JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पुणे विद्यापीठात ६३१ पदे रिक्त, नवीन भरती प्रक्रिया अपडेट जाहीर!! | Pune University Recruitment 2026

Pune University Bharti 2026

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. विद्यापीठातील १ हजार २३८ मंजूर पदांपैकी केवळ ६०७ पदांवर कर्मचारी कार्यरत असून, तब्बल ६३१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाचा भार उपलब्ध कर्मचाऱ्यांवर पडत आहे. विशेष म्हणजे, सध्या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि विविध अभ्यासक्रमांमधील विद्यार्थिसंख्या साडेसात लाखांवर गेली असून, त्यांचा कारभार मात्र अर्ध्याच मनुष्यबळावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाची आकृतिबंध रचना २००९ मध्ये ४ लाख ३४ हजार विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन केली होती. त्यानंतर विद्यार्थिसंख्येत मोठी वाढ झाली. परंतु त्याच प्रमाणात शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची पदे भरली गेली नाहीत. परिणामी, प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यापीठातील महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवरही मोठ्या प्रमाणात रिक्तता आहे.

१९ उपकुलसचिवांच्या मंजूर पदांपैकी केवळ चार अधिकारी कार्यरत आहेत. २९ सहायक कुलसचिवांच्या पदांपैकी केवळ तीन अधिकारी कार्यरत असून, त्यापैकी एक अधिकारी नोव्हेंबरअखेर निवृत्त होणार आहे. सहायक वित्त अधिकाऱ्यांच्या चार पदांपैकी एकच पद भरलेले आहे. उपवित्त अधिकारी आणि सहायक लेखा अधिकारी ही पदेही रिक्त आहेत.याशिवाय, उपकुलसचिव (कायदा व तक्रार निवारण), जनसंपर्क अधिकारी, प्रेस मॅनेजर आणि सुरक्षा अधिकारी ही पदे रिक्त आहेत. दोन उपअभियंत्यांची पदेही भरलेली नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दोन पदांपैकी एक पद रिक्त आहे. काही विभागांमध्ये उपलब्ध अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवून कामकाज सुरू ठेवले जात आहे. सहायक कुलसचिवांना उपकुलसचिव पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. कुलसचिवपद भरण्याची परवानगी मिळविण्याची प्रक्रियाही सुरू आहे. याचा थेट परिणाम विद्यापीठाच्या प्रशासकीय दर्जावर होत असून, विविध रँकिंगला याचा मोठा फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठातील विभागांची पुनर्रचना करून उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. या माध्यमातून कामकाज सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी भरतीबाबत विद्यापीठाकडून राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Pune University Bharti 2026: Savitribai Phule Pune University, Pune, applications are invited from interested and eligible candidates to fill vacant posts of “Director”. There is 01vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can apply through given link before the last date. The last date for Online (email) application is 17th November 2026. For more details about Pune University Bharti 2026, Pune University Application 2026, visit our website www.MahaBharti.in.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “संचालक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती 2026 करीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती 2026

  • पदाचे नाव – संचालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ नोव्हेंबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट -www.unipune.ac.in

Pune University Vacancy 2026

Post NameNumber of Vacancies
संचालक1

Educational Qualification For Pune University Recruitment 2026

PostQualification Required
संचालकQualification and experience of a Professor in the relevant discipline, with aggregate teaching or research experience of not less than fifteen years: (A) eminent scholar with Ph.D., at least 10 research publications in peer-reviewed or UGC-listed journals, research score of 120, 15 years’ teaching/research experience and doctoral guidance; OR (B) outstanding professional with Ph.D. and fifteen years’ experience.

Salary Details For Pune University Job 2026

PostPay Level / Pay
संचालकAcademic Level 14 (Rs. 1,44,200 – 2,18,200), entry pay Rs. 1,44,200 with usual allowances as per University rules

How To Apply For Pune University Application 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाइन (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.unipune.ac.in Application 2026 

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/XH1i0
🔗ऑनलाईन अर्ज करा https://tinyurl.com/4rs6zusw
✅ अधिकृत वेबसाईट
www.unipune.ac.in

Table of Contents

1 thought on “पुणे विद्यापीठात ६३१ पदे रिक्त, नवीन भरती प्रक्रिया अपडेट जाहीर!! | Pune University Recruitment 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड