खुशखबर! आरोग्य विभागात १७ हजार रिक्त पदे भरणार

Arogya Vibhag Bharti 2020- 17000 Vacancies


आताच प्राप्त बातमी नुसार कोरोनासोबत लढताना आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागातील १७ हजार रिक्त पदे लवकरच भरली जातील. यात डॉक्टरांपासून सर्व वर्गातील पदे जलदगतीने भरण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

लॉकडाउनचा चौथा टप्प्यातील नियमावली तसेच कोरोनाबाबतची माहिती सुद्धा त्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. मुंबई वगळता राज्यात कुठेच बेडची कमतरता नाही. मुंबईतही साठ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली असून महिनाभरात ही संख्या एक लाखावर नेण्याच्या दृष्टीने महापालिका स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. आता मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मलेरिया, डेंग्यू तसेच अन्य पावसाळी साथ रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर आहे. नियुक्त्या आणि भरतीसाठी गरज असल्यास अतिरिक्त समित्या बनवाव्यात, मुलाखतींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.

Arogya Vibhag Bharti 2020- 17000 Vacancies

मुंबईत केंद्रीय सुरक्षा बलाच्या ५ तुकड्या

राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १,३२८ वर गेली असून १२ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. अखेर, पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या राज्यभरात दाखल होत असून यापैकी मुंबईत ५ तुकड्या तैनात असतील. राज्य पोलीस दलात पावणे दोन लाखांच्या जवळपास पोलीस कार्यरत आहेत. लॉकडाउनच्या काळात विविध नियमांची अंमलबजावणी, बंदोबस्तासह विविध जबाबादारीचे ओझे पोलिसांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण वाढला आहे.20 Comments
 1. प्रविण केंद्रे says

  खुल्या प्रवर्गातील वय मर्यादा 38 पेक्षा किमान आणखी 3 किंवा 6 महिने तरी वाढवून द्यावी

 2. Asmita.vilas.maskar says

  Online website kay ahe

 3. pankaj salekar says

  sir do very early this vacancy as per as possible.

 4. Sushma shinde says

  Parbhni arogya barti kadi honar aahe

 5. drsarika843@gmail.com says

  All vacancies are temporary.. in this crucial period u r using all medicos for 45 days , somewhere 3 months , for six months , who will be ready? Ever you think after what they will do? Recruitment should be for permanent

 6. Parameshvar says

  Plz send us link to apply Medical staff jobs

 7. Ali mulla says

  खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक वर्ष तरी मुदतवाढ मिळावी

 8. सुमित वि. ठाकरे says

  मी पॅथॉलॉजि डीपरमेंट चा वेक्ती आहे

 9. Sushma wankhade says

  Sir, aarogy nirikshak sathi jaga nighel ka

 10. अरुण says

  माजी सैनिकांसाठी आहे का नोकरी आरोग्य विभागात?

 11. Sudhakar says

  Qualification किती आहे आणि.. वयोमर्यादा किती आहे. Last date कधी कसे चेक करायचं

 12. Vaibhavi says

  Website कोणती कुठे APPL करायच

  1. MahaBharti says

   येथे आम्ही सर्व लिंक दिलेल्या आहेत :

   https://mahabharti.in/arogya-vibhag-bharti-2020/

 13. M dhabarde says

  Aaragya vibhagamadhya honarya bhartisathi exam honar ki mulakhti gheun jaaga bharlya jaanar

 14. Aniket says

  17000 Bharti Che online form केव्हा निघणार

 15. Abhishek Shelar says

  Kindly update form submission date

 16. Abhishek Shelar says

  Form kadhi sutnar ahet

 17. Pravin. G says

  Sir. Arogay. Vibagatil. Mage. Baralele. Form. Ya. Bharti. La. Chalatat. Kay

 18. Karadkar krishna says

  Add chi link पाठवा

 19. Divyesh Mahendra pawar says

  Sir vinanti karto ki. 12th pass var bharti gya

Leave A Reply

Your email address will not be published.