Ambedkar College Nagpur Bharti 2026
Ambedkar College Nagpur Bharti 2026: The walk-in-interview conducted by Dr. Ambedkar College Nagpur to fill “Assistant Professor” & Other Posts. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview. There is a various Vacancies to fill all posts. The employment palace for this recruitment is in Nagpur. The walk-in-interview is conducted on the at the given address. Further detail about Dr. Ambedkar College Nagpur and other eligibility criteria is given below:-
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, नागपूरद्वारा संचालित डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च (कायम विनाअनुदानित) मधील बी.बी.ए. व एम.बी.ए. प्राध्यापक भरतीसाठी २० फेब्रुवारी रोजी मुलाखती नियोजित केल्या असून त्या ठरल्यानुसार शुक्रवारी सकाळी ९:३० वाजेपासून सुरू होतील, असे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी येथील प्राध्यापक भरती प्रक्रियेवर आक्षेप घेऊन ती अवैध असल्याचे म्हटले आहे. यावर अध्यक्ष भंते सुरेई ससाई यांच्यावतीने त्यांचे खासगी सचिव रवी मेंढे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्यानुसार डॉ. राजेंद्र गवई हे स्मारक समितीचे सचिव नाहीत. तसेच समितीचे सर्व प्रशासकीय अधिकार अध्यक्षांकडेच समितीच्या घटनेतील प्रावधानानुसार सर्व प्रशासकीय अधिकार हे फक्त अध्यक्षांकडेच आहेत. प्राध्यापक भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाच्या व विद्यापीठाच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार राबविण्यात आली असून सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केलेले आहे.
प्रथमतः विद्यापीठाच्या प्रोफार्मा डी मधील वर्कलोडनुसार पदसंख्या निश्चित करण्यात आली. विद्यापीठाच्या पत्रानुसार रिक्त शिक्षकांची पदे भरण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्या उपरांत बिंदुनामावली तयार करून विद्यापीठाच्या मागासवर्ग विशेष कक्षाकडून तपासणी करून सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर यांच्या आदेश क्र. मावक.अ.का.-२/३९/का.वि.-४४४ दिनांक २४ जून २०२५ नुसार बिंदुनामावलीची तपासणी करून रीतसर मान्यता घेण्यात आली. त्यानंतर विद्यापीठाच्या मागासवर्ग विशेष कक्षाच्या पत्रानुसार रिक्त पदांसाठी आरक्षण निर्धारित करून देण्यात आले. विद्यापीठ महाविद्यालय विकास विभागाच्या आदेशानुसार जाहिरातीचे प्रारूप मंजूर करण्यात आले व विद्यापीठाच्या प्रमाणित आराखड्यानुसार १७ ऑगस्ट २०२५ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली.
उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने विहीत मुदतीत स्वीकारून विद्यापीठाकडून निवड समिती गठित करण्यात आली. समितीतील सदस्यांशी संपर्क साधून २० फेब्रुवारी २०२६ ही तारीख वैयक्तिक मुलाखतीकरिता निश्चित करण्यात आली. त्यानुसार सर्व उमेदवारांना ई-मेल व स्पीडपोस्टद्वारे मुलाखतपत्र पाठविण्यात असून शुक्रवारी सकाळी ९:३० वाजेपासून मुलाखती सुरू होतील, तेव्हा कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.dacn.in Job 2026 | |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.dacn.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















