लवकर एआय शिकून घ्या; चार वर्षांत २७ लाख नोकऱ्यांची संधी!! | Artificial Intelligence Jobs and Vacancies 2024
Artificial Intelligence Jobs and Vacancies 2024
Artificial Intelligence Jobs Update
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)मुळे नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, दुसरीकडे एआयमुळे भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात २०२८ पर्यंत २७.३ लाख नव्या नोकऱ्या तयार होणार, असा अंदाज एका संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, विविध क्षेत्रांमध्ये ३.३८ कोटी नोकऱ्यांची भर पडणार असल्यामुळे भारतातील नोकरदारांची संख्या २०२३ मध्ये ४२.२७ कोटी वरून ४५.७६ कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पीअरसनने केलेल्या या संशोधनानुसार, एआयच्या मदतीने रिटेल क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि डेटा इंजिनिअरिंगमध्ये रिटेल क्षेत्रात ६९.६ लाख नोकऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्याचप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात १५ लाख, शिक्षण क्षेत्रात ८.४ लाख, आणि आरोग्य क्षेत्रात ८.३ लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एआयच्या मदतीने विविध क्षेत्रात तांत्रिक परिवर्तन होणार असून, यामुळे भारतातील उद्योगांना मोठे चालना मिळेल, असे ‘विश्वाल सव्हिस नाऊ इंडिया टेक्नॉलॉजी अँड बिझनेस सेंटर’चे व्यवस्थापकीय संचालक सुमीत माथूर यांनी सांगितले. त्यामुळे एआय शिकून त्याचा लाभ घ्या, अशी सूचना केली जात आहे.
एकीकडे महागाई (Inflation) वाढत असताना दुसरीकडे अनेक क्षेत्रांमध्ये नोकरकपातीचं (Lay Off) संकट पाहायला मिळत आहे. अशातच आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुढील काही महिन्यात बंपर नोकरभरती (Hiring) करण्यात येणार आहे. भारतातील अनेक कंपन्या पुढील तीन महिन्यात कर्मचाऱ्यांनी भरती करणार आहेत. देशातील 36 टक्के कंपन्या पुढील तीन महिन्यांमध्ये नोकरभरती करण्याच्या तयारीत असल्याचं नव्या अहवालात समोर आलं आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
भारतीय कंपन्या आगामी जून तिमाहीसाठी नोकरभरतीसाठी सकारात्मक असल्याची चांगली बातमी समोर आली आहे. मॅनपॉवर ग्रुपने जारी केलेल्या ताज्या अहवालात म्हटलं आहे की, जून तिमाहीमध्ये देशातील 36 टक्के कंपन्या कर्मचारी भरती करण्याची योजना आखत आहेत. महत्त्वाचं म्हणजे जगभरात संभाव्य जागतिक मंदीचं सावट असल्यामुळे नोकरकपात सुरु असताना भारतात मात्र, नोकरभरतीसाठी सकारात्मक दृष्टीकोन असल्याचं समोर आलं आहे. जगभरातील 42 देशांमध्ये नोकरभरतीसाठी भारताचा सर्वात मजबूत दृष्टिकोन असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.
मॅनपॉवर ग्रुपने मंगळवारी यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, 36 टक्के कंपन्या पुढील तीन महिन्यांत त्यांची कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या तयारीत आहेत. देशातील 3,150 कंपन्यांच्या सर्वेक्षणानुसार, भारतातील बहुसंख्य कंपन्या हायरिंग ट्रेंडबद्दल सकारात्मक आहेत. अहवालातील माहितीनुसार, एप्रिल-जून कालावधीसाठी, 50 टक्के कंपन्या वेतनवाढ देण्याची शक्यता आहे, तर 14 टक्के कंपन्या वेतन कपात करण्याच्या विचारात आहेत. तसेच, 33 टक्के कंपन्या कोणताही बदल करण्याच्या विचारात नाहीत.
भारत जगभरातील देशांच्या यादीत अव्वल क्रमांकावर
सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, एप्रिल-जून 2023 पासून भारताच्या निव्वळ रोजगारात 6 टक्के वाढ दिसून आली आहे, पण मागील तिमाहीच्या तुलनेने या आकडेवारी एक टक्क्यांची घट झाली आहे. मॅनपॉवर ग्रुपने निवेदनात म्हटलं आहे की, कंपन्या आणि संस्था 36 टक्के नेट एम्प्लॉयमेंट आउटलुकसह भारत जगभरातील देशांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
जगभरातील नोकरभरतीची टक्केवारी पाहा
भारताचा निव्वळ रोजगाराचे प्रमाण 36 टक्के असून हे, जागतिक पातळीवर सर्वाधिक आहे. यानंतर भारतापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका असून त्यांचे हायरिंगचे प्रमाण 34 टक्के आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर असून हे प्रमाण 32 टक्के आहे. जागतिक आकडेवारी रोमानियातील हायरिंगचं प्रमाण सर्वाधिक कमकुवत दृष्टीकोन -2 टक्के नोंदवण्यात आला आहे.
