चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळात प्रतिनियुक्तीने पदे भरण्यात येणार! -Samajik Nyay Vibhag Bharti 2023
Samajik Nyay Vibhag Bharti 2023
Samajik Nyay Vibhag Bharti 2022
Dhammjyoti Gajbhiye, the Managing Director of the Corporation has informed that the posts of officers and employees will be filled by deputation at the establishment of Charamkar Development Corporation. The following posts on the establishment of this corporation are General Administration Department Dt. It will be filled by deputation subject to the terms and conditions of the Government decision dated 17th December, 2016. The total number of posts and posts to be filled are as follows, Manager Total Posts 1 (Grade S 23), Associate Manager Total Posts 3 (Grade S 16), Deputy Manager Total Posts 7 (Grade S 14), Senior Stenographer Total Posts 1 (Grade S 13), Assistant Manager Total Posts 5 (Grade S 10), Assistant Total Posts 7 (Grade S 8), District Manager Total Posts 30 (Grade S 15), Accountant Total Posts 32 (Pay Scale S8), Recovery Inspector Total Posts 23 (Pay Scale S8) Posts in the pay scale to be filled.
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या आस्थापनेवर अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे. या महामंडळाच्या आस्थापनेवरील पुढील पदे सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १७ डिसेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पद व पदाची एकूण संख्या पुढीलप्रमाणे आहे, व्यवस्थापक एकूण पदे १ (वेतनश्रेणी एस २३), सहव्यवस्थापक एकूण पदे ३ (वेतनश्रेणी एस १६), उपव्यवस्थापक एकूण पदे ७ (वेतनश्रेणी एस १४), उच्च लघुलेखक एकूण पदे १ (वेतनश्रेणी एस १३), सहायक व्यवस्थापक एकूण पदे ५ (वेतनश्रेणी एस १०), सहाय्यक एकूण पदे ७ (वेतनश्रेणी एस ८), जिल्हा व्यवस्थापक एकूण पदे ३० (वेतनश्रेणी एस १५), लेखापाल एकूण पदे ३२ (वेतनश्रेणी एस ८), वसुली निरीक्षक एकूण पदे २३ (वेतनश्रेणी एस ८) या वेतनश्रेणीतील पदे भरण्यात येणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ही पदे प्रथम एक वर्ष कालावधीकरिता व नंतर कालावधी वाढविण्याच्या अटीवर प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी शासनाच्या विविध विभागात या पदाच्या व वेतनश्रेणीच्या समकक्ष पदावर व वेतनश्रेणीवर कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी दि. १५ जुलै ते दि. ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत अर्ज व्यवस्थापकीय संचालक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई येथे करावेत. तसेच मंत्रालयीन इंन्ट्रानेट या संकेतस्थळावर प्रतिनियुक्त्या (Deputation) या लिंकखाली सविस्तर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
याबाबतच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत, विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ही जाहिरात किंवा त्याद्वारे झालेली निवड प्रक्रिया कोणत्याही टप्यावर कोणतेही कारण न देता रदद करण्याचे अधिकार महामंडळाकडे राहतील. यासाठी अधिकारी / कर्मचारी कार्यरत असणाऱ्या विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
Samajik Nyay Vibhag Bharti 2022: Joint Secretary posts vacant for the last four years of the Department of Social Justice. For more details about Samajik Nyay Vibhag Recruitment 2022, Social Justice Department Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-
Social Justice Department Bharti 2022
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणारी सहसचिवांची पदे गेल्या चार वर्षापासून रिक्त आहेत. या काळात तीन मुख्यमंत्री आणि मंत्री झाले. परंतु अधिकारी पात्र असतानाही त्यांना पदोन्नती मिळाली नाही. विशेष म्हणजे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत काही जण निवृत्त झाले तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे समाजिक न्यायाची जबाबदारी असलेला विभागच न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतात.
- या विभागाची धुरा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आहे.
- त्याचप्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणीची जबाबदारीही याच विभागाकडे आहे.
- राज्यस्तरावर या विभागात सहसचिवांची चार पदे आहे.
- सही सर्व पदे पदोन्नतीच्या माध्यमातून भरण्यात येतात.
- सहाय्यक आयुक्तांना उपायुक्त, त्यानंतर उपायुक्त व त्यानंतर सह सचिव पदावर पदोन्नती देण्यात येते.
Samajik Nyay Vibhag Recruitment 2022,
सहाय्यक आयुक्तांना उपायुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली. परंतु त्यानंतर त्यांना पदोन्नतीचा लाभच मिळाला नाही. गेल्या चार वर्षापासून एकाही अधिकाऱ्याला सहसचिव पदावर पदोन्नती देण्यात आली नाही. पद रिक्त असूनही पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नती न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून विभागात नाराजीचा सूर आहे. या काळात दोन मुख्यमंत्री व दोन मंत्री होऊन गेले. तर तिसरे मुख्यमंत्री व मंत्री विराजमान झाले. यापूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनही केले. परंतु त्यानंतरही शासनावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे नवीन सरकारकडून तरी या विभागाला न्याय मिळेल का, हेच पाहणे महत्त्वाचे आहे.
