Ahilyanagar Talathi Exam Result
Ahilyanagar Talathi Exam Result: अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे आस्थापनेवरील गट-क मधील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 26/06/2023 रोजी अहिल्यानगर जिल्हा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदभरती सन 2023 ची जाहिरात https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आली होती. पदभरतीच्या अनुषंगाने दिनांक 17/08/2023 ते 14/09/2023 या कालावधीत महाराष्ट्रातील विविध परिक्षा केंद्रावर टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी, निवड यादी व प्रतिक्षा यादी मा. अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांचेमार्फत इकडेस प्राप्त झाली. सदर यादीची पडताळणी करण्यात येऊन दि. 14/03/2024 रोजी निवड यादी व प्रतिक्षा यादी https://mahabhumi.gov.in व www.ahmednagar.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभीचा दिनांक | समाप्तीचा दिनांक | फ़ाइल |
|---|---|---|---|---|
| तलाठी पदभरती 2023 – निवड यादी व प्रतिक्षा यादी | तलाठी पदभरती 2023 – निवड यादी व प्रतिक्षा यादी | 14/03/2024 | 29/03/2024 | पहा (8 MB) |
अहिल्यानगर जिल्हा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदभरती सन 2023 चे अनुषंगाने अराखीव, भ.ज.क., अराखीव (दिव्यांग गट-ब) या प्रवर्गांच्या निवड यादी व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येऊनही उमेदवार यांनी उमेदवारी नाकारल्याने / कागदपत्र पडताळणीवेळी उमेदवार अपात्र ठरल्याने त्यांच्या जागी पुढील उमेदवारास नियुक्ती देण्याकरिता प्रतिक्षा यादीत उमेदवार उपलब्ध नाहीत.
यास्तव, मा. सह सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दिनांक 07/05/2025 रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार अराखीव, भ.ज.क., अराखीव (दिव्यांग गट-ब) या प्रवर्गाची अतिरिक्त प्रतिक्षायादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच अतिरिक्त प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची दिनांक 27/02/2026 रोजी पडताळणी करण्यात येणार आहे. तरी अतिरिक्त प्रतिक्षायादीमध्ये अंतर्भुत असलेल्या उमेदवारांनी त्यांचे मुळ कागदपत्रे व कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रतीसह जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर (महसूल शाखा) येथे उपस्थित रहावे.
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदभरती सन 2023 अतिरिक्त प्रतिक्षा यादी
Ahilyanagar Talathi Exam Result : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे आस्थापनेवरील गट-क मधील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मा. अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांचेमार्फत दि.26/06/2023 रोजी अहिल्यानगर जिल्हा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदभरती सन-2023 ची जाहिरात https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आली होती. तसेच अहिल्यानगर जिल्हा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदभरती सन-2023 चे अनुषंगाने दि. 06/11/2023 रोजी सुधारित मागणीपत्र उक्त नमुद संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते.
विषयांकीत पदभरतीच्या अनुषंगाने दि. 17/08/2023 ते दि. 14/09/2023 या कालावधीत महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी, निवड यादी व प्रतिक्षा यादी मा. अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांचेमार्फत इकडेस प्राप्त झाली. सदर यादीची पडताळणी करण्यात येऊन दि. 14/03/2024 रोजी निवड यादी व प्रतिक्षा यादी https://mahabhumi.gov.in व www.ahmednagar.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
| Important Links For Ahmednagar Talathi Exam Result 2025 | |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















2 thoughts on “अहिल्यानगर तलाठी संवर्गातील प्रतीक्षा यादी जाहीर – Ahilyanagar Talathi Exam Result”
ahilyangar talathi
अहिल्यानगर तलाठी संवर्गातील अतिरिक्त प्रतीक्षा यादी जाहीर – Ahilyanagar Talathi Exam Result