भूमि अभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता! | Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2023
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2023
Bhumi Abhilekh Vibhag Bharti Appointment Letter 2023
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2023: The recruitment process in Land Records Department is in the final stage, 1 thousand 250 land surveyors will join the service from the month of May. This will help to settle the pending land enumeration cases. The exams were also conducted in November last year. Its result was also announced. Now the documents will be scrutinized. The final list of eligible candidates will be announced after April 21. Accordingly, the eligible candidates will be given the appointment letter to be admitted to the Land Records Service on May 1.
शहरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागेवर नव्याने होत नसलेली नियुक्ती तसेच नवीन भरती न होणे या समस्यांमुळे कार्यालयात कार्यरत असणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांवर कामांचा ताण पडत आहे. पाच कर्मचाऱ्यांपैकी दोघा-तिघांना अनेकवेळा शासकीय कामानिमित्त इतरत्र जावे लागते. तालुक्यातील आपापल्या कामांसाठी आलेले ग्रामस्थ कार्यालयात अपुरे कर्मचारी व कामास होत असलेला विलंब या कारणाने त्रस्त होत असुन त्याचे पर्यावसन वादावादीत होत आहे.
भूमापन कार्यालयातही आता मोजणी, पोट हिस्सा मोजणी, बिनशेती मोजणी तसेच मोजणी शुल्क हे गुगल पेद्वारे आकारण्यात येते. सध्याचे युग नईड भ्रमणध्वनी असले तरी बहुतांश नागरिक भ्रमणध्वनीचा वापर करीत नाही. शुल्क हे गुगल पे करावयास सांगण्यात आल्यावर भ्रमणध्वनीत गुगल पे सुविधा नसल्याने नागरिक आणि कर्मचाऱ्यांमधे वादावादी होताना दिसते. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच रोख रक्कम घेत शुल्क आकारावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
जमीन मोजणीचे काम करणाऱ्या भूकरमापकांची राज्यात पदे रिक्त आहेत. राज्यातील भूमी अभिलेख विभागात विविध प्रकारची एकूण चार हजार पदे आहेत. त्यापैकी भूकरमापकांची दीड हजार पदे रिक्त आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भूमिअभिलेख विभागांतर्गत विविध पदांवरील कर्मचाऱ्यांमार्फत फेरफार उतारा, तसेच जमिनीच्या नोंदी, मोजणी याचे काम करण्यात येते. जमीन मोजणीचे काम करणाऱ्या भूकरमापकांची राज्यात पदे रिक्त आहेत. राज्यातील भूमिअभिलेख विभागात विविध प्रकारची एकूण चार हजार पदे आहेत. त्यापैकी भूकरमापकांची दीड हजार पदे रिक्त आहेत. यातील १ हजार २५० पदे भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे जमिनीच्या मोजणीच्या कामांना वेग येत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे.
निकाल जाहीर झाल्याने उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या वर्गवारीनुसार कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे. त्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची २१ एप्रिलनंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्या यादीनुसार पात्र उमेदवारांना येत्या एक मे रोजी भूमिअभिलेख सेवेत दाखल करण्याचे नियुक्तिपत्र दिले जाईल. त्यामुळे मेपासून पुण्यासह राज्यात १२५० भूकरमापक सेवेत रुजू होतील. परिणामी, मोजणीच्या प्रक्रियेला गती येईल.
– आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, जमाबंदी विभाग
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2023
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2023 – Maharashtra Government has Published an Official GR Regarding the establishment of a Regional Selection Committee for filling up the Group-C cadre regional-level posts in the Land Records Department. Consolidated guidelines for filling up posts through direct service have been issued. Under this, Group-B (Non-Gazetted), Group-C and Group-D cadre Posts will be Filled by Saral Seva Bharti Exam. So it is Clear That Maha Govt is Planning to fill another Big Recruitment in Bhumi Abhilekh Vibhag. Check Latest Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2023 Details at below :
निवड झाल्यानंतर प्रशिक्षण घ्यावयाच्या दरम्यानच्या कालवधीत त्याचा वापर करून दुसरीकडे नोकरीसाठी अर्ज करून निवड झाली, की पहिली नोकरी सोडून द्यावयाची, असा अनुभव सध्या सरकारी खात्यांना येत आहे. यामुळे भूमी अभिलेख विभागाने उलटा पर्याय निवडला आहे. भरती केलेल्या उमेदवारांना ‘आधी काम आणि मग प्रशिक्षण’ देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतल्यानंतर संबंधित उमेदवार कामावर राहील यांची शाश्वती झाल्यानंतरच त्यांना प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरही काही उमेदवार गळाल्यास त्यांच्या जागी प्रतिक्षा यादीतील उमेदवार देण्यात येणार आहे.
