आता आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही पायलट बनण्याची संधी! नागरिक उड्डयन महासंचालनालय (DGCA) लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे, ज्यामुळे पायलट होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळणार आहे. आतापर्यंत कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) प्रशिक्षणासाठी १२वीमध्ये विज्ञान शाखा असणे, विशेषतः फिजिक्स आणि मॅथ्स हे विषय असणे आवश्यक होते. त्यामुळे आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पायलट बनणं अशक्यप्राय होतं.
मात्र, आता परिस्थिती बदलण्याच्या मार्गावर आहे.
DGCA लवकरच आपल्या नियमांमध्ये बदल करत असून, फिजिक्स आणि मॅथ्सची अनिवार्यता हटवण्याचा विचार करत आहे. यामुळे आर्ट्स आणि कॉमर्स पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही कमर्शियल पायलट प्रशिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या पंखांना खऱ्या अर्थाने भरारी मिळणार आहे.

काय राहील आवश्यक?
जरी शैक्षणिक पात्रतेमध्ये सवलत दिली जाणार असली, तरी वैद्यकीय निकष आणि इतर तांत्रिक चाचण्या मात्र पूर्वीप्रमाणेच अनिवार्य राहतील. पायलट प्रशिक्षणासाठी DGCA चा वैद्यकीय फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करणे गरजेचे असेल.
पुढची पावले
सद्यस्थितीत हा नवीन नियम अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच तो केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. एकदा मंजुरी मिळाली की, भारत देखील त्या देशांच्या यादीत सामील होईल जिथे CPL प्रशिक्षणासाठी विज्ञान विषय अनिवार्य नाही.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















