Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2026
महापालिकेत गेल्या १८ वर्षांपासून भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. दरवर्षी कर्मचारी सेवानिवृत्त होत असून, बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, अग्निशमन अशा विविध विभागात कर्मचाऱ्यांची वानवा आहे. अनेक विभागात बाह्यसंस्थेमार्फत कर्मचाऱ्यांची नेमणूक करून कामकाज चालविले जात आहे. लोकप्रतिनिधीकडून पदभरतीची मागणी होत होती. मात्र, मनपाचा आस्थापना खर्च रकूण उत्पन्नाच्या ३५ टक्के पुढे जात असल्याने नगरविकास विभागाकडून पदभरतीस मान्यता मिळत नव्हती.
दुसरीकडे विविध अभियंते, विद्युत पर्यवेक्षक अशा तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊन कामकाजात अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे महानगरपालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करून परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला होता. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – यांनी मंजुरी देत १७६ पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर केला.दरम्यानच्या काळात सातवा वेतन आयोग लागू महानगरपालिकेच्या झाल्यामुळे आस्थापना खर्चात पुन्हा एकदा बाढ झाली. त्यामुळे कामकाजातील अडथळा दूर करण्यासाठी अत्यावश्यक असलेली ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. बिंदू नामवलीसह समांतर आरक्षण निश्चित करून पद भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आणि त्यांच्याशी करारनामाही केला आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लागला. त्यामुळे पदभरती प्रक्रिया लांबणीवर गेली. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर महापालिकेने टीसीएसकडे अनेक वेळा पत्र व्यवहार केला. त्यात टीसीएसने जाहिरातीचा मसुदा आणि अन्य प्रक्रियेसंदर्भात सूचना केल्या आहेत. परंतु, त्या पुढील प्रक्रियेची माहिती टीसीएसकडून अद्यापि कळविण्यात आलेली नाही. महापालिकेकडून टीसीएसकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे समजते. त्यामुळे तांत्रिक विलंबामुळे पुन्हा एकदा महापालिका पदभरती प्रक्रिया रेंगाळल्याचे दिसून येते. महापालिकेत पदभरती झाल्यास कामामध्ये सुसूत्रता येणार आहे तर, कामकाजातील तांत्रिक अडथळे दूर होणार आहेत.
नगर : अहिल्यानगर महापालिकेत साधारण दीड वर्षापूर्वी शासनाने पदभरतीस मान्यता दिली. त्यानंतर पदांची संख्या कमी करण्यात आली. अभियंता, पर्यवेक्षक, लिपिक असा ४५ पदांना अखेर मान्यता मिळाली. त्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीची निवड करण्यात आली. दरम्यान, महापालिकेची निवडणूक लागल्याने पदभरती लांबली होती. निवडणुकीनंतर मनपाकडून टीसीएसकडे पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, टीसीएसकडून अद्यापि पुढील प्रक्रिया कळविण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून समजले.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील संवर्गनिहाय गट ‘क’ व गट ‘ड’ ची एकूण सरळसेवा भरती व पदोन्नतीची १७ हजार २० पदे मंजूर होती. त्यापैकी १५ हजार ६९ पदे भरण्यात आली आहेत. तर अद्यापही १९५१ पदे रिक्त आहेत. यामध्ये गट ‘क’ ची १६४० पदे, तर गट ‘ड’ची ३११ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १ जुलै २०२५ रोजीची सरळसेवा भरतीची गट क ची १४ हजार २३३ पदे मंजूर होती. त्यापैकी १३ हजार १२३ पदे सरळ सेवा भरती अंतर्गत भरलेली आहेत. तर अद्यापही १११० पदे रिक्त आहेत. १ जुलै २०२५ रोजी गट क संवर्गातील पदोन्नतीसाठी १८८२ पदे मंजूर होती. त्यापैकी १३५२ पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. तर अद्यापही ५३० पदे रिक्त आहेत. अशी एकूण गट क ची सरळसेवा व पदोन्नतीची १६ हजार ११५ मंजूर होती. यापैकी १४ हजार ४७५ पदे भरण्यात आली आहेत. तर दोन्ही गटातील १६४० पदे अद्यापही रिक्त आहेत. यांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची चिन्हे सध्या आहे. त्या मुले नवीन भरती नेमकी कधी सुरु होत आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. प्राप्त माहिती नुसार हि भरती लवकरच सुरु होऊ शकते. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी हि आनंदाची बातमी आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषदेतील गट ड ची १ जुलै २०२५ रोजी सरळसेवा भरतीची ८३९ पदे मंजूर होती. यापैकी सरळसेवा भरतीने ५५१ पदे भरण्यात आली असून अद्यापही २८८ पदे रिक्त आहेत. गट ड ची १ जुलै २०२५ रोजी पदोन्नतीची ६६ पदे मंजूर होती. यापैकी ४३ पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. तर अद्यापही २३ पदे रिक्त आहेत.
गट क व गट डची सरळसेवा भरतीची १५ हजार ७२ पदे मंजूर होती. यापैकी सरळसेवा भरतीने १३ हजार ६७४ भरण्यात आली असून १३९८ पदे अद्यापही रिक्त आहेत. १ जुलै २०२५ रोजी गट क व गट ड ची १९४८ पदे मंजूर होती. त्यापैकी पदोन्नतीने गट क व ड ची एकूण १३९५ पदे भरण्यात आली. अद्यापही या दोन्ही गटातील ५५३ पदे रिक्त आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मिळाली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. त्याचबरोबर जनतेची कामे होण्यास विलंब होत आहे.
महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या तांत्रिक पदांच्या भरतीसाठी अखेर पावले उचलली जात आहेत. महापालिकेने तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या ४५ पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या शासनमान्य संस्थेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, करारनामाही पूर्ण झाला आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भरती प्रक्रिया कामकाजातील तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ अभियंता, विद्युत पर्यवेक्षक, लिपिक टंकलेखक, संगणक प्रोग्रॅमर आणि पशुधन पर्यवेक्षक अशा विविध पदांचा समावेश आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कर्मचारी आकृतिबंधात २,७८० पदे मंजूर असली, तरी गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या संख्येने कर्मचारी आणि अधिकारी निवृत्त झाल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात आणि नागरी सुविधांच्या पुरवठ्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. विशेषतः अभियांत्रिकी आणि विद्युत विभागातील रिक्त पदांमुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अडचणी येत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी पावले उचलली आहेत.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीत एक मोठा विरोधाभास पाहायला मिळत आहे. एका बाजूला यूपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी झगडत असताना, जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी मात्र उमेदवारांची टंचाई भासू लागली आहे. तब्बल 937 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असली तरी अद्यापही 50 टक्के जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षांत पात्र उमेदवार मिळाले नाहीत किंवा ज्या त्या प्रवर्गातील उमेदवारच उपलब्ध नाहीत, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 18 महिन्यांपासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे, मात्र अद्यापही 449 पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनावरही मोठा ताण आला आहे. अधिकारी, कर्मचारी यांचा तुटवडा असल्याने अनेक महत्वाची पदे रिक्त असून त्याचा परिणाम सरकारी सेवांवर होत आहे.
महानगरपालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत १७६ पदे भरण्यास परवानगी दिली होती. मात्र, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे महापालिकेच्या आस्थापना खर्चात दरमहा सुमारे दोन कोटी रुपयांची वाढ झाली. यामुळे आर्थिक ताण वाढल्याने सर्व १७६ पदे भरण्याऐवजी तातडीची गरज लक्षात घेऊन केवळ ४५ अत्यावश्यक तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
महानगरपालिकेने भरती प्रक्रिया पारदर्शक आणि कार्यक्षमपणे राबवण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थेला जबाबदारी सोपवली आहे. या भरतीसाठी बिंदुनामावली आणि समांतर आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. टीसीएससोबत करारनामा पूर्ण झाला असून, लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल. आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, ही भरती प्रक्रिया तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी आणि महापालिकेचे कामकाज सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टीसीएसद्वारे राबवली जाणारी ही प्रक्रिया पूर्णपणे नियमानुसार आणि पारदर्शकपणे होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भरली जाणारी पदे आणि जागा
या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ४५ तांत्रिक आणि प्रशासकीय पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): १५ जागा, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), ३ जागा कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल): १ जागा, अभियांत्रिकी सहाय्यक: ८ जागा, विद्युत पर्यवेक्षक: ३ जागा, लिपिक टंकलेखक: १३ जागा, संगणक प्रोग्रॅमर: १ जागा, पशुधन पर्यवेक्षक: १ जागा
ही भरती प्रक्रिया एवढी रखडण्यामागे मुख्यतः शैक्षणिक पात्रता आणि आरक्षणासंबंधी काही तांत्रिक समस्या असल्याचे दिसून येते. काही संवर्गांमध्ये आवश्यक त्या प्रवर्गाचे उमेदवारच मिळाले नाहीत, तर काही ठिकाणी उमेदवार असूनही त्यांची शैक्षणिक पात्रता अपुरी आहे. आरोग्य सेवक (महिला) या संवर्गातील 496 पदांपैकी फक्त 284 उमेदवारांची निवड झाली उर्वरित 211 पदांसाठी उमेदवारच उपलब्ध नाहीत 75 जागा माजी सैनिकांसाठी राखीव होत्या, मात्र त्याठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत. 136 पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे उमेदवार उपलब्ध नाहीत. पशुधन पर्यवेक्षक आणि कनिष्ठ अभियंता या संवर्गातही अशीच स्थिती आहे.