भूकरमापक या पदाच्या भरतीसाठी नुकतीच परिक्षा घेऊन निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापूर्वी भरती झालेले उमेदवार प्रशिक्षणानंतर सोडून जातात असा अनुभव आहे. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी पुन्हा सरकारकडे मागणी करून भरती प्रक्रिया राबवावी लागते. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन यंदा प्रथमच भरती परीक्षेच्या निकालानंतर प्रतिक्षा यादी जाहीर केली आहे. काही कारणांनी नियुक्त झालेले उमेदवार हजर झाले नाहीत, तर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाईल.
# या भरतीमधून पुणे विभागात २६३, नागपूर विभागात १८९, कोकण-मुंबई विभागात २४४. नाशिक विभागात १०२, औरंगाबाद २०७, तर अमरावती विभागात १०८ रिक्त असलेल्या जागा भरण्यात आल्या.
# यापूर्वी रिक्त जागांवर भरती केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम प्रशिक्षण दिले
# प्रशिक्षण दिल्यानंतर अथवा प्रशिक्षणानंतर अनेक उमेदवार सोडून गेले त्यामुळे ‘भूमी अभिलेख’ने आधी काम नंतर प्रशिक्षणाचा निर्णय घेतला
शासन आदेशान्वये भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील गट-क संवर्गातील पदे भरण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे. आता सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, दिनांक ०४.०५.२०२२ नुसार दिनांक १३.०६.२०१८ रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येवून भूतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
या भूमि अभिलेख लेखी परीक्षेचा नवीन सिलॅबस आणि पॅटर्नसाठी येथे क्लिक करा. तसेच मित्रांनो भूमी अभिलेख परीक्षेचे सराव पेपर्स आणि अपेक्षित प्रश्नसंच आपण या लिंक वर मोफत रजिस्टर करून सोडवू शकता, तेव्हा रोजच सरावला सुरवात करा !!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर शासन निर्णयातील क्र. १ (ब) नुसार प्रादेशिक निवड समितीची रचना विहीत करण्यात आली आहे. त्यानुसार संदर्भ क्र. १ अन्वये जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (म.रा.), पुणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली प्रादेशिक निवड समिती अधिक्रमित करून ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत त्या विभागाचे उपसंचालक भूमि अभिलेख यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यास जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांनी संदर्भ क्र.४ येथील पत्रान्वये विनंती केलेली आहे. यास्तव, भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील गट-क संवर्गातील पदे भरण्यासाठी प्रादेशिक स्तरावरील निवड समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022: The latest update for Bhumi Abhilekh Vibhag Recruitment Exam 2022. The exam date has been declared by the Bhumi Abhilekh Vibhag for Surveyor posts. The exam will be held on the 28th or 29th of November 2022. There are a total of 1000 posts will recruit by this examination. Further details are as follows:-
भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूहातील भूकरमापक तथा लिपिक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदाची परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. आयबीपीएस कंपनीमार्फत राज्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत माहिती विभागाचे अधिकृत संकेतस्थळ http://mahabhumi.gov.in यावर उपलब्ध होणार आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावरील सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेऊन परीक्षा द्यायची आहे. २८ नोव्हेंबर रोजी सत्र एकमध्ये पुणे विभागाची तर सत्र दोनमध्ये कोकण विभागाची परीक्षा होईल. २९ नोव्हेंबर रोजी सत्र एकमध्ये औरंगाबाद विभागाची; तर सत्र दोनमध्ये नाशिक आणि अमरावती विभागाची परीक्षा होणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी सत्र एकमध्ये नागपूर विभागाची परीक्षा होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या ४ मे २०२२ च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असणार आहे.
