Bageshwar baba in Nagpur – नागपूरातील जामठा परिसरात उभारल्या जाणाऱ्या ‘भारत दुर्गा मंदिर’ाच्या भूमिपूजन सोहळ्याला राजकीय व धार्मिक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असतानाच बागेश्वर बाबांच्या संभाव्य उपस्थितीमुळे अंधश्रद्धा विरुद्ध विवेकवादाचा वाद पुन्हा चिघळला आहे. ‘अंनिस’ने ८० लाखांचे खुले आव्हान देत वातावरण तापवले आहे.डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्थेच्या वतीने जामठा परिसरात ‘भारत दुर्गा मंदिर’ उभारण्यात येत असून, त्याच्या भूमिपूजनाचा सोहळा आज पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या उपस्थितीची शक्यता व्यक्त होताच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यामधील संघर्ष पुन्हा एकदा पुढे आला असून, शहरात या विषयावर चर्चा रंगू लागली आहे.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना पुन्हा एकदा खुले आव्हान दिले आहे. “स्वतःकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणाऱ्यांनी तो वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करून दाखवावा. तसे केल्यास ८० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल,” असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याआधी जानेवारी २०२३ मध्ये नागपुरात झालेल्या कार्यक्रमावेळी समितीने ३० लाखांचे आव्हान दिले होते. मात्र, ते स्वीकारले गेले नसल्याचा दावा समितीने केला आहे. या आव्हानासाठी समितीने विशिष्ट निकष ठरवले आहेत. दहा व्यक्तींची वैयक्तिक माहिती सीलबंद लिफाफ्यात ठेवण्यात येईल आणि संबंधित दावेदाराने ती अचूक सांगणे अपेक्षित असेल. तसेच, स्वतंत्र खोलीत ठेवलेल्या वस्तूंची ओळख ‘दिव्य शक्ती’च्या आधारे करून ती लेखी नोंदवावी लागेल. ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार असून, किमान ९० टक्के अचूकता आवश्यक असेल. राज्यात मागील काही वर्षांत भोंदूगिरीला खतपाणी मिळाल्याची टीका करत, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जादूटोणा प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही श्याम मानव यांनी केली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