याशिवाय, आरोग्य सेवक (पुरुष – हंगामी फवारणी क्षेत्र) या संवर्गातील 187 जागांवरील भरती न्यायप्रविष्ट असल्याने प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. त्यामुळे या भरतीच्या अंतिम निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेतील ही नोकरभरती रखडल्याने प्रशासनावर मोठा ताण पडला आहे. विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि आरोग्य सेवांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. यामुळे अनेक विभागांत कामकाज सुरळीत चालवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमण्याची गरज भासत आहे.
प्राप्त माहिती नुसार अहिल्यनगर महानगर पलिकेतील भर्ती प्रक्रिया TCS द्वारे राबविण्यात येण्याचे चिन्हे आहेत। साध्य मात्र ही महानगरपालिकेतील तांत्रिक पदांच्या भरतीची प्रक्रिया रखडली आहे. आर्थिक अडचणींमुळे प्रशासनाने १३० पदांना खात्री लावत केवळ ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आरक्षण निश्चितीसाठी प्रस्ताव पुन्हा नाशिकला पाठवण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी आलेली नसल्याने तांत्रिक पदांची भरती पुन्हा एकदा रखडली आहे. महापालिकेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने महापालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करून परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला आहे.
त्याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत १७६ पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर महानगरपालिकेने १३४ तांत्रिक पदे भरण्याबाबत प्रक्रिया सुरू केली. दरम्यानच्या काळात सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे महापालिकेच्या आस्थापना खर्चात पुन्हा एकदा वाढ झाली. पगाराचा खर्च दरमहा दोन कोटींनी वाढल्याने महापालिकेने या पदभरतीला कात्री लावत अत्यावश्यक असलेली केवळ ४५ तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आरक्षण निश्चितीचा प्रस्ताव तयार करून पुन्हा नाशिक येथे पाठवण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी आलेली नसल्याने ही प्रक्रिया सध्या रखडली आहे.
भरतीसाठी मंजूर झालेली ४५ पदे
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १५
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – ३
- कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) – १
- अभियांत्रिकी सहाय्यक – ८
- विद्युत पर्यवेक्षक – ३
- लिपीक टंकलेखक – १३
- संगणक प्रोग्रॅमर – १
- पशुधन पर्यवेक्षक – १
नाशिकहून मंजुरी आल्यानंतर भरती प्रक्रियेबाबत टाटा कन्सल्टन्सी या शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे भरती प्रक्रियेसाठी प्रस्ताव केला जाणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता सध्या दिसत आहे. शासनाने नियुक्त केलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रम, आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शनचा खर्च दरमहा दोन कोटींनी वाढला. त्यामुळे निर्माण झालेली तांत्रिक अडचण लक्षात घेऊन सध्या तातडीची गरज असलेली ४५ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Previous Updates
Ahmednagar Mahanagarpalika Bharti : Ahmednagar Mahanagarpalika has published the notification for the Post of “Veterinary Doctor”. There is a 01 vacant post available. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria can send their applications to the given address before the last date. The last date of Submission of application is 20th of August 2024. For more details about Ahmednagar Mahanagarpalika Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत “व्हेटर्नरी डॉक्टर” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
- पदाचे नाव – व्हेटर्नरी डॉक्टर
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त तथा प्रशासक, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – https://amc.gov.in/
Ahmednagar Mahanagarpalika Vacancy
| पदाचे नाव | पद संख्या |
| व्हेटर्नरी डॉक्टर | 01 |
Educational Qualification For Ahmednagar Mahanagarpalika Recruitment
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| व्हेटर्नरी डॉक्टर | B.V.S.C&AH व तत्सम कौंसिलकडे नोंदणी |
Salary Details For Ahmednagar Mahanagarpalika Notification
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| व्हेटर्नरी डॉक्टर | ५०,०००/- |
How To Apply For Ahmednagar Mahanagarpalika Application
- वरील पदाकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर समक्ष अथवा पोस्टाने सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For amc.gov.in Notification | |
| ???? PDF जाहिरात | https://shorturl.at/QfV3f |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://amc.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