Also the List of ineligible candidates is published by department. The Candidates who are ineligible for this recruitment are mentioned in this list.
भूमी अभिलेख भरती अंर्तगत अपात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण यादी बघू शकता. काही अडचण असलेलं यादी मध्ये दिलेल्या हेल्प लाईन नंबर वर सपंर्क करावा.
भूमी अभिलेख विभागाच्या वतीने राज्यात भरण्यात येणाऱ्या एक हजार भूकरमापक (सर्व्हेअर) पदाची परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. त्यासाठी परीक्षेच्या तारखा व परीक्षा केंद्रे जाहीर करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा ऑनलाईन होणार आहे. परीक्षा दिनांक 28, 29 & 30 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षा “पुणे विभाग, कोकण (मुंबई) विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक व अमरावती विभाग आणि नागपूर विभाग” या केंद्रांवर होणार आहे.या भूमि अभिलेख लेखी परीक्षेचा नवीन सिलॅबस आणि पॅटर्नसाठी येथे क्लिक करा. तसेच मित्रांनो भूमी अभिलेख परीक्षेचे सराव पेपर्स आणि अपेक्षित प्रश्नसंच आपण या लिंक वर मोफत रजिस्टर करून सोडवू शकता, तेव्हा रोजच सरावला सुरवात करा !!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येवून भूमि अभिलेख विभागातील गट क पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहीरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्रे अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपुर्ण प्रक्रिये अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दिनांक २८/११/२०२२ ते ३०/११/२०२२ या कालावधीत IBPS कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबत संभाव्य वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.
Bhumi Abhilekh Vibhag Exam 2022 – Exam Centres
परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://mahabhumi.gov.in ) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधीत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे असून प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे.
सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक ०४/०५/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते. परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीताची लिंक देखील दिनांक १४/११/२०२२ पासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
भूमी अभिलेख विभागाने भूकरमापक-लिपिक या पदासाठी भरती प्रक्रिया गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये सुरू केली. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. १०२० पदांसाठी राज्यभरातून तब्बल ७६ हजार ३७९ अर्ज ऑनलाइन पद्धतीने भूमी अभिलेख विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ४६ हजार अर्ज वैध ठरले असून या उमेदवारांना पदभरतीची प्रतीक्षा आहे. पदभरतीसाठी पुणे विभागात १६३, कोकण प्रदेश-मुंबई २४४, नाशिक १०२, औरंगाबाद २०७, अमरावती १०८ आणि नागपूर विभागात १८९ जागा भरण्यात येणार आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत भूमी अभिलेख विभागाची परीक्षा ‘आयबीपीएस’कडून घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसारही परीक्षा चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २८ किंवा २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी ज्या खासगी संस्थेकडे परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्य संस्थेकडून १५ नोव्हेंबरनंतर परीक्षार्थीना ई-मेल किंवा भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर परीक्षा केंद्र आणि पावती उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे जमाबंदी आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.
Previous Post –
खुशखबर! अखेर भूमी अभिलेख 1020 पदांच्या भरतीचा मुहूर्त ठरला! IBPS घेणार परीक्षा |
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022: The latest update for Bhumi Abuolekha Vibhag Recruitment 2022. As per the latest news, the Surveyor Recruitment process stoped in Bhumi Abhilekh Vibhag. bhumi abhilekh surveyor bharti 2022 will begin soon in December 2022Further details are s follows:
भूमी अभिलेख विभागाच्या भूकरमापक (सर्वेअर) पदासाठीच्या १०२० पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘आयबीपीएस’कडून ही परीक्षा घेण्यात येणार असून डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षा घेण्याचे नियोजन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या एक वर्षांपासून रखडलेली ही परीक्षा होणार असल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लागू शकणार आहेत. तसेच मित्रांनो भूमी अभिलेख परीक्षेचे सराव पेपर्स आणि अपेक्षित प्रश्नसंच आपण या लिंक वर मोफत रजिस्टर करून सोडवू शकता, तेव्हा रोजच सरावला सुरवात करा !!