आधुनिक विज्ञान, संगणक क्रांती, माहिती तंत्रज्ञान, मोबाइल इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे सध्याचे चित्र पुरते पालटून गेले आहे. घराघरात डेटा हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे. अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमात डेटा सायन्सचा समावेश करण्यात येत आहे. तसेच, डेटाशी संबंधित नव्या उद्योगांमध्ये तरुणांच्या हातांना काम मिळत आहे. या क्षेत्राची सध्या होणारी एकूण वाढ पाहता येत्या पाच वर्षात डेटाशी संबंधित शिक्षण क्षेत्रात तब्बल ३ लाख ३० हजार नवे रोजगार निर्माण होणार आहेत, असा अंदाज या क्षेत्राशी संबंधित संस्थांनी वर्तवला आहे.
डाटा सायन्समध्ये नाविन्यता आणि कल्पकतेला असलेला वाव आणि देशात तसेच परदेशात असलेल्या अनेक संधी यामुळे तरुण- तरुणी मोठ्या प्रमाणावर या क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. पालकही या पर्यायांविषयी अधिक माहिती घेताना दिसत आहेत.
सतत वाढती लोकप्रियता
■ नावीन्यता आणि कल्पकतेला वाव देणारे डेटा विज्ञान जगभरातील इतर देशांप्रमाणे भारतातील तरुणवर्गात खूप
लोकप्रिय आहे.
■ या क्षेत्रात चांगली स्पर्धा पहायला मिळते. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक वेगाने वाढत आहे. असे शिक्षण देणारी अनेक केंद्र देशात आकार घेत आहेत.
Artificial Intelligence Jobs and Vacancies 2023: There is a strong recruitment of AI engineers around the world. Companies in the health, finance and entertainment sectors are also recruiting AI engineers. Taking advantage of this opportunity, AI engineers are constantly changing jobs. They are getting 30 to 50 percent pay increment with every new job. Many companies are also giving them double salary hike. 51 percent of AI engineer posts in the country are currently vacant. Know More Details about Artificial Intelligence Jobs and Vacancies 2023 at below :
‘ओपनएआय’च्या ‘चॅटजीपीटी’च्या यशानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अॅप्लिकेशन्समध्ये तज्ज्ञ असलेल्या अभियंत्यांची मागणी जगभरात वाढली आहे. भारतात त्याचा परिणाम दिसू लागला आहे. देशातील एआय अभियंत्यांची ५१ टक्के पदे सध्या रिक्त आहेत.
जगभरात एआय अभियंत्यांची जोरदार भरती केली जात आहे. आरोग्य, वित्त आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्याही एआय अभियंत्यांची भरती करीत आहेत. या संधीचा फायदा घेऊन एआय अभियंते सातत्याने नोकऱ्या बदलत आहेत. प्रत्येक नव्या नोकरीच्या वेळी त्यांना ३० ते ५० टक्के वेतनवाढ मिळत आहे. अनेक कंपन्या त्यांना दुप्पट वेतनवाढही देत आहेत.
२ लाख अभियंते हवे | AI Engineer Vacancy 2023
नासकॉमने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ४.१६ लाख एआय अभियंते आहेत. मात्र आणखी २.१३ लाख एआय अभियंत्यांची देशाला सद्यस्थितीत गरज आहे.
…..तर अभियंत्यांची पळवापळवी होणार
बंगळुरूमध्ये डेटा सायन्स हब उभारणारी स्टार्ट-अप कंपनी फ्लेक्सकार च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बंगळुरूत डेटा इंजीनिअर्सची संख्या भरपूर असली तरी ती पुरेशी नाही. शहरात लवकरच एआय क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंत्यांची पळवापळवी सुरू होऊ शकते
आयवरून बायडेन यांनाही चिंता
एआयच्या सुरक्षेवरून सुरु झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंची नुकतीच भेट घेतली. गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, माइक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, ओपनएआयचे सॅम ऑल्टमन आणि अँथ्रोपिकचे डारियो अमोदी यांचा त्यात समावेश होता. एआय तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी ते संपूर्णतः सुरक्षित आहे, याची कंपन्यांनी खात्री करावी, असे आवाहन बायडेन यांनी यावेळी केले.