अंगणवाडी सेविका व मदतनीसांची ३ हजार ६०२ पदांची भरती लवकरच! – Anganwadi Sevika and Helper Recruitment Eligibility 2025
Anganwadi Sevika and Helper Recruitment Eligibility
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2025 : राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसांची सुमारे ३ हजार ६०२ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिकांचीही पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे. महिलांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत ५६३९ अंगणवाडी सेविका आणि १३२४३ अंगणवाडी मदतनीस पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत हे जाणून घेऊया. Anganwadi Sevika and Helper Recruitment Eligibility Update.
एकात्मिक बालविकास योजनेत राज्यात स्वत:ची इमारत नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळांतील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्याच्या धोरणास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी यातील अंतर जास्तीत जास्त एक किलोमीटर असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. महिला आणि बालविकास विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राज्यात ५५३ बालविकास प्रकल्प आहेत. त्यात १०४ नागरी, तर ४४९ ग्रामीण प्रकल्पांचा समावेश आहे. त्या अंतर्गत १ लाख १० हजार ६६९ अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत. २४ ऑगस्ट २०२३ रोजी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वत:ची इमारत उपलब्ध नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत रिक्त खोल्या असल्यास त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचे धोरण तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार स्वत:ची इमारत नसलेल्या अंगणवाड्या नजीकच्या जिल्हा परिषद शाळेतील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे धोरण तयार करून त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसेच स्थलांतराबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
भाड्याच्या जागेत, समाज मंदिर अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या अंगणवाड्यांना स्थलांतर धोरण लागू राहील. स्वमालकीची इमारत बांधण्याचे प्रस्तावित असलेल्या अंगणवाड्या स्वमालकीची इमारत उपलब्ध झाल्यावर त्या ठिकाणी कार्यान्वित करावीत. स्थलांतर करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण आणि जिल्हा परिषद शाळा यातील अंतर जास्तीत जास्त एक किलोमीटरपर्यंत असावे. अंगणवाडीसाठी शाळेच्या इमारतीतील वर्गखोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत, वर्गखोली संरचनात्मकदृष्ट्या वापरण्यास योग्य आणि निर्धोक असल्याची खात्री करावी. तसेच वर्गखोली सुस्थितीत असल्याची केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांनी दक्षता घ्यावी. इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडीसाठी तळमजल्यावरील खोली द्यावी. अंगणवाडीला वर्गखोली देताना शाळेतील स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, क्रीडांगण, पिण्याचे पाणी, क्रीडा साहित्य अशा सुविधांचा वापर अंगणवाडीतील बालकांसाठी करण्याची मुभा राहील. किरकोळ दुरुस्ती, बालकांच्या दृष्टीने अंतर्गत सजावट आणि व्यवस्था करण्यास महिला आणि बालविकास विभागाच्या यंत्रणेस अनुमती राहील. शाळेमध्ये वीज उपलब्ध नसल्यास अंगणवाडीला शाळेमार्फत वीज उपलब्ध करून द्यावी. जिल्हा परिषद शाळेत वर्गखोली नसल्यास, पण जागा उपलब्ध असल्यास अंगणवाडीची इमारत बांधण्यासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा. स्वमालकीची इमारत जीर्णावस्थेत असलेल्या आणि बांधकाम प्रस्तावित नसलेल्या अंगणवाड्यांचेही नजीकच्या जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Before applying for Anganwadi Sevika and Helper Madatnis Bharti go through the following given details carefully. All the details are very important for the applicants.
अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी जाणून घ्या.
महत्त्वाच्या पात्रता व अटी:
१. शैक्षणिक पात्रता:
- अंगणवाडी मदतनीस पदासाठी किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने मराठी भाषा विषयासह परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- उच्च शिक्षण (पदवी/पदव्युत्तर) घेतलेल्या उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- ज्या अंगणवाडी केंद्रात ५०% हून अधिक मुले मराठी व्यतिरिक्त इतर भाषा बोलतात, त्या केंद्रासाठी संबंधित भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
२. वयोमर्यादा:
- किमान वय: १८ वर्षे (दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी).
- कमाल वय: ३५ वर्षे.
- विधवा उमेदवारांसाठी: कमाल वयोमर्यादा ४० वर्षे असेल.
३. स्थानिक रहिवासी अट:
- उमेदवार संबंधित महसुली गावातील (ग्रामपंचायत नव्हे) स्थायी रहिवासी असावा.
- अर्ज करताना स्थायी रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
४. लहान कुटुंब अट:
- उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये असणे आवश्यक आहे.
- दोन हयात अपत्यांपेक्षा जास्त असल्यास उमेदवार अयोग्य ठरेल.
- अर्जासोबत लहान कुटुंब प्रमाणपत्र संलग्न करणे बंधनकारक आहे.
५. अर्ज प्रक्रिया:
- उमेदवारांनी विहित नमुन्यात योग्यरित्या भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ठरवलेल्या कालावधीत कार्यालयात सादर करावा.
- अर्धवट माहिती असलेले किंवा अपूर्ण अर्ज बाद करण्यात येतील.
- अर्ज कार्यालयीन वेळेत आणि निश्चित तारखेमध्येच स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
६. निवड प्रक्रिया:
- गुणांकन यादीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
- अंतिम निकाल सरकारच्या निर्देशांनुसार घेतला जाईल.
- निधारित कालावधी नंतर कोणत्याही अर्जातील दुरुस्त्या अथवा नवीन कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.
७. निवडीनंतरच्या अटी:
- निवड झाल्यास, सध्या पंचायत राज संस्थांमध्ये (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) पदावर कार्यरत असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल.
- भरती प्रक्रियेच्या दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणानुसार बदल किंवा सुधारणा करण्यात आल्यास, ते उमेदवारांना लागू राहतील.
- भरती प्रक्रियेदरम्यान काही अडचणी आल्यास अंतिम निर्णय शासन निर्देशानुसार घेतला जाईल.
८. पदाचा स्वरूप व लाभ:
- ही पदे फक्त मानधन तत्वावर असतील.
- या पदांसाठी कोणतेही वेतन, भत्ते किंवा निवृत्तीवेतन मिळणार नाही.
- फक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिलेले अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
महत्त्वाचे मुद्दे:
- एका उमेदवाराने फक्त एक अर्जच भरावा.
- भरती प्रक्रियेतील रिक्त पदांमध्ये बदल होऊ शकतो.
- अर्जात चुकीची माहिती आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- विधवा आणि अनाथ उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.
महत्वाच्या लिंक :
- अंगणवाडी सेविका भर्तीसाठी आवश्यक कागदपत्र कोणती २०२५ !
- राज्यातील अंगणवाड्यांमध्ये १० हजार पदांची भरती-सर्व जाहिराती
पात्र असाल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका! महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२५ साठी त्वरित अर्ज करा.
Table of Contents