ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण
Amitabh Bacchan Corona Positive
Amitabh Bachhan Corona Positive –
बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. काल रात्री बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. दरम्यान आता बिग बी अमिताभ यांची प्रकृती स्थिर आहे. नानावटी हॉस्पिटलकडून अधिकृत माहिती देण्यात आली असून त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोविड 19 ची काहीशी लक्षणं आहेत. ते सध्या नानावटी सुपर स्पेशिलिटी हॉस्पीटलमध्ये आयसोलेशन यूनिटमध्ये भरती आहेत. दरम्यान सकाळी उठून त्यांनी नाश्ता केला असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे.
सकाळी त्यांना हलका ताप आणि श्वास घेण्यात अडचण येत असल्याची माहिती समोर आली होती. दुसरीकडे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. त्या दोघांनीही अॅंटिजन टेस्ट केली होती, त्यात ते पॉझिटिव्ह आले आहेत. आता त्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या परिवारातील अन्य सदस्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की बच्चनजी यातून लवकर बाहेर पडावेत, असं टोपे यांनी म्हटलं आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच त्यांनारुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता मात्र अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना करोना झाल्याचं सांगितलं आहे.
अभिनेता अभिषेक बच्चनलाही करोनाची लागण झाली आहे. फिल्मफेअरने ट्विट करुन अभिषेक बच्चनला करोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच महानायक अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याचं त्यांनी स्वतः ट्विट करुन सांगितलं. त्यापाठोपाठ आता अभिषेक बच्चनचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
काय म्हटलं आहे अमिताभ बच्चन यांनी?
माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे. या आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.
करोनाची लागण आता महानायक अमिताभ बच्चन यांनाही झाली आहे. अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याचवेळी त्यांना करोनाची लागण झाल्याची चर्चा होती. मात्र सुरुवातीला बच्चन कुटुंबीयांकडून प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली नाही. आता अमिताभ बच्चन यांनी स्वतःच ट्विट करुन ते करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट केलं आहे.
राजेश टोपे यांनी काय म्हटलं आहे?
अमिताभ बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. मात्र त्यांना करोनाची लक्षणं नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण; बंगला केला सील
अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण झाली आहे. सुरक्षारक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच मुंबई महानगरपालिकेने रेखा यांचा मुंबईतील बंगला सील केला आहे. त्याचसोबत त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोन असल्याचा फलकही लावण्यात आला आहे.
वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, बंगल्यात दोन सुरक्षारक्षक असतात. त्यापैकी एकाला करोनाची लागण झाली आहे. संबंधित सुरक्षारक्षकावर उपचार सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण परिसराला सॅनिटाइज केलं आहे. याप्रकरणी रेखा किंवा त्यांच्या प्रवक्त्याकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
काही दिवसांपूर्वी आमिर खानच्या स्टाफला करोनाची लागण झाली होती. यामध्ये त्याचे दोन बॉडीगार्ड आणि स्वयंपाकीचाही समावेश होता. आमिरच्या संपूर्ण कुटुंबीयांची करोना चाचणी करण्यात आली आणि सुदैवाने सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्याआधी जान्हवी कपूर आणि करण जोहरच्या स्टाफलाही करोनाची लागण झाली होती.