खुशखबर- ITI च्या 10 हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग!!

ITI Job Training

10 Thousand Students of ITI will get on-job training

About 10,000 students from 126 government industrial training institutes (ITIs) in ten districts, including Pune, will get on-the-job training. Further details are as follows:-

राज्यात पुण्यासह दहा जिल्ह्यांतील १२६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना काम करताना प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) मिळणार आहे. जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या प्रारूपाअंतर्गत होणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध होईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ITI Job Training

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (डीईव्हीटी) आणि सिमेन्स, टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्हज ट्रस्ट यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पालघर, रायगड व ठाणे या १० जिह्यांतील १२६ शासकीय आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राईंडर, टूल आणि डाय मेकर, मोटार मेकॅनिक व्हेईकल, रेफ्रीजरेशन आणि एअर कंडिशनिंग, वेल्डर या व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जाईल. आयटीआयना जवळच्या उद्योगांशी जोडून या उद्योगांमध्ये विद्यार्थ्यांना काम करतानाच प्रशिक्षणाची सुविधा दिली जाईल.

आयटीआयमधील पहिले वर्ष झाल्यावर एक महिना काम करताना प्रशिक्षण, द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यावर दोन महिन्याचे आणि अंतिम निकाल जाहीर झाल्यावर एक वर्षासाठी कार्यप्रशिक्षणाची संधी दिली जाईल, अशी माहिती डीईव्हीटीकडून देण्यात आली.


ITI Job Training

ITI Job Training : On-the-job training will be available to about 10,000 trainees studying in 126 government industrial training institutes (ITIs) in ten districts of the state. This initiative will provide training as well as employment to the students. Further details are as follows:-

राज्यातील १० जिल्ह्यांमधील १२६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः १० हजार प्रशिक्षणार्थ्यांना ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ उपलब्ध होणार आहे. कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्यातील औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या १० जिल्ह्यांतील १२६ शासकीय आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, टूल आणि डाय मेकर, मोटार मेकॅनिक व्हेईकल, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग तसेच वेल्डर या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या आयटीआयना नजिकच्या उद्योगांशी जोडून त्याद्वारे त्या उद्योगांमध्ये उमेदवारांना ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे मलिक यांनी सांगितले.

राज्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम व उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे कुशल संधाता (वेल्डर) यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. थायसेनकृप इंडस्ट्रीजच्या सहयोगातून उभारण्यात येत असलेल्या वेल्डींग वर्कशॉपच्या माध्यमातून आयटीआयमधील विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अत्याधुनिक प्रशिक्षण उपलब्ध होईल, असे मंत्री श्री मलिक यांनी सांगितले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Aniket nikode says

    Apang job chahiye

  2. Aniket nikode says

    Apng job pahije

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड