ANM GNM Selection List Result Maharashtra – राज्यातील ANM आणि GNM पदविका अभ्यासक्रमांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून या फेरीत ३१ हजार १४५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, शिष्यवृत्ती व फ्रीशिपचा लाभ मिळविण्यासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील एएनएम आणि जीएनएम पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रीभूत पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेल्या विविध तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला होता. पहिल्या फेरीत जवळपास ३१ हजार १४५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांचे प्रवेश बारावीच्या गुणांच्या आधारे करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व संस्थांमधील प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जात आहेत. राज्यात एएनएम आणि जीएनएमची एकूण १ हजार ३०१ महाविद्यालये असून, त्यांची प्रवेश क्षमता ५४ हजार २८५ जागा आहे. पहिल्या फेरीत ३१ हजार १४५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी १७ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