भूमी अभिलेख विभागाने भूकरमापक-लिपिक या पदासाठी भरती प्रक्रिया गेल्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये सुरू केली. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. १०२० पदांसाठी राज्यभरातून तब्बल ७६ हजार ३७९ अर्ज ऑनलाइन पद्धतीने भूमी अभिलेख विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ४६ हजार अर्ज वैध ठरले असून या उमेदवारांना पदभरतीची प्रतीक्षा होती. पदभरतीसाठी पुणे विभागात १६३, कोकण प्रदेश-मुंबई २४४, नाशिक १०२, औरंगाबाद २०७, अमरावती १०८ आणि नागपूर विभागात १८९ जागा भरण्यात येणार आहेत.
एकीकडे पाय बांधायचे आणि दुसरीकडे पळण्याचे आदेश द्यायचे’ अशी काहीशी अवस्था भूमी अभिलेख विभागाची झाली आहे. या विभागातील सर्व्हेअर (Surveyor – भूकरमापक) या पदासाठी एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन एक वर्ष होत आले. अद्यापही त्यास राज्य सरकारकडून मान्यता न मिळाल्याने भरती होऊ शकलेली नाही. या रिक्त पदांमुळे राज्यात एक लाखाहून अधिक मोजणी अर्ज प्रकल्प प्रलंबित पडले आहेत. असे असताना डिसेंबरपर्यंत ही सर्व प्रकरणे मार्गी |लावा, अशा सूचना महसूल मंत्र्यांनी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. एकट्या पुणे |जिल्ह्यात सध्या चार हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे काम सुरू आहेत. त्यापैकी काही प्रकल्प मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत, तर काही प्रकल्प हे सर्वेक्षणाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे मोजणीच्या अर्जाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे मात्र भूमि अभिलेख विभागात ३३ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामध्ये सर्व्हेअर या पदाच्या दीड हजार जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम दाखल होणाऱ्या मोजणी अर्जावर होत असून प्रलंबितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पदभरती न झाल्याने यंदा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बोलताना भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘सप्टेंबर महिन्यात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाचा आढावा घेतला. त्यामध्ये विभागाची रखडलेली पदभरती आयबीपीएसकडून घेण्याबाबत राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला असून मान्यता देण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस परीक्षा घेणार असल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात परीक्षा होऊ शकेल.’
पदभरती का रखडली?
उमेदवारांच्या अर्जामधील त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करत असतानाच राज्यातील पोलिस भरती, आरोग्य भरती, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) तसेच म्हाडा या अनेक विभागांतील परीक्षा घेण्यापूर्वीच पेपर फुटले. या परीक्षा घेणाऱ्या एका खासगी कंपनीकडे भूमी अभिलेख पदभरतीचे काम देण्यात आले होते. संबंधित कंपनीचे व्यवहार पोलिसांनी ठप्प केल्याने भूमी अभिलेख पदभरतीसाठीचा सर्व विदा अनेक महिने संबंधित कंपनीकडून विभागाला मिळूच शकला नाही. त्यानंतर पोलीस, न्यायालय अशा विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यात आला आणि पदभरतीबाबतचा सर्व विदा प्राप्त करण्यात आला. या प्रक्रियेतही बराच वेळ खर्ची पडला.
महत्त्वाचे – भूमी अभिलेख विभागात 1250 कर्मचाऱ्यांची भरती रखडली – Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 : There are a total of 1250 employees recruitment stopped in Bhumi Abhilekha Vibhag Maharashtra. Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2022 will be soon. Further details are as follows:-
1250 कर्मचाऱ्यांची भरती रखडली
भूमी अभिलेख विभागात विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मात्र, कर्मचायांच्या तुटवड्यामुळे त्यात अडथळे निर्माण झाले आहेत. सर्वेअरची १२५० कर्मचायांची भरती प्रक्रिया थांबली आहे. तातडीने ही भरती केली पाहिजे, असे विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीराम खिरेकर यांनी सांगितले.
