कौशल्य विकास व रोजगार केंद्र आणि अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात १७० हून अधिक पदे विविध नामांकित खासगी कंपन्यांमध्ये भरली जाणार असून, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ९२ उमेदवारांसाठी इंटर्नशिपची संधीही उपलब्ध आहे.

विविध कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती
या रोजगार मेळाव्यात टारगेट सेक्युरिटी कंपनीत सुरक्षा कर्मचारी, LIC मध्ये विमा सखी, पिपल ट्री ऑनलाईनमध्ये केअरटेकर, मशिन ऑपरेटर, नवभारत फर्टिलायझर्समध्ये क्षेत्रीय व कृषी अधिकारी, ब्ल्यू डार्ट कुरिअर सर्व्हिसमध्ये डिलिव्हरी बॉय व बॅक ऑफिस मदतनीस, तसेच पुण्यातील जॉन डिरे कंपनीत प्रशिक्षणार्थी अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.
नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे
पात्र उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करून नोंदणी करावी. रोजगार मेळावा अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन सभागृह, औद्योगिक वसाहत, अप्पू पुतळा परिसर येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. तसेच, १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांसाठी ओझोन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आयकॉन हॉस्पिटल, साईराज कृषी इंडस्ट्रीज, प्राजक्ता कृषी मशिनरी, गोदावरी लाईफ सायन्स आदी कंपन्यांमध्ये प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी २४ फेब्रुवारी रोजी शैक्षणिक कागदपत्रे, बायोडेटा आणि छायाचित्रांसह उपस्थित राहावे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















