Artificial Intelligence Jobs Update
डिजिटल युगात जग वेगाने बदलत आहे. बहुतांश प्रक्रिया आता ऑनलाईन झाल्याने “ग्लोबल व्हिलेज” ही संकल्पना अक्षरशः वास्तवात उतरत आहे. मात्र या प्रगतीसोबत गंभीर दुष्परिणामही डोके वर काढत असून, सर्वात मोठा धोका कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) रोजगार क्षेत्रावर निर्माण करत आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती आहे. येत्या ५ ते ६ वर्षांत एआयचा १० प्रकारच्या नोकऱ्याना फटका बसणार आहे.
मोठ्या मोठ्या टेक कंपन्या टीसीएस, इंटेल, टेस्ला, गुगल, मेटा आणि इतर कंपन्यांनी एक
लाखांहून अधिक लोकांना घरचा रस्ता दाखवला आहे. काही पदाचे काम एआय करत आहे
याविषयीच्या एका अहवालानुसार, येत्या ५ वर्षांत जगात अनेक गोष्टी झपाट्याने बदलतील. एआयमुळे जॉब मार्केट जवळपास २२ टक्क्यांनी बदलेल. जगभरात थोड्या थोडक्या नाही तर ९.२ कोटी नोकऱ्या जातील. येथील कर्मचाऱ्यांना सहानुभुतीवर काही दिवस नोकरी करु दिले जाईल. पण त्यांच्या जागेवर नवीन कर्मचारी भरती करण्यात येणार नाही.
या नोकऱ्यांवर गंडांतर?
यामध्ये पोस्टल सर्व्हिस क्लर्क, डाटा एंट्री ऑपरेटर्स, बँक टेलर्स आणि क्लर्क, रोखपाल, तिकीट क्लर्क, बुककिपिंग, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी, स्टॉक किपिंग, मटेरिअल रेकॉर्डिंग क्लर्क, डोअर टु डोअर सेल्स वर्कर्स, कंडक्टर, न्यूज वेंडर, दळणवळणातील काही नोकऱ्या यासह इतरही काही नोकऱ्यांवर गंडांतर येऊ शकते.
नवीन कौशल्य शिकण्याची गरज
दुसऱ्या बाजुला एआयमुळे काही कौशल्य आत्मसात करणाऱ्या लोकांना नोकरी सुद्धा मिळाली आहे. काही नवीन नोकऱ्या समोर आले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात नोकऱ्यांचे जग संपूर्णपणे बदललेले असेल. तेव्हा या बदलाला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला सुद्धा तुमच्यात बदल करावा लागणार आहे. नवीन कौशल्य शिकावं लागणार
Artificial Intelligence Jobs Update
जागतिक अर्थव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) मुळे मोठा आमूलाग्र बदल होत असून, येणारी काही वर्षे नोकरदारांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या ‘फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२५’ नुसार, २०३० पर्यंत जगभरात तब्बल ९.२ कोटी नोकऱ्या संपुष्टात येऊ शकतात. मात्र, याच काळात तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांमध्ये १७ कोटी नव्या नोकरीच्या संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या अहवालानुसार, जुन्या पद्धतीची कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना रोजगार टिकवणे अवघड होईल, तर तंत्रज्ञानाशी सुसंगत नवीन कौशल्ये आत्मसात करणाऱ्यांनाच भविष्यात संधी मिळेल. एका सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे की, आज जे काम १०० लोक करत आहेत, तेच काम २०३० मध्ये फक्त ५९ लोक करतील, ज्यामुळे कंपन्यांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल दिसतील.
८५ टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्ये (upskilling) शिकवण्याच्या तयारीत असून, ७० टक्के कंपन्या तांत्रिकदृष्ट्या कुशल उमेदवारांना प्राधान्य देणार आहेत. उलट, ४० टक्के कंपन्यांनी जुनी कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे संकेत दिले आहेत. अलीकडेच मायक्रोसॉफ्ट, टीसीएस, इंटेल, गुगल, मेटा आणि अॅमेझॉन यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे, जे या बदलाचेच उदाहरण आहे.
मात्र, या परिस्थितीतही दिलासादायक बाब म्हणजे नोकऱ्या संपत नाहीत, तर त्यांचे स्वरूप बदलत आहे. एआय, बिग डेटा, नेटवर्किंग, सायबर सिक्युरिटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
२०३० पर्यंत शारीरिक कौशल्ये, सहनशक्ती आणि अचूकतेपेक्षा तांत्रिक ज्ञान, विश्लेषणात्मक विचारसरणी आणि सर्जनशीलतेला जास्त महत्त्व मिळणार आहे. भविष्यात मागणी असलेले कर्मचारी म्हणजे सर्जनशील विचार करणारे (Creative Thinkers), परिस्थितीनुसार बदलणारे (Adaptable) आणि नवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक असणारे लोक.
थोडक्यात, एआयमुळे नोकरीच्या बाजारात मोठी क्रांती घडणार आहे. या बदलाच्या लाटेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे आणि नवीन कौशल्ये आत्मसात करणे हेच भविष्यातील यशाचे गमक ठरणार आहे.
Artificial Intelligence Jobs Update
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)मुळे नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, दुसरीकडे एआयमुळे भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात २०२८ पर्यंत २७.३ लाख नव्या नोकऱ्या तयार होणार, असा अंदाज एका संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, विविध क्षेत्रांमध्ये ३.३८ कोटी नोकऱ्यांची भर पडणार असल्यामुळे भारतातील नोकरदारांची संख्या २०२३ मध्ये ४२.२७ कोटी वरून ४५.७६ कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पीअरसनने केलेल्या या संशोधनानुसार, एआयच्या मदतीने रिटेल क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि डेटा इंजिनिअरिंगमध्ये रिटेल क्षेत्रात ६९.६ लाख नोकऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्याचप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात १५ लाख, शिक्षण क्षेत्रात ८.४ लाख, आणि आरोग्य क्षेत्रात ८.३ लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
एआयच्या मदतीने विविध क्षेत्रात तांत्रिक परिवर्तन होणार असून, यामुळे भारतातील उद्योगांना मोठे चालना मिळेल, असे ‘विश्वाल सव्हिस नाऊ इंडिया टेक्नॉलॉजी अँड बिझनेस सेंटर’चे व्यवस्थापकीय संचालक सुमीत माथूर यांनी सांगितले. त्यामुळे एआय शिकून त्याचा लाभ घ्या, अशी सूचना केली जात आहे.
एकीकडे महागाई (Inflation) वाढत असताना दुसरीकडे अनेक क्षेत्रांमध्ये नोकरकपातीचं (Lay Off) संकट पाहायला मिळत आहे. अशातच आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुढील काही महिन्यात बंपर नोकरभरती (Hiring) करण्यात येणार आहे. भारतातील अनेक कंपन्या पुढील तीन महिन्यात कर्मचाऱ्यांनी भरती करणार आहेत. देशातील 36 टक्के कंपन्या पुढील तीन महिन्यांमध्ये नोकरभरती करण्याच्या तयारीत असल्याचं नव्या अहवालात समोर आलं आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
भारतीय कंपन्या आगामी जून तिमाहीसाठी नोकरभरतीसाठी सकारात्मक असल्याची चांगली बातमी समोर आली आहे. मॅनपॉवर ग्रुपने जारी केलेल्या ताज्या अहवालात म्हटलं आहे की, जून तिमाहीमध्ये देशातील 36 टक्के कंपन्या कर्मचारी भरती करण्याची योजना आखत आहेत. महत्त्वाचं म्हणजे जगभरात संभाव्य जागतिक मंदीचं सावट असल्यामुळे नोकरकपात सुरु असताना भारतात मात्र, नोकरभरतीसाठी सकारात्मक दृष्टीकोन असल्याचं समोर आलं आहे. जगभरातील 42 देशांमध्ये नोकरभरतीसाठी भारताचा सर्वात मजबूत दृष्टिकोन असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.
मॅनपॉवर ग्रुपने मंगळवारी यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, 36 टक्के कंपन्या पुढील तीन महिन्यांत त्यांची कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या तयारीत आहेत. देशातील 3,150 कंपन्यांच्या सर्वेक्षणानुसार, भारतातील बहुसंख्य कंपन्या हायरिंग ट्रेंडबद्दल सकारात्मक आहेत. अहवालातील माहितीनुसार, एप्रिल-जून कालावधीसाठी, 50 टक्के कंपन्या वेतनवाढ देण्याची शक्यता आहे, तर 14 टक्के कंपन्या वेतन कपात करण्याच्या विचारात आहेत. तसेच, 33 टक्के कंपन्या कोणताही बदल करण्याच्या विचारात नाहीत.
भारत जगभरातील देशांच्या यादीत अव्वल क्रमांकावर
सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, एप्रिल-जून 2023 पासून भारताच्या निव्वळ रोजगारात 6 टक्के वाढ दिसून आली आहे, पण मागील तिमाहीच्या तुलनेने या आकडेवारी एक टक्क्यांची घट झाली आहे. मॅनपॉवर ग्रुपने निवेदनात म्हटलं आहे की, कंपन्या आणि संस्था 36 टक्के नेट एम्प्लॉयमेंट आउटलुकसह भारत जगभरातील देशांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
जगभरातील नोकरभरतीची टक्केवारी पाहा
भारताचा निव्वळ रोजगाराचे प्रमाण 36 टक्के असून हे, जागतिक पातळीवर सर्वाधिक आहे. यानंतर भारतापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका असून त्यांचे हायरिंगचे प्रमाण 34 टक्के आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर असून हे प्रमाण 32 टक्के आहे. जागतिक आकडेवारी रोमानियातील हायरिंगचं प्रमाण सर्वाधिक कमकुवत दृष्टीकोन -2 टक्के नोंदवण्यात आला आहे.
आधुनिक विज्ञान, संगणक क्रांती, माहिती तंत्रज्ञान, मोबाइल इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे सध्याचे चित्र पुरते पालटून गेले आहे. घराघरात डेटा हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे. अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमात डेटा सायन्सचा समावेश करण्यात येत आहे. तसेच, डेटाशी संबंधित नव्या उद्योगांमध्ये तरुणांच्या हातांना काम मिळत आहे. या क्षेत्राची सध्या होणारी एकूण वाढ पाहता येत्या पाच वर्षात डेटाशी संबंधित शिक्षण क्षेत्रात तब्बल ३ लाख ३० हजार नवे रोजगार निर्माण होणार आहेत, असा अंदाज या क्षेत्राशी संबंधित संस्थांनी वर्तवला आहे.
डाटा सायन्समध्ये नाविन्यता आणि कल्पकतेला असलेला वाव आणि देशात तसेच परदेशात असलेल्या अनेक संधी यामुळे तरुण- तरुणी मोठ्या प्रमाणावर या क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. पालकही या पर्यायांविषयी अधिक माहिती घेताना दिसत आहेत.
सतत वाढती लोकप्रियता
■ नावीन्यता आणि कल्पकतेला वाव देणारे डेटा विज्ञान जगभरातील इतर देशांप्रमाणे भारतातील तरुणवर्गात खूप
लोकप्रिय आहे.
■ या क्षेत्रात चांगली स्पर्धा पहायला मिळते. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक वेगाने वाढत आहे. असे शिक्षण देणारी अनेक केंद्र देशात आकार घेत आहेत.
Artificial Intelligence Jobs and Vacancies 2023: There is a strong recruitment of AI engineers around the world. Companies in the health, finance and entertainment sectors are also recruiting AI engineers. Taking advantage of this opportunity, AI engineers are constantly changing jobs. They are getting 30 to 50 percent pay increment with every new job. Many companies are also giving them double salary hike. 51 percent of AI engineer posts in the country are currently vacant. Know More Details about Artificial Intelligence Jobs and Vacancies 2023 at below :
‘ओपनएआय’च्या ‘चॅटजीपीटी’च्या यशानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अॅप्लिकेशन्समध्ये तज्ज्ञ असलेल्या अभियंत्यांची मागणी जगभरात वाढली आहे. भारतात त्याचा परिणाम दिसू लागला आहे. देशातील एआय अभियंत्यांची ५१ टक्के पदे सध्या रिक्त आहेत.
जगभरात एआय अभियंत्यांची जोरदार भरती केली जात आहे. आरोग्य, वित्त आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्याही एआय अभियंत्यांची भरती करीत आहेत. या संधीचा फायदा घेऊन एआय अभियंते सातत्याने नोकऱ्या बदलत आहेत. प्रत्येक नव्या नोकरीच्या वेळी त्यांना ३० ते ५० टक्के वेतनवाढ मिळत आहे. अनेक कंपन्या त्यांना दुप्पट वेतनवाढही देत आहेत.
२ लाख अभियंते हवे | AI Engineer Vacancy 2023
नासकॉमने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ४.१६ लाख एआय अभियंते आहेत. मात्र आणखी २.१३ लाख एआय अभियंत्यांची देशाला सद्यस्थितीत गरज आहे.
…..तर अभियंत्यांची पळवापळवी होणार
बंगळुरूमध्ये डेटा सायन्स हब उभारणारी स्टार्ट-अप कंपनी फ्लेक्सकार च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बंगळुरूत डेटा इंजीनिअर्सची संख्या भरपूर असली तरी ती पुरेशी नाही. शहरात लवकरच एआय क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंत्यांची पळवापळवी सुरू होऊ शकते
आयवरून बायडेन यांनाही चिंता
एआयच्या सुरक्षेवरून सुरु झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंची नुकतीच भेट घेतली. गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, माइक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, ओपनएआयचे सॅम ऑल्टमन आणि अँथ्रोपिकचे डारियो अमोदी यांचा त्यात समावेश होता. एआय तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी ते संपूर्णतः सुरक्षित आहे, याची कंपन्यांनी खात्री करावी, असे आवाहन बायडेन यांनी यावेळी केले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















