MSBTE च्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

MSBTE Practical and Written Exam 2021

MSBTE Practical and Written Exam 2021

MSBTE Practical and Written Exam 2021MSBTE’s Engineering, Pharmacy, Hotel Management, Surface Coating Technology courses have been rescheduled for the summer exams. Further details are as follows:-

MSBTE च्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल. एमएसबीटीईच्या इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनजमेंट, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रात्यक्षिक परीक्षा २२ जून ते ३ जुलैदरम्यान, तर ऑनलाइन लेखी परीक्षा १३ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान होणार आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

संबंधित परिक्षांचा निकाल ऑगस्टच्या चौथ्या आठवड्यात लागणार असून, विद्यार्थ्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणासंदर्भातील माहिती वेगळ्या परिपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे. तंत्रशिक्षण मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचे नवीन शैक्षणिक वर्ष एक सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

याचसोबत एमएसबीटीई अंतर्गत येणाऱ्या विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या द्वितीय सत्रातील चौथ्या, सहाव्या आणि आठव्या सेमिस्टरचा कालावधी हा २५ मार्च ते १९ जून ठरविण्यात आला आहे. द्वितीय सत्रातील दुसऱ्या सेमिस्टरचा कालावधी ३० मार्च ते १९ जून असेल, तर वार्षिक पॅटर्नचा कालावधी १७ ऑगस्ट २०२० ते १९ जून २०२१ असा निश्चित करण्यात आला आहे. या सत्रातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा १४ ते १६ जूनदरम्यान घेण्यात येणार आहे. याच कालावधीत फार्मसीच्या विद्यार्थ्यांची तिसरी वर्ग चाचणीदेखील घेण्यात येणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड