बँकिंग, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स सेक्टर मध्ये ५०,००० पदांची भरती होणार! – BFSI Jobs 2023

BFSI Jobs 2023

BFSI Jobs 2023 – There is great news for job seekers. Banking, Financial Services and Insurance (BFSI) sector is going to provide a lot of jobs in the coming time. These opportunities will be available due to growth in credit card sales, personal finance and retail insurance sales. Increased spending power of the people has boosted the economy. Therefore, as many as 50 thousand jobs are likely to be created in this sector in the second half of 2023. Teamlease Company has published a report in this regard.

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. बँकिंग, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (BFSI) क्षेत्रामध्ये येत्या काळात भरपूर रोजगार उपलब्ध होणार आहेत. क्रेडिट कार्ड सेल, पर्सनल फायनान्स आणि रिटेल इन्शुरन्स विक्रीमध्ये वाढ झाल्यामुळे या संधी उपलब्ध होणार आहेत. लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. त्यामुळे 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत या क्षेत्रात तब्बल 50 हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. टीमलीज कंपनीने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सणासुदीचा काळ आहे कारण
ऑगस्ट महिन्यांपासून भारतात सगळीकडे सणांची रेलचेल असते. पुढच्या पाच महिन्यांपर्यंत देशात कित्येक मोठे सण असतात. यामुळे लोकांची खरेदी वाढते. यासाठी कित्येक लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. यामुळे BFSI सेक्टरमध्ये कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे. यामध्ये ई-कॉमर्स, रिटेल, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि स्मार्टफोन या क्षेत्रांचा समावेश आहे. क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि इन्शुरन्स प्रॉडक्टची देखील मागणी वाढते आहे.

 

कोणत्या शहरांमध्ये वाढ?
सणासुदीच्या काळात या क्षेत्रातील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची मागणी नेहमीच वाढते. विशेषतः अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, कोलकाता, कोची, विशाखापट्टणम, मदुराई, लखनऊ, चंदिगढ, अमृतसर, भोपाळ आणि रायपूर या शहरांमध्ये ही वाढ दिसून येते. या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगार किंवा भत्त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 7 ते 10 टक्के वाढ झाल्याचं दिसत आहे. टीमलीजच्या रिपोर्टनुसार, ऑन-दि-फीट रोलसाठी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये 20 ते 22 हजार रुपये पगार देण्यात येतो आहे.

 

दोन महिन्यात 25,000 नोकऱ्या

टीमलीजचे उपाध्यक्ष कृष्णेंदू चॅटर्जी यांनी सांगितलं, की येत्या काही पाच ते सहा महिन्यांमध्ये या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. याची सुरूवात आधीपासूनच झाली असून, गेल्या दोन महिन्यांमध्ये सुमारे 25,000 ओपनिंग्स भरल्या असल्याची माहिती चॅटर्जी यांनी दिली.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड