आशा वर्कर्सच्या मानधनात ३ हजार वाढ, पूर्ण माहिती आणि महत्वाचा अपडेट जाहीर! – Asha Swayamsevika Bharti 2026

Asha Swayamsevika Bharti 2026

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते. आशा सेविका ही गावातील स्थानिक असते. आशा सेविकेकडून गावातील आरोग्यविषयक समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी नेतृत्व करणे हे योगदान अपेक्षित असतं. साथीच्या रोगाबाबत जनजागृती आणि उपचारासाठी मदत करणे, कुटुंब कल्याण योजनेचा प्रचार करणे, माता आणि बालआरोग्याविषयी प्रबोधन करणे (उदाहरणार्थ, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या देणे, योग्य आहार घेणे), जन्म आणि मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, किरकोळ आजारांवर औषधं देणे अश्या जबाबदार्‍या आशा सेविकांवर असते. आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था, ग्रामस्थ आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्यासंदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे, वाटाघाटी निर्माण करणे यादृष्टीने ‘आशा सेविका’ सामाजिक दुवा म्हणून काम करतात. राज्यभरात साधारण 70 हजार आशा सेविका कार्यरत आहेत. आदिवासी जिल्ह्यांमध्ये 1 हजार लोकसंख्येमागे 1 आशा सेविका नियुक्त आहे तर बिगर आदिवासी जिल्ह्यात 1500 लोकसंख्येमागे 1 आशा सेविका नियुक्त आहे.

केरळचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखालील यूडीएफ सरकारने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय जाहीर केले. राज्यातील महिलांना १५ जूनपासून केरळ राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास दिला जाईल. याव्यतिरिक्त, आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात ३,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे तळागाळातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करताना मुख्यमंत्री सतीशन यांनी आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणाही केली. मुख्यमंत्री सतीशन म्हणाले की, सचिवालयासमोर आशा सेविकांनी केलेल्या प्रदीर्घ आंदोलनादरम्यान दिलेले वचन पूर्ण करत, मंत्रिमंडळाने त्यांच्या मानधनात दरमहा ३,००० रुपयांच्या वाढीस मंजुरी दिली आहे. त्यांनी अंगणवाडी सेविका आणि सहाय्यक, शालेय स्वयंपाकी, पूर्व-प्राथमिक शिक्षक आणि आया यांच्या मानधनात दरमहा १,००० रुपयांच्या वाढीची घोषणाही केली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 

Asha Swayamsevika Bharti 2026: Asha is an important link between the health department and the villagers in the rural health campaign and the villagers are expressing the hope that suitable Asha volunteers should be selected through fair selection. This Written Exam is going to conducted on 24th April 2023. Know about Exam Pattern at below:

वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी यांच्या १७ एप्रिल २०२३ सरपंच, सचिव यांना पाठविलेल्या पत्रानुसार  अर्ज करण्याची तारीख १७ ते २२ एप्रिल | प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी अंतर्गत सौंदड, बोपाबोडी, पुटाळा फुटाळा (शास्त्री वॉर्ड), खोडशिवनी, घाटबोरी/को, तिडका, पलसगाव, राका, चिखली, कोकणाटोली अशा एकुण अकरा गावामध्ये आशा कार्यकर्ता निवड करावयाची आहे. निवड प्रक्रिया ही निष्पक्ष प्रमाणिक होईल यांची पूरेपूर काळजी घ्यावी. जेणेकरून सुयोग अशा आशा कार्यकर्ता गावाच्या सेवेत आपले योगदान देवू शकेल, यासाठी विशिष्ट निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अर्ज करण्याची तारीख १७ ते २२ एप्रिल असून लेखी परीक्षा २४ एप्रिलला पार पडणार आहे.हि परीक्षा कशी होणार आणि परीक्षा पॅटर्न कसा असेल या बद्दल पूर्ण माहिती या लिंक वर दिलेली आहे. 

