बॅन्ड्समन कौशल्य चाचणीस उपस्थित रहाण्याची शेवटची संधी! – BandsMan Kaushalya Chachani
Police Bharti BandsMan Kaushalya Chachani
पोलीस भरती २०२२-२०२३ करीता ठाणे ग्रामीण घटकातील पोलीस शिपाई-बॅण्डस्मन पदाच्या वाद्य वाजविण्याची अर्हता चाचणी (कौशल्य चाचणी) ज्या उमेदवारांचे कोणत्याही कारणास्तव राहिली असेल किंवा उमेदवार त्यांच्या वैयक्तीक अडचणीमुळे बोलाविलेल्या दिवशी उपस्थित राहू शकले नाहीत, अशा उमेदवारांसाठी दि.१९/०७/२०२४ रोजी शेवटची संधी देण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी वर नमुद ठिकाणी पहाटे ०५.३० वाजता वाद्य वाजविण्याची कौशल्य चाचणीकरीता येतांना ऑनलाईन प्रवेशपत्र (या कार्यालयाने शिक्का मारुन दिलेला) तसेच सोबत २ रंगीत फोटो व आधारकार्ड सोबत आणावे. प्रवेशपत्र न आणल्यास वाद्य वाजविण्याची कौशल्य चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सोबत येताना दि. १९/०७/२०२४ रोजीनंतर आलेल्या कोणत्याही उमेदवारांची वाद्य वाजविण्याची अर्हता चाचणी (कौशल्य चाचणी) कोणत्याही परिस्थितीत घेतली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.