नवीन अपडेट – वर्ग-3 व वर्ग-4 ची पदे त्वरित भरण्याचे निर्देश!!
Instructions for immediate filling of Class-3 and Class-4 posts
Instructions for immediate filling of Class-3 and Class-4 posts : Taking into account COVID condition, Deputy Chief Minister Ajit Pawar directed the Directorate of Medical Education to immediately fill up Class-3 and Class-4 posts in these hospitals.
नवीन अपडेट – वर्ग-3 व वर्ग-3 ची पदे त्वरित भरण्याचे निर्देश!! घाटी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि शासकीय कर्करोग रूग्णालयातील वर्ग-३ आणि वर्ग-४ संवर्गाची रिक्त पदे त्वरित भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दिले असल्याची माहिती आ. सतीश चव्हाण यांनी दिली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
घाटी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, कर्करोग रूग्णालयातील मंजूर पदे भरावीत, अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मंगळवारी यासंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन सदरील रूग्णालयांमधील वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे त्वरित भरण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दिले.
तर वर्ग-१ ची पदे ‘एमपीएससी’मार्फत भरली जात असल्याने ही पदेही त्वरित भरण्याच्या सूचना एमपीएससीला दिल्या जातील, सदरील रूग्णालयांसाठी जे मंजूर बजेट आहे, ते तत्काळ वितरित करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीस पालकमंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख तसेच वित्त व वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते