अमरावती विभागात २०० तरुणांना ‘टूरिस्ट गाइड’ बनण्याची सुवर्णसंधी! | Amravati Tourist Guide Bharti 2026

Amravati Tourist Guide Bharti 2026

 अमरावती विभागातील पर्यटन स्थळांचा विकास आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. ‘नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या पाचही जिल्ह्यांतील इच्छुक युवक-युवतींसाठी ‘टूरिस्ट गाइड ट्रेनिंग’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव यांनी दिली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने पर्यटन स्थळांवर प्रभावी मार्गदर्शन करणे, आदरातिथ्य सेवा आणि पर्यटन संबंधित तांत्रिक कौशल्यांचे धडे दिले जाणार आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळांची शास्त्रोक्त माहिती मिळावी, या उद्देशाने हे ‘पर्यटन सुलभ मार्गदर्शक’ तयार केले जात आहेत. विशेष म्हणजे, ग्वाल्हेर येथील नामांकित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट’ आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे तज्ज्ञ प्रशिक्षक हे प्रशिक्षण देणार आहेत.

या प्रशिक्षणासाठी एकूण 200 उमेदवारांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाईल. अर्जदार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि त्याचे वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयाचे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच, सिंहस्थ कालावधीत ‘टूर गाइड’ म्हणून अधिकृतपणे काम करण्यासाठी विशेष ओळखपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी 30 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे (https://forms.gle/M६gq९JgMiFfB७Efv७) आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार प्रादेशिक पर्यटन कार्यालय, अमरावती येथील दूरध्वनी क्रमांक 0721-2990457 वर संपर्क साधू शकतात. पर्यटन क्षेत्रात करिअर करण्याची आणि फिरण्याची आवड असलेल्या तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

👉अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लीक करा

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड