महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा २०२३ परीक्षेचा निकाल तीन महिन्यांपूर्वी जाहीर केला. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही पूर्ण झाली. मात्र, वैद्यकीय मंडळाकडून आवश्यक अहवाल अद्याप न मिळाल्याने नियुक्ती प्रक्रियेत विलंब होत आहे.

MPSC द्वारे जून २०२३ मध्ये राज्यसेवा गट-अ आणि गट-ब साठी ३०३ पदांसाठी परीक्षा घेतली होती. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये मुख्य परीक्षा आणि ऑगस्ट-सप्टेंबर २०२४ मध्ये मुलाखती पार पडल्या. आयोगाने २६ सप्टेंबर २०२४ रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली. यापूर्वी वैद्यकीय तपासणी प्रक्रिया पार पडली असून, तपासणीनंतर वैद्यकीय मंडळाने उमेदवारांचे अहवाल आणि प्रमाणपत्रे आयोगाकडे पाठवली होती. काही उमेदवारांना त्यांच्या अहवालांबाबत आक्षेप असल्यास अपील करण्याची संधीही देण्यात आली होती. मात्र, अद्याप काही उमेदवारांचे वैद्यकीय अहवाल आयोगाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे संबंधित उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. हा विषय पुढील टप्प्यात मार्गी लावण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