 

Asha Sevika Written Exam Date 2023-११ गावात होणार अशा सेविका लेखी परीक्षा २४ एप्रिलला; जाणून घ्या परीक्षा पॅटर्न

Previous Update : The latest update for Asha Swayam Sevika Recruitment 2026. As per the latest news, there are a total of 5000 + 266 New Swayamsevika posts that will be recruiting soon in the Municipal Corporation. It has been decided to recruit five thousand Asha sevaks into the service. This time the remuneration given to aasha swayam sevika will be more that the rules of central government, So this is the golden opportunity for this job seekers. Further details are as follows:-

मिरा-भाईंदर महापालिकेच्या आस्थापनेवरील काही महत्त्वाची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ‘आशा’ सेविकांची रिक्त असलेली २७६ पदे भरण्याचा निर्णयही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच समिती गठीत करून आवश्यक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मिरा-भाईंदर पालिका हद्दीत आशा सेविकांच्या मदतीने आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करणे, लसीकरण कार्यक्रम, कुपोषित बालकांचा शोध घेणे व इतर सरकारी योजनांचे काम केले जात आहे. यासाठी सध्या अनेक आशा सेविका ठोक मानधनावर कार्यरत आहेत. परंतु, मागील काही वर्षांत शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, मनुष्यबळ अपुरे पडत आहे. परिणामी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने आशा सेविकांची २७६ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी, पालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूददेखील करण्यात आली आहे. यासाठी एक विशेष समिती स्थापन करत त्यांच्या मदतीने आरोग्य केंद्र स्तरावर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच आवश्यक कार्यवाहीदेखील सुरू केली जाणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.

BMC Asha Sevika Bharti 2023 – पालिकेमध्ये १६६ आशासेविकांसाठी भरती; २४ एप्रिलपर्यंत इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन 

मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) आशा सेविका (Asha Sevika) भरतीमध्ये विवाहित आशा सेविकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिकेत वस्ती पातळीवर गृहभेटीद्वारे नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधाकरिता आशा सेविका या कामावर आधारित मोबदला तत्त्वावर नेमणूक करायची आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने या संदर्भात जाहिरात काढली असून यामध्ये विवाहित (Married) आशा सेविकांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे.

 

आशा सेविकांसाठी वयाची अट
मुंबई महापालिकेच्या आरोग्य केंद्रात 1000 ते 1200 लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविका आणि अशा 250 घरांकरता नेमणूक करण्यात येईल. निवडीच्या निकषांमध्ये जरी ही अट दिली नसली तरी यामध्ये विवाहित आशा सेविकांना प्राधान्य देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. शिवाय आशा सेविकांची वयोमर्यादा सुद्धा 25 ते 40 वर्षे ठेवण्यात आली आहे.

 

‘या’ कारणासाठी विवाहित आशा सेविकांना प्राधान्य
या आशा सेविकांवर विविध आजारांचे रुग्ण, गरोदर माता आणि बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत प्रबोधनाची तसेच उपाययोजनांचीही जबाबदारी यामध्ये असणार आहे. विवाहित महिला असली तर कुटुंब नियोजन, गरोदर माता यासंबंधीच्या विषयांवर संवाद साधणे सोपे जाते त्यासाठी ही अलिखित अट असल्याचं सांगितलं गेलं आहे.

 

आशा सेविका कोण असतात, त्या नेमकं काय काम करतात?

 

मुंबई महानगरपालिकेत वस्तीपातळीवर गृहभेटीद्वारे नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविण्याकरिता आशा सेविका या कामावर आधारित मोबदला या तत्त्वावर नेमणूक करावयाची आहे. विहित अर्हता व अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून विभागवार अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुंबई जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

आशा सेविकायांचे कामाचे स्वरूप
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात, १००० ते १२०० लोकसंख्येसाठी एक ‘आशा’ स्वयंसेविका व अंदाजे २५० घरांकरिता नेमणूक करण्यात येईल. आशासेविका वस्तीपातळीवर गृहभेटी देवून सर्वेक्षण करतील. त्यांना नेमून दिलेल्या परिसरात सर्वेक्षण करुन विविध आजारांचे रुग्ण, गरोदर माता व बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार इत्यादीबाबत प्रबोधन व उपाययोजनाबाबत कार्य करतील.