भूमी अभिलेख विभागाची अर्हता परीक्षा पास झालेल्या या विभागातील ७६ कर्मचाऱ्यांना बढती मिळाली आहे. परीरक्षक भूमापक आणि निमतानदार यांना शिरस्तेदार व मुख्यालय सहायक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊनही कर्मचाऱ्यांना वर्ग-२ च्या पदावर पदोन्नती मिळाली नव्हती. प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाच्या आलेल्या संवर्गावर जाण्यासाठी त्यांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. अखेर जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांनी ५ ऑगस्टला एकाचवेळी राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. पदसमूह तीनमध्ये तीन वर्षे सेवा व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निमतदार व परिरक्षक भूमापक यांना पदोन्नती मिळाली. ते आता पदसमूह दोनमध्ये समाविष्ट झाले आहे. या पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना पुढे गट ‘ब’ राजपत्रित अधिकारी वर्गदोनमध्ये पदोन्नतीचा मार्गही मोकळा झाला आहे.
मुख्यालय सहायक व शिरस्तेदार ही पदे भरल्यामुळे अनेक कार्यालयांमध्ये रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. सध्या या विभागात गावठाण मोजणीची कामे सुरू आहेत. यासाठी मोठे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. शिवाय, ड्रोन सर्व्ह, ई-मोजणी, आदी प्रकल्प या विभागामार्फत राबविली जात आहे.
विभाग – पदोन्नत कर्मचारी
- अमरावती -१५
- नाशिक -१६
- पुणे -१८
- औरंगाबाद -९
- मुंबई -१८
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 – 2023- Exam Update
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022: प्रशासनाच्या विविध खात्यांतील भरती परीक्षा घोटाळय़ांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवीन धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार महसूल विभागांतर्गत होणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग, जमाबंदी आयुक्तालयातील वर्ग-ब (अराजपत्रित) वर्ग-क श्रेणीतील पदांच्या परीक्षा सरळसेवा पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार एकाच खासगी संस्थेमार्फत परीक्षा घेण्याचा राज्य सरकारचा मानस असून घोटाळे करणाऱ्या कंपन्यांना काळय़ा यादीत टाकून पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाची परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून आता ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
- सरकारच्या नवीन धोरणानुसार महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती बनविण्यात आली आहे.
- या उपसमितीमध्ये मंत्रालयातील संबंधित विभागांचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, जमाबंदी आयुक्तालय, मुद्रांक शुल्क विभागातील एक सदस्य अधिकारी यांचा समावेश आहे.
- तत्पूर्वी संबंधित विभागातील सदस्यांनी खातेनिहाय पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसंदर्भातील कार्यपद्धती, नियमावली आणि शिफारशी उपसमितीकडे केल्या आहेत.
- या उपसमितीच्या दोन बैठका नुकत्याच पार पडल्या असून गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या भूमी अभिलेख विभागातील भू-करमापक (सर्वेअर) पदासाठीची परीक्षा येत्या ऑगस्टअखेर घेण्यात येण्याचा विभागाचा मानस आहे.
- याबाबत बोलताना भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘राज्यातील पोलिस भरती, आरोग्य भरती, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) तसेच म्हाडा या अनेक विभागांतील परीक्षा घेण्यापूर्वीच पेपर फुटले.
- या घोटाळय़ात परीक्षा नियोजन करणाऱ्या खासगी कंपन्यांचाच सहभाग असल्याने भूमी अभिलेख विभागाची परीक्षा देखील रद्द करण्यात आली.
- ही परीक्षा घेण्यात येणार असताना राज्य सरकारने पुन्हा नव्याने बदल करून परीक्षा घेणाऱ्या खासगी संस्थांची नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यासंदर्भात नियोजन केले आहे.
- त्यानुसार भूमी अभिलेख विभागातील विविध पदांसाठीची परीक्षा महसूल विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येणार आहे.
