महत्त्वाचे – राज्यात DHO संवर्गातील 144 रिक्त पदे
Arogya Vibhag DHO Bharti
Arogya Vibhag DHO Bharti : जिल्हा आरोग्य संवर्गातील राज्यात तब्ब्ल २७४ पैकी १४४ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. दहा वर्षांपासून शासनाने सेवा जेष्ठता यादीच प्रसिद्ध न केल्याने पदोन्नती रखडल्या आहेत. त्यामुळे आहेत त्या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. ही सर्व पदे भारण्यासह इतर २७ मुद्द्यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेने आयुक्तांपुढे कैफियत मांडली.
कोरोनाकाळात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांनी धावपळ केली. तर रुग्णांवर उपचार करण्यात जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले; परंतु त्यांच्या मागण्यांकडे शासनाने कायम दुर्लक्ष केले. 2011 पासून सेवा जेष्ठता यादीच प्रसिद्ध करण्यात न आल्यामुळे पदोन्नत्या रखडल्या आहेत. राज्यात या संवर्गातील 274 पैकी केवळ 130 जागा भरलेल्या आहेत. अद्यापही 144 जागा रिक्त आहेत. याचा परिणाम कामावर होत आहे.