महत्वाचा अपडेट समोर- शिक्षक भरतीसाठी वयोमर्यादा शिथिल – Age Limit Maharashtra Shikshak Bharti राज्यातील मान्यताप्राप्त खासगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये सरळसेवेने नियुक्त होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पदांवरील नियुक्तीसाठी आता कमाल वयोमर्यादेचे बंधन लागू राहणार नाही. त्यामुळे वयाची अट आड येत असल्याने नोकरीच्या संधीपासून दूर राहणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेबाबत शालेय शिक्षण विभागाने अखेर मोठा निर्णय घेतला आहे.

या भरतीसाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही हे स्पष्ट केले आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि वयाची अट ओलांडल्यामुळे चिंतेत असलेल्या हजारो पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या नव्या निर्णयामुळे राज्यातील खाजगी शाळांमधील भरती प्रक्रियेचा मार्ग अधिक सुकर होणार असून नोकरभरतीतील तांत्रिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. सचिव शरद माकणे यांनी तशा प्रकारचा शासन निर्णयच जाहीर खासगी केला आहे. महाराष्ट्र शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ९ (४) (ब) नुसार खासगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक (इयत्ता नववी ते दहावी) आणि उच्च माध्यमिक (इयत्ता अकरावी ते बारावी) शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. या संदर्भातील यापूर्वीच्या शासन निर्णयांमुळे क्षेत्रीय स्तरावर संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत शासनाकडे विविध निवेदने प्राप्त झाली होती. हा संभ्रम दूर करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने स्पष्टीकरण जाहीर केले आहे.
वयोमर्यादेचा संभ्रम दूर
७ फेब्रुवारी २०१९, ७ मार्च २०१९ आणि ११ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयांमधील कमाल वयोमर्यादेसंबंधीच्या तरतुदी खासगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सरळसेवा नियुक्त्यांसाठी लागू होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