फाइल मंत्रालयात धुळखात
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पदोन्नतीची फाइल तयार असून मंत्रालयात धुळखात आहे.
- परंतु एकाही मंत्री व मुख्यमंत्र्यांकडून विभागातील अधिकाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला नाही.
- या चार वर्षाच्या काळात काही पात्र अधिकारी सेवानिवृत्त झाले.
- तर काही जण सेवानिवृत्त होणार आहे.
- पदे रिक्त असल्याने कामावरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते.
- पदोन्नतीची फाइल धुळखात असल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत.
Previous Post
Department of Social Justice and Empowerment Recruitment
Samajik Nyay Vibhag Bharti 2021 : Department of Social Justice and Empowerment has been declared a new recruitment notification for the National Coordinator, Consultant posts to fill with 03 vacancies. Eligible candidates apply before the 30th of September 2021. Further details are as follos:-
MSJE Recruitment Details
सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग अंतर्गत राष्ट्रीय समन्वयक, सल्लागार पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – राष्ट्रीय समन्वयक, सल्लागार
- पद संख्या – 03 जागा
- संपर्क – श्री शांतनु दीक्षित, सहाय्यक डायरेक्ट (डीपी विभाग)
- ई-मेल – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Department of Social Justice and Empowerment Bharti
|
|
? PDF जाहिरात |
|
✅ अधिकृत वेबसाईट |
socialjustice.nic.in |
Samajik Nyay Vibhag Bharti – सामाजिक न्याय विभागात वर्ग 3 ची 1441 आणि वर्ग ड ची 1584 पदे रिक्त असून पदभरती बाबत वित्त विभागाचे असलेले निर्बंध उठताच ही पदभरती करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. (to fill 3025 vacancies in Social Justice Department; Dhananjay Munde’s instructions)
राज्यभरातील समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता या आंदोलनाची तात्काळ दखल घेत मंत्री धनंजय मुंडे यांनी आंदोलनापूर्वीच विविध कर्मचारी संघटना व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले. मुंडे यांनी अनेक मागण्यांबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले नियोजित लेखणीबंद आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे कळवले आहे.
मंत्रालयात आज झालेल्या या बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
समाज कल्याण विभागातील निलंबित 8 कर्मचाऱ्यांना पुनर्स्थापित करण्यात आले असून उर्वरित कर्मचाऱ्यांचा प्रकरणनिहाय आढावा घ्यावा, रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर करावा, 10/20/30 च्या आश्वासित प्रगती योजनेअंतर्गतचे लाभ त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी. पदोन्नतीबाबतही लवकर बैठक आयोजित करण्याबाबत तसेच विभागीय परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे निर्देशही यावेळी धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
शासकीय वसतीगृहात कंत्राटी पदे न भरण्याबाबत फेर आढावा घेऊन प्रस्ताव सादर करावा, शासकीय निवासी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करावी याबाबत यावेळी चर्चा झाली. आदिवासी उपयोजना अंतर्गत जो आकृतिबंध निश्चित केला आहे तसा आकृतिबंध अनुसूचित जाती उपयोजनेसाठी प्रस्तावित करून प्रस्ताव तात्काळ सादर करण्यात यावा; तसेच कंत्राटी जनसंपर्क अधिकारी विधी अधिकारी व संगणक चालक यांना सेवेत सामावून घेण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीस संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष शांताराम शिंदे, कृती समिती अध्यक्ष राजेंद्र देवरे, उपाध्यक्ष राजेंद्र भुजाडे, कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे, सचिव सुजित भांबुरे, सचिव भरत राऊत, कार्यकारणी सदस्य भूषण शेळके, विठ्ठल राव धसाडे, प्रफुल्ल गोहते, डॉ. त्रिवेणी लोहार, शासकीय निवासी शाळा प्रतिनिधी विष्णू दराडे शिवराज गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल सर्व आंदोलनकर्त्यानी धनंजय मुंडे यांचे आभार मानले.
Table of Contents
समाजकल्याण अधिकारी वर्ग 1 व 2 या पदाच्या जुन्या जाहिराती हव्यात mpsc official pdf.
please send
Online form kuthun fill karaycha ahe…link nahi
Ho lagel…. naka kalji karu
Sir majh open youniwarsiti madhe
BA jhal ahe mala govarment job lagu shakel ka.
Kontya jilhyat ahet he jaga