अमरावती जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रिया सध्या अडथळ्यांमुळे थोडी रखडली आहे. भरती प्रक्रियेनंतर काही उमेदवारांची निवड करण्यात आली खरी, पण काही निवड न झालेल्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेत अनियमितता असल्याचे म्हणत आक्षेप नोंदवले आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या भरती प्रक्रियेत एकूण २५२ सेविका व मदतनीसांची निवड झाली होती. मात्र त्यापैकी २२ अंगणवाडी सेविका आणि २३ मदतनीस, अशा ४५ पदांवर आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवारांना सध्या नियुक्तीपत्र देणे थांबवण्यात आले आहे.
तरीदेखील ज्या पदांवर कुठलाही आक्षेप नाही, अशा ९२ अंगणवाडी सेविका आणि १६० मदतनीसांना नियुक्तीपत्र देऊन कामावर रुजू होण्याचे आदेश दिले गेले आहेत.
सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात एकूण २,५९२ अंगणवाडी केंद्रं आहेत. त्यामध्ये २,४७८ सेविका आणि २,४०९ मदतनीस कार्यरत आहेत. तरीदेखील ११४ सेविका आणि १८३ मदतनीसांची पदं अजूनही रिक्त आहेत.
ज्या पदांवर आक्षेप आले आहेत, त्याची चौकशी लवकरच प्रकल्पस्तरावर सुरू होणार असून, दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर उर्वरित निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