- त्यानुसार खासगी संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या असून आतापर्यंत टाटा कन्सलट्न्सी सव्र्हिसेस (टीसीएस), आयबीपीएस, एमकेसीएल आणि इतर कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत.’
पात्र कंपनीची राज्य, विभागनिहाय पडताळणी
परीक्षा घोटाळय़ात सापडलेल्या कंपन्यांना काळय़ा यादीत टाकण्यात आले आहे. परीक्षा पद्धत पारदर्शक आणि सुरळीत पद्धतीने पार पाडण्यासाठी या खासगी संस्थांची निवड करताना निकष लावण्यात आले आहेत. या निकषांची पडताळणी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उपसमितीमार्फत करण्यात येणार असून पात्र ठरणाऱ्या कंपनीची राज्य आणि विभागनिहाय पडताळणी करून पुढील परीक्षा पद्धत राबविण्यात येणार आहे, असेही रायते यांनी सांगितले.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 – Update
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 :Written Exam of Bhumi Abhilekh (Land Record Department) is declared now. Now as per new GR Written Examinations will be carried on computers through Computer Based Examinations i.e. CBT. The New Exam Timetable & Schedule will be available soon. You can do the practice of this CBT on MahaBharti Exam, we have given a Question Papers with Expected questions on MahaBharti Exam.
कर्मचाऱ्यांची वानवा, साहित्याचा तुटवडा आदी कारणांमुळे राज्यातील सहा विभागांमध्ये शेती, प्लॉट, घराच्या एक लाख सात हजार ८०० मोजण्या रखडल्या आहेत. विशेष म्हणजे, अर्ज दाखल झाल्यानंतर महिनाभरात करावयाच्या अतितातडीच्या मोजण्याही लांबणीवर पडत आहेत. सर्वाधिक मोजण्या पुणे विभागात प्रलंबित असून सर्वात कमी औरंगाबाद विभागात आहेत.
भूमी अभिलेख विभागात सर्वेअरची ४,५०० पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २,५०० जणांवर काम भागवले जात आहे. दीर्घ काळापासून १,५०० जागा रिक्त आहेत.अलीकडे ५००हून अधिक सर्वेअरच्या पदोन्नत्या झाल्या. कर्मचारी तुटवड्याचा परिणाम मोजणीच्या कामावर झाला आहे. साधारणत: नोव्हेंबरपासून मोजणीच्या कामाला गती दिली जाते. परंतु, याकाळात ड्रोन सर्वेक्षणाची कामे हाती घेण्यात आली. बहुतांश यंत्रणा ड्रोन सर्वेक्षणासाठी वापरण्यात आली. त्यामुळे या काळात मोजण्या रखडल्या. मोजणीच्या साहित्याचाही तुटवडा आहे. गरजेइतकीच प्लेन टेबल, सर्वेअरच्या प्रमाणात इटीएस मशीन नाहीत. परिणामी या विभागात साधारण मोजणीचे अर्ज तर अमर्याद कालावधीसाठी पडून राहात आहेत.
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 Exam Date : Bhumi Abhilekh Vibhag Bharti Written Exam date details are given below. As per the latest update The Exam will be scheduled till end of May 2022. For More details read the details given below.
भूमी अभिलेख विभागाची भरती परीक्षा मे अखेरीस!
Department of Land Records भूमी अभिलेख विभागाची विविध कारणांनी रखडलेली भरती परीक्षा मे अखेरीस घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Department of Land Records ही परीक्षा घेण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) संस्थेची निवड करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत टीसीएसचे अधिकारी आणि Department of Land Records भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक होऊन, मागील चार महिन्यांपासून रखडलेली परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो भूमी अभिलेख परीक्षेचे सराव पेपर्स आणि अपेक्षित प्रश्नसंच आपण या लिंक वर मोफत रजिस्टर करून सोडवू शकता, तेव्हा रोज सराव करा आणि यशस्वी व्हा !!
