुन ही अट रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर, आता बीएमसी प्रशासनाला जाग आली असून भरती प्रक्रियेतील अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर बीएमसीने (BMC) एक परिपत्रक जारी करुन सर्वच उमेदवारांना गुडन्यूज दिली आहे. या भरतीसाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यभरातील लाखो युवकांना, उमेदवारांना याचा लाभ होणार आहे.
बीएमसीकडून आता सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. तसेच, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील,असेही महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. तसेच, मुंबई महापालिकेच्या जाहिरातीनंतर विविध स्तरांवरुन आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली. विशेष म्हणजे बीएमसीच्या अधिकृत ट्वविटर हँडलवरुनही याबाबतचे परिपत्रक शेअर करण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनामः लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी ‘माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अर्हता लागू होती. तथापि, त्यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
BMC कडून सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करुन, ‘कार्यकारी सहायक’ पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध होवून येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनामः लिपिक) संवर्गातील 1846 जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील,असेही महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.