आशा सेविकेसाठी निवडीचे निकष व अर्हता :

  • ‘आशा’ स्वयंसेविका महिला असणे आवश्यक आहे व वयोमर्यादा २५ ते ४५ असावी.
  • ‘आशा’ स्वयंसेविकेमध्ये नेतृत्व गुण असावेत व समुदायाशी संवाद साधण्याची क्षमता असावी.
  • ती साक्षर महिला असावी व तिचे किमान १० वी पर्यंत औपचारिक शिक्षण झालेले असावे.
  • इच्छुक सेविका विभागातील शक्यतो जवळ राहणारी असावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख३१ मार्च २०२३ आहे 

 

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय (ए ते टी विभाग कार्यालय)

अर्ज स्वीकारण्याचा कालावधी- १३ मार्च २०२३ ते ३१ मार्च २०२३

मानधन साधारण रु. ६०००/- पर्यंत प्रति महिना (कामावर आधारित मोबदला )

PDF जाहिरात पहा

 


मुंबई पालिकेच्या वैद्यकीय व्यवस्थेमध्ये आशा सेविकांचे काम महत्त्वाचे आहे. करोना प्रादुर्भावात त्यांनी केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली आहे. संसर्गजन्य तसेच विविध स्वरूपाच्या आजाराचे निदान होण्यासाठी सर्वेक्षण करणे, लसीकरण कार्यक्रम, कुपोषण अशा उपक्रमांमध्ये आशा सेविकांची मदत घेतली जाते.

 

सध्या मुंबई पालिका क्षेत्रात १ हजार १५० आशा सेविका असून त्यांना मानधन दिले जाते. सध्याच्या आशा सेविकांची संख्या पाहता पालिकेच्या विविध विभागातील आरोग्यकेंद्रामध्ये एक हजार ते एक हजार २०० लोकसंख्येमागे एक आशा सेविकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार पाच हजार आशा सेविकांची नियुक्ती करण्याचे नियोजन होते आणि त्याला सुरुवात झाली आहे.

 

कांदिवली पश्चिमेच्या आर दक्षिण विभागात ४१५ सेविकांची नियुक्ती केली जाणार असून त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी नमुना व निवडीचे निकषही देण्यात आले आहेत. इच्छुक सेविका विभागातील आणि शक्यतो जवळ राहणारी असावी, किमान शैक्षणिक अर्हता दहावी असावी, २५ ते ४५ वयोगट आणि विवाहित असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. २४ मार्चपर्यंत कांदिवलीच्या आर दक्षिण विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालयात सादर करण्यास सांगितले आहे. मुंबईतील पालिकेच्या अन्य विभागतही आशा सेविकांची भरती प्रक्रिया सुरू आहे.


Asha Swayam Sevika Recruitment 2026

प्रकल्प अंमलबजावणी आराखडा २०२२-२३ मध्ये आशा योजनेंतर्गत आशा सेविकांची सांगली जिल्ह्यासाठी २६६ पदे मंजूर झाली आहेत. सध्या जिल्ह्यात १९५९ आशा सेविका कार्यरत आहेत. यामध्ये नवीन मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक सेवा नागरिकांना सहजतेने उपलब्ध होणार आहे. आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या विशेष प्रयत्नाने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या पाठपुराव्याने आशा सेविकांची जिल्ह्यासाठी २६६ पदे मंजूर झाली आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबविण्यात येत ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय साधण्याच्या दृष्टीने आशा सेविका महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत.

Aasha Swayam Sevika Bharti 2022

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड