BEd Bridge Course for Shikshak – बीएड पदवीच्या आधारे प्राथमिक शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सहा महिन्यांचा विशेष ‘सर्टिफिकेट कोर्स इन प्रायमरी टीचर एज्युकेशन’ (पीटीई) असा ‘ब्रिज कोर्स’ सुरू केला आहे. याच्या माध्यमातून शिक्षकांना ऑनलाईन अध्यापनासह प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवता येणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरावरील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अध्यापन कौशल्ये आणि व्यावसायिक क्षमता विकसित करणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. बालकेंद्री, सर्वसमावेशक व समान शैक्षणिक पद्धतींचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाणार आहे.

अभ्यासक्रमात २० दिवसांचा शालेय अनुभव, प्रॅक्टिस टीचिंग, रिफ्लेक्टिव्ह जर्नल व पोर्टफोलिओ तयार करणे अनिवार्य आहे. तसेच, दहा दिवसांचे ऑनलाईन कॉन्टॅक्ट क्लासेस घेण्यात येणार आहेत. ‘ओपन अँड डिस्टन्स लर्निंग’ पद्धतीमुळे शिक्षकांना नियमित नोकरी सांभाळून हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. व्हिडीओ ट्युटोरियल्स, ई-लर्निंग साहित्य व डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात येईल. अभ्यासक्रमाचे शिक्षण हिंदी व इंग्रजीत असले तरी थिअरी परीक्षा २२ पैकी कोणत्याही एका भाषेत देता येणार आहे. अधिक माहिती ‘एनआयओएस’च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