महाराष्ट्र Department of Land Records भूमी अभिलेख विभागाकडून अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या विभागांकरिता एक हजारांवर रिक्त पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. पदभरतीसाठी पुणे विभागात 163, कोकण प्रदेश-मुंबई 244, नाशिक 102, औरंगाबाद 207, अमरावती 108 आणि नागपूर विभागात 189 जागा आहेत. जानेवारी महिन्यात होणार्या या परीक्षेसाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. मात्र, म्हाडाच्या ऑनलाईन परीक्षेत अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून Department of Land Records भूमी अभिलेखची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिस कारवाई, भरतीसाठी प्राप्त अर्जांमधील चुकांची दुरुस्ती अशा कारणांमुळे परीक्षेला विलंब झाला आहे.
बीड जिल्ह्यात केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यात उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. सदर कार्यालय शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्यालय आहे असे सांगून आ. मुंदडा म्हणाल्या की, केवळ कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोजणीची कामे रखडली आहेत.
बीड जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयातील रिक्त पदांअभावी या कार्यालयातील होणारी कामे खोळंबल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. वारंवार आपल्या कामासाठी कार्यालयात खेटे घालण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. ही बाब लक्षात घेऊन भूमिअभिलेख कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत अशी मागणी केज मतदार संघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदनाद्वारे केली आहे.
Bhumi Abhilekh Vibhag Scrutiny Application Date Extended
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022: The process of filling up the scrutiny application in Group C post 4 categories of Land Records Department has been started from 28/02/2022. The last date for filing the scrutiny application has been announced on 09/03/2022. However, as per the demand made by the candidates by contacting the helpline, the deadline for filling up the scrutiny application is being extended till 13/03/2022. Further details are as follows:-
भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 संवर्गातील छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 28/02/2022 पासून सुरू करण्यात आलेली आहे. छाननी अर्ज भरण्याची अंतीम दिनांक 09/03/2022 रोजी घोषीत करण्यात आलेली आहे. परंतु हेल्पलाईन वर संपर्क साधुन उमेदवारांनी केलेल्या मागणीनुसार छाननी अर्ज भरण्यास दिनांक 13/03/2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
त्यानुसार दिनांक 28/02/2022 रोजी सकाळी 10:00 वाजले पासून छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 13/03/2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. यानंतर छाननी अर्ज भरण्यास कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच दिलेल्या मुदतीत जे उमेदवार छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण करणार नाहीत असे उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेकरीता अपात्र समजण्यात येतील. छाननी अर्ज भरताना अडचण आल्यास उमेदवारांनी 020-25712712 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Bhumi Abhilekh Vibhag Application Update
Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 : The period for filing scrutiny application will be from 10:00 AM on 28/02/2022 to 23:59 PM on 09/03/2022. Further details are as follows:-
भूमि अभिलेख विभाग ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जांमध्ये अनेक त्रुटी आढळल्याने ज्या उमेदवारांनी उक्त कालावधीत भूमि अभिलेख विभागाचे पदभरतीकामी अर्ज सादर केले आहे, अशा उमेदवारांकडून छाननी अर्ज (Scrutiny Form) भरुन घेण्यात येत आहेत. छाननी अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक 28/02/2022 सकाळी 10:00 वाजलेपासून दिनांक 09/03/2022 रोजी 23:59 वाजेपर्यंत असेल.
तरी, यापुर्वी उपरोक्त परिक्षेकरीता शुल्कासह अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील सुचनांनुसार छाननी अर्ज भरावा. जे उमेदवार वर नमुद कालावधीमध्ये छाननी अर्ज भरणार नाहीत त्यांचा अर्ज रद्द समजणेत येईल.
भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भुकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक 09/12/2021 रोजी जाहीरात प्रसिद्ध करुन दिनांक 09/12/2021 ते दिनांक 31/12/2021 अखेर ऑनलाईन अर्ज मागविणेत आले होते. सदर भरतीप्रक्रिया ज्या कंपनी मार्फत राबविण्यात येणार होती त्या कंपनीद्वारे शासनाच्या इतर विभागात आयोजित केलेल्या विविध परिक्षांमध्ये झालेले गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे या विभागाकडून केवळ उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सदर कंपनीद्वारे राबविण्यात आली.
अर्ज करा – https://bit.ly/3Iuz0Tr
Table of Contents
New Update