Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अग्निवीर भरती फिजिकल, मेडिकल टेस्ट कशी राहणार – Agniveer Physical Eligibility

Agniveer Army Bharti Physical Eligibility – भारतीय सैन्याने अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर भर्ती रॅली 2022 (Agniveer Army Bharti Rally 2022) ची PDF नोटिफिकेशन  प्रकाशित केल आहे. अग्निवीर भरती रॅलीसाठी ऑनलाइन नोंदणी जुलैमध्ये सुरू होणार आहे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. सैन्यात अग्निवीर होण्यासाठी उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच शारीरिक ( physical fitness test), वैद्यकीय (Agniveer medical test) आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अग्निवीर म्हणून भरती व्हायचं असेल तर कोणत्या प्रकारची आणि कशी फिझिकल टेस्ट द्यावी लागेल याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • 1.6 किलोमीटर धावणं आवश्यक असेल.
  • गट I – 5 मिनिटे 30 सेकंदमध्ये पूर्ण केल्यास – 60 गुण मिळणार
  • गट II – 5 मिनिटे 31 सेकंद ते 5 मिनिटे 45 सेकंदमध्ये पूर्ण केल्यास – 48 गुण मिळणार

बीम (पुल अप) आणि पॉइंट्स बद्दल माहिती 

  • 10 बीम पुल अप केल्यास – 40 गुण मिळणार
  • 9 बीम पुल अप केल्यास – 33 गुण मिळणार
  • 8 बीम पुल अप केल्यास – 27 गुण मिळणार
  • 7 बीम पुल अप केल्यास – 21 गुण मिळणार
  • 6 बीम पुल अप केल्यास – 16 गुण मिळणार

अग्निवीर भरती रॅली 2022 मध्ये, उमेदवारांना नऊ फूट लांब उडी आणि झिगझॅग बॅलन्सिंगसह धावणे आवश्यक आहे. तसंच इतरही काही टेस्ट घेण्यात येणार आहेत.

 

वैद्यकीय चाचणी (Medical Test For Agniveer Bharti 2022)

रॅलीच्या ठिकाणी विहित वैद्यकीय मानकांनुसार वैद्यकीय चाचणी होईल. अपात्र आढळलेल्या उमेदवारांना तज्ज्ञांच्या पुनरावलोकनासाठी लष्करी रुग्णालयात पाठवले जाईल. उमेदवारांना रेफरलच्या पाच दिवसांच्या आत संदर्भित लष्करी रुग्णालयात अहवाल द्यावा लागेल आणि 14 दिवसांच्या आत रुग्णालयाद्वारे पुनरावलोकन वैद्यकीय चाचणी केली जाईल.

Eligibility For Agniveer Bharti 2022

  • अग्निवीर (जीडी) – किमान 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण. प्रत्येक विषयात किमान ३३% गुण असणे आवश्यक आहे.
  • अग्निवीर तांत्रिक – विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) किमान 50% गुणांसह. प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल – किमान ६०% गुणांसह १२वी पास. प्रत्येक विषयात किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.
  • अग्निवीर ट्रेडसमन 10वी पास – 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अग्निवीर ट्रेडसमन 8वी पास – 8वी पास.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड