अंगणवाडी भरती: १२वी पास महिलांसाठी मोठी संधी, १८००० हून अधिक पदांची भरती सुरू!!
Anganwadi Recruitment Online Application Form
नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी भरतीची मोठी घोषणा केली असून, १८००० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे (Anganwadi Recruitment Online Application Form).
या भरतीअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविका पदासाठी ५६३९ जागा तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी १२३४२ जागा रिक्त आहेत. एकूण १८८८२ पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षे असावे. मात्र, विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या स्थानिक परिसरातच नोकरीची संधी मिळणार आहे. तसेच, अर्ज करणाऱ्या महिलांना जास्तीत जास्त २ मुले असावीत, असे निकष ठेवले आहेत.
या भरतीसाठी पात्रतेच्या अटी देखील स्पष्ट करण्यात आल्या आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इच्छुक महिलांनी महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करावा. अर्ज प्रक्रिया कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